Friday, November 26, 2010

वसंत वाटिका.

संत वाटिका.

कुजबुज सुमनांच्या अंगणी रंगलेली
जवळ मलमल जे पंख खेळे झुलूनी
चल हळूच धरूनी ते बसवू परागी
किलबिल इवली ही ऐकता ती उडाली|

चमचम हसू ओठी शांत डोले अबोली
झुळ झुळ एक वेडी सांगते चंद्रास गाणी
भिर भिर मन आहे आज सूर्यफुलाचे
तनमन चहु स्वप्न रात होती निजलेली|

एकट घरट होता त्या रडल्याच वेली
मग लगबग आली ती जुई ही दुरूनी
सरगम लय गुंजे राजपुत्र गुलाबी
वसंत सुख उरी हे वाटिका धुंदलेली|

-भक्त्ती

No comments: