Monday, July 27, 2020

मेघसरी

मेघाच हा द्वाडपणा

ओढत नेतो सरींना

आठवणींच्या गावा

 

बोचतील बाभळीचे काटे

फुंकर घालील का कोणी

सरींच्या मनी भीती दाटे

 

बाभळीचा बहर उधळती

बांधाच्या थोडे पुढे जाऊन

मेघाच्या घेत हात हाती..

.सरीला बाकी काही नकोय..

 

-भक्ती


Monday, July 20, 2020

#ऐकावे जनाचे करावे मनाचे....श्रद्धा..


सणवार म्हणाल की बायकांना आठवते माहेरची सय,एकत्र कुटुंबाची मौज..सासरकडे सण म्हणजे जबाबदारी,अन्नपूर्णेची कसरत..ती तयारी ,आधीपासून आखलेले नियोजन,..मग वस्तूंची जमवाजमव,मायेनी ,कलेनी मांडणी..सगळ आटोपल्यावर मग हुश करून टेकावलेली पाठ..मायेने लेकीने घेतलेला पापा...

       ह्या सगळ्यात आजच्या स्त्रीने हे सण तत्व म्हणून आपल्या पुढच्या पिढीला शिकवले पाहिजे...श्रद्धा हा प्रत्येकाचा वैयक्तिक मुद्दा आहे...त्यात जर पंचतत्व पृथ्वी,आकाश,जल,वायू,अग्नी शोधले तर आणखिन डोळसपणा येईल..आज दीप अमावास्या आज अग्नी तत्वाला जाणून घेऊया......

-भक्ती

Thursday, July 9, 2020

राधा

वारा घोंघावत अवती

गिरकी देहाभोवती

कानात फुलांचे डूल

केसात माळत रानभूल

गीत गुंजन श्वासभर

 पैजण नाद नभभर

.....कृष्णाची राधा डोलती...

@भक्ती


Wednesday, July 8, 2020

#सामसूम रस्ता ....धाकधुक

            आज रविवार आणि बाहेर रम्य पाऊस पडत होता. राजेश –प्रिया त्यांची  गोड मुलगी शुभ्रा यांनी अचानक मोराची चिंचोली या निसर्ग रम्य आणि मोरांच्या सानिध्याने नटलेल्या गावी जायचे ठरवले. पावसाच्या गाण्यांनी गाडीतच पाऊस सुरु झाला होता त्यात भिजत गर्दीने भरलेला रस्ता कधी संपला कळलेच नाही.तिथे पोहचले शुभ्रा तर एखाद्या स्वच्छंदी कोकरासारखी बागडत होती.राजेशने चौकशी ,त्याना कळाले की संध्याकाळी ५ नंतर मोर स्वैर इथे संचार करतात आणि आता वाजलेत ११ .मग इतर खेळ,अस्सल गावरान जेवण करून तिघे मौज करत होते.आता ५  वाजले डोळे आणि मनभरून मोर पाहून ते निघाले.थोड पुढे आल्यावर गाडी बंद पडली.रस्ता अगदी सामसुम .....राजेश लिफ्ट घेऊन Garage ला गेला..त्या सामसूम रस्त्यावर दोघी मायलेकीच अंधार चांगलाच दाटून येत होता...शुभ्रा निरागसपणे दगड माती खेळत बसली होती.प्रियाला मात्र एक एक क्षण त्या रस्त्यावर मोठा वाटत होता.थोड्या वेळात राजेश आला आणि गाडी सुरु झाली......पण प्रिया कधीच विसरली नाही तो सामसूम रस्ता.......   


Wednesday, July 1, 2020