Friday, November 26, 2010

कविता रसग्रहण

भाषा आणि काव्य

भाषा ही संकल्पनांची रचना करणारी,आपल्या विचारांना रूप देणारी आणि त्याच बरोबर त्या रूपा‍ची निर्मिती करणारी गोष्ट आहे.
बाह्य वस्तू किंवा घटना व आपले मन यांबद्दल आपण जी व्यवस्था लावतो तिला त्या वस्तूंची,घटनेची किंवा मनातील घडामोडींसंबंधीची संकल्पना म्हणता येईल.वस्तूंबद्दल सरळ ,सोपे व प्राथमिक अनुभव आपणांस येत असतात.त्यांच्या संवेदनात्मक,भावनात्मक घटकांचे परस्परांशी नाते जोडून खूप गुंतागुंतीच्या काही पातळींवरल्या व काही प्रमाणात अमूर्त संकल्पना आपल्या मनात घडत जातात.काही नियम संकल्पनांच्या जडणघड्णींवर प्रकाश टाकतात:
१.माणूस स्व:ताला व स्व:ताच्या अनुभवघटकांना जाणून घेऊ शकतो.
२.दोन अथवा अधिक वस्तू समोर आल्या की माणूस त्यांच्यातील संबंध जाणून घेऊ शकतो.
३.एक वस्तू व एक संबंध दिला गेल्यास माणूस दिलेल्या संबंधाच्या आधारे दुस~या तत्संबंधे वस्तूची कल्पना करू शकतो.
यांतील दुसरा नियम संकल्प्नांच्या जडणघड्णीच्या दृष्टीने व तिसरा नियम नवनिर्मितीच्या महत्वाचा आहे.
विचार हे मानसिक,भावनेशी जोडलेले असतात.:वस्तू व घटना यांचा एका विशिष्ट पद्ध्दतीने संबंध जोडून केलेला गट म्हणजे मानसिक संदर्भ होय.या घटकांचे वैशिष्टय़ असे की इतर समान गुणधर्माच्या वस्तू अगर घटना समोर आल्या की त्या या मानसिक संदर्भाशी जोडून घेतात.

No comments: