
कपडे धुण्याचे गाणे..
भरभर वरती फेस उसळतो
खळखळ हसते साबणपाणी
धुणी धुते मी लख्ख पांढरी
आणिक गाते मजेत गाणी
चुबकुन पिळून घड्या घालुनी
हळूच टाकते तारेवरती
मजेत झुलती कपडे सुकती
ऊन तळपते वारे फिरती
मनामनांवर कपड्याऐंशी
धूळ साठते डागही पडती
कसे उरावे कलंक परि ते
निळ्या नभांतिल तेजापुढती?
उद्योगी रत असता मानव
शोकाला नच मिळतो थारा
फुले फुलविती हसुन तयाला
आणि उजळती प्रकाशधारा
डोके करू दे विचार आणिक
सुख दु:खाने हृदय भरावे
एक मागणे देवाजवळी
हातांनी पण काम करावे
संदर्भ:चारचौघी
(अनुवादित:शांता शेळके)
मला जर कोणी सांगितले असते की कपडे धुण्यावर गाण आहे,तर मी समोरच्याला वेड्यात काढले असते.चारचौघीमधील अनेक मुक्तछंदातील कवितांपैकी ही एक कविता\गाण आहे.
ह्या कवितेला उपजतच एक लय आहे,त्यामुळे ही कविता \गाण ध्यानात राहते.
मनामनांवर कपड्याऐंशी
धूळ साठते डागही पडती
कसे उरावे कलंक परि ते
निळ्या नभांतिल तेजापुढती
ह्यात मस्त comparison केल आहे.कपड्य़ांवरील डाग ज्याप्रमाणे सुर्यप्रकाशात धुण्यानंतर नाहिसे होतात,त्याप्रमाणे माणसाच्या मनावरील धूळ,कलंक अंधारत-वाईट वातावरणात,लपले,तरीही सत्याच्या तेजापुढे समोर येऊन नाहिसे होतात....
मराठित एक अभंग आहे या आशयाचा...मला सापडल्यावर येथे देइल.
शेवटच्या दोन कडव्यांत कमालीचा आशादायी विचार मनाला सुखावून देतो.कार्यमग्न,उद्योगशीलता हीच यशाची आणि आयुष्याच्या सकारात्मक प्रवाहाची जननी आहे हे हातांनी गाण लिहून सहज पट्वून दिले आहे.धन्य हे गाण!!!!!
-भक्त्ती.
No comments:
Post a Comment