Saturday, November 27, 2010

कविता रसग्रहण


सुखाच्या शोधांत
फ़िरते पॄथ्वी
घेऊन हातांत
चंद्राचा चोरकंदील!
आणि फ़िरतात
त्याच्याच शोधांत
पृथ्वीची पोरे
अतॄप्त मुशाफ़िर!
ओसाड पॄथ्वीची
सुखाच्या शोधांत

जंगले पिंजणा~या
माझ्या मुशाफ़िर!
थांब जरासा;
आपल्या बाळांच्या
विस्कळीत केसांतून
फ़िरव बोटे.
पहा असेल
सांड्लेले सूख
तेथेच लपलेले!

माझ्या मुशाफ़िरा!
थांब जरासा;
वादळी जीवनाच्या
सहस्त्र स्वप्नांनी
जागृत होऊन
आकाश पिंजण्य़ापूर्वी
पहा रे आपल्या
उशीच्या खाली;
असेल तेथेही
सूख दड्लेले!

माझ्या मुशाफ़िरा
ऐक,ऐक,
दमलेल्या भागलेल्या
नाजुक हातांनी
आत्ताच दिलेल्या
खरपूस ,खमंग
लसणीच्या फ़ोडणीचा
चर्र आवाज;
आणि तव्यावर
उडू पाहणा~या
भाकरीची फ़डफ़ड!

ऐक,ऐक,
खळ्यांच्या कोप~यावरील
मोहरलेल्या आंब्याच्या
विशाल वॄक्षावर
डॊके टेकून
टिकाळी शोधणा~या
रसाची कुजबूज:

"स्थीर राहूनही
वाढते उंची;
जातात पाळे
खोल खोल;
स्थीरतेचाच
बुरखा पांघरून
जगते गती
निराळ्या पातळीत !"

याच गतीला
असते शोधीत
सुखाचे भूत
बंदिस्त स्थितीतून
होण्या विमुक्त.
सुखाचे भूत-
जे काढते
सर्वांची कळ;
आणि लपते
त्यांच्याच सावलीच्या
मिस्किल अंधारांत!
-विं दा क रं दी क र
~~~~~~~~~~~~~~~~~~`
सुखाच्या शोधांत-रसग्रहण

अनंत काळापासून अगदी मानवाच्या निर्मीतीच्या पासून सुखाचा शोध चराचर सृष्टी सुखाच्या शोधात आहे...सूर्य हेलियम शोधात,पृथ्वी जीवननिर्मितीच्या सुखात,चंद्र प्रकाश आनंदाच्या शोधात..यापुढे अफ़ाट मानव सुद्धा सतत सुखाच्या शोधात आहे...त्याचा हा घडा कायम डगमगतच असतो..
विंदानी सदर कवितेत ह्याच सुखाच्या शोधाच्या मिस्किल गोंधळात,आजुबाजुचे अमूल्य सुख दूर्लक्षित केले आहे हे सांगितले आहे.जसे

माझ्या मुशाफ़िरा!
थांब जरासा;
वादळी जीवनाच्या
सहस्त्र स्वप्नांनी
जागृत होऊन
आकाश पिंजण्य़ापूर्वी
पहा रे आपल्या
उशीच्या खाली;
असेल तेथेही
सूख दड्लेले!

इवलस हे सूख लाखमोलाच!

आयुष्यात मनपाखरू स्पप्नाच्या आकाशात घारीसारखे फ़िरते ’स्वप्नाचे भक्ष्य ’मिळवण्यासाठी .हो कोणालाही हे सूख झदप घालूनच मिळवायच असत...त्यात तो एक विसावा हरवतो कायमचा...ही आहुती का?सुखाच्या शोधासाठी..
कवितेतील शेवटच्या ओळींनी ह्या सुखाचा गॊंधळ विंदांनी काहीसा सोदअले..नव्हे सुखाचे मर्म सांगितले आहे...

स्थीर राहूनही
वाढते उंची;
जातात पाळे
खोल खोल;
स्थीरतेचाच
बुरखा पांघरून
जगते गती
निराळ्या पातळीत !"

याच गतीला
असते शोधीत
सुखाचे भूत
बंदिस्त स्थितीतून
होण्या विमुक्त.


सुख हे त्या वृक्षासारखे आहे..खोल पाळे मुळे गाडून घ्यायची, व रसदार फ़ळे वर्षांवर्षे सुखाने मिळ्वायची,कुजबुज रसाची ऐकायची अनुभवायची चेतनेने...
माणसाने देखील सुखची सीमा मनात रूजवावी ,सुख मनात रूजवाय्च,सुखाला कायम नाविन्यपूर्ण रूप द्यावे,पहावे..सुख नूतनीक्षम आहे.आनंदाच,सुखाच झाड मनात लावाव

पापण्या मिट्ल्यावर होणा~या मिणमिणत्या धुंद काळोखात जे सूख लपलेले आहे ..ते डोळे उघडे ठेवून शोधावे..नक्कीए जवळ्च असेल हे सूख!!
विंदानी सुखसागराच्या किना~यावर आपल्याला पोहचवले आहे.उडी मारूयात..

या कवितेतील काही रूपक अप्रतिम आहेत मनावर अलगद परिणाम करतात,
चंद्रचा चोरकंदील,सांडलेले सुख,रसाची कुजबूज,सुखाचे भूत.

-भक्त्ती
संदर्भ:मृदगंध

No comments: