Monday, November 29, 2010

त्रिवेणी by Bhakti


त्रिवेणी
त्रिवेणी बद्दल........
ह्यात पहिल्या दोन ओळी गंगा जमुने सारख्या आहेत, एकाच विचाराला धरुन . पण ह्या दोघांच्या संगमात एक गुप्त सरस्वती नदी आहे जी कधी दिसत नाही.तिस-या ओळित पहिल्या दोन ओळितला एक गुप्त विचार लपलेला असतो.



1 दूरपर्यंत दोघे बरोबर चालयचो
पायवाट पुढे पुढे पळत असे
.
.
.
.
आता तुझ्याविना वाटच हरवलेली दिसे
~~~~~~~~~~
2
उंच उडाव आकाशात
घ्याव सारं ते पंखांत
.
.
.
.
नंतर मात्र जमिनीकडे झेपावावे अलगद
~~~~~~~~~~~~~
3
फ़ुल तु माळत जा
गंधही तु घेत जा
.
.
.
.
तेवढा गज~याचा हट्ट माझ्याकडॆच कर ग..
~~~~~~~~~~~``
4
मन सारे चिंब भिजले
क्षण होत थेंब घरंगळले
.
.
.
.
तु होऊन श्रावण मला साद घातली
~~~~~~~~~~~~~~
5
डोळ्यांत भावना दाट्लेल्या
पापण्या अश्रूंनी भिजल्या
.
.
.
.
तुझे रूप मी आहे साठवल
~~~~~~~~~~~~
6
चंद्राशी भांडून चंदेरी सुख ओरबडले
ओंजळीत राखच फ़क्त होती आली
.
.
हातावरली जखम अजुन आहे ओली
~~~~~~~~~~~~~~
7
डोळ्यांत भाव शोध
उमगले जरी सांगू नको
.
.
खोटारडी मला हिणवू नको
~~~~~~~~~~~
8
स्वप्न हिरव पान
पानगळ सोसावी लागेल
.
.
मी आधीच ते पान खुड्ते
~~~~~~~~~~~~
9
जुन्या कवितंची पाने फ़डफ़डतात
मनाला हवीहवीशी नाजूक जखम होते
.
.
शब्दांच्या पाकळ्या वा~यासवे अलवार उडतात
~~~~~~~~~~~
10
स्मॄतीच्या खेळात मी स्व:ताला लोटले
हातातले क्षणांचे अस्तित्व त्या जाळ्यात गुंतले
.
.
मनाला स्वैर ठेवणे हल्ली धोक्याच आहे
~~~~~~~~~~~~~~~
11
लाजून तू नजर झुकावते
त्या सावळ्या सावलीत प्रियकर सुखावतो
.
.
उन्हात एकट्याची निरागसता टॅन होईल
~~~~~~~~~~~~~
12
आयुष्य पुढे समांतर चालले, असे का व्हावे?
आठवड्यातून एकदा दूध नक्की आटवावे
.
.
गोड घटानांची बासुंदी चवीला अप्रतिm
~~~~~~~~~~~~~
13
धूंदी प्रीतीची,फ़ुलांतून ओसांडते
मंजूळ धून आसमंती वेडावते
.
.
रानवारा तुला स्पर्श करून येतो
~~~~~~~~~~~~~~
14
तुझे माझे मार्ग बदलले
वलयांकित आयुष्य जाहले
.
.
अन एकांती तुझ्या आठ्वणींचा कल्ला
~~~~~~~~~~~
15
नुपूर झंकारती मनाच्या गाभा~य़ात
मंजुळ शांतता धुंद सख्याच्या बाहूंत
.
.
श्वासांत न उरले अंतर
~~~~~~~~~~~
16
मृगजळ हाती येत नाही
धावणे तरीही थांबत नाही
.
.
मनाची तहान ,नजरेने रचले खेळ
~~~~~~~~~~~~~~~~
17
क्षितिज स्वामी एक साक्षी
प्रेम त्याच्या डोळ्यांत पाहिले
.
.
पापणींची पाखरे नाही हलली
~~~~~~~~~~~~~~
18
लग्नाआधी तारे-चंद्र तुझ्यासाठी आणिन
लग्नानंतर चंद्रासारख्या पो्ळ्या तुझ्यासाठी लाटेण
.
.
प्रेमासाठी वाटेल ते करेन ’वचन द्यायच’
~~~~~~~~~~~~~~~~
19
पारिजातक रात्री फ़ुलतो
आठवणी देत पहाटे रडतो
.
.
गंध त्याचा कसा विसरतो?
~~~~~~~~~~~~~
20
नाजुक कळ्या ओंजळित देऊन ...हसला
डोळे मिटून गंध ह्र्दयात साठवत होते...हरवला
.
.
फ़ुले प्रश्न विचारित सतावितात
~~~~~~~~~~~~~~~
21
जवळी उभी कविता
अभागी तो काव्यसंग्राह वाचे
.
.
काव्य शब्द नशिबाला हसे..
~~~~~~~~~~~~~~~
22
जीवनाच्या वाटॆवर तुझी भेट
ह्र्दय हरवलेय,तुझ्यात धडधडते ते थेट
.
.
आता मी सर्वार्थाने जगायला शिकतेय
~~~~~~~~~~~~~~
23
एका श्वासांचे अंतर
माझ्यात तु अन तुझ्यात मी.
.
.
.
एक झाले दोन मन खोलवर.....
~~~~~~~~~~~~~~~~
24
त्या झाडाआड पालापाचोळा पसरलेला
सोसाट वा~याने उड्तांना आवाज चिरकला....
.
.
.
.
एकांत असाच कर्कशात जळतो.....
~~~~~~~~~~~~~~
25
नाही समजल किती दूर आले
हातातल्या माळेतुन किती मोती गळाले
.
.
.
.
त्याच्या डॊळ्यात पाहत चालताना .
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
26
ते झाडांना नाही हालवत
ते पाण्याला नाही थांबवत...
.
.
.
विचार’ मन का चंचल करतात?....
~~~~~~~~~~~~~~~~~~
27
त्या वाटेवर फ़ुले घेऊन
ती उभी केव्हाची थिजून
.
.
तो नाही येणार फ़ुलांनाही माहीत नव्हत...
~~~~~~~~~~~~~~~
28
तुझ्यासाठी अश्रू कोरडे वाहतात
ह्रदयात कणसूर स्वर कंपतात
.
.
छे!तुझी आठवण मात्र पाठ सोडत नाही...
~~~~~~~~~~~~~~~~~
29
यशाच्या पारंब्या होत्या
हाताशी त्या येत नव्हत्या..
.
.
खुज्या मनोवृत्तीची तेवढी उंचीच कुठे?
~~~~~~~~~~~~~~~~~~~
30
तिच हासू एक खळाळता झरा
तिचे अश्रू जणू प्राजक्ताची फ़ुले
.
.
ती होती का?मीरा?
~~~~~~~~~~~~~~~~
31
सागराकडे येतांना लाटा होती बेभान
पोचता किना~याशी होती संथ रममाण.....
.
.
प्रेमात निशब्दपणे कुर्बान.

No comments: