Friday, November 26, 2010

कविता रसग्रहण

शब्द?

शब्द?
ही व्याख्या दोन अर्थांनी वापरली जाते.

१.विशिष्ठ ’उच्चार’ या अर्थाने
उदा.घण घण ..असा नाद करणारी घंटा हा शब्द.
२.विशिष्ठ अर्थ व्यक्त करणारा उच्चार या अर्थाने.
उदा.घोडा,पक्षी इ. म्हणताच तो प्राणी त्याबद्दल सर्व मानसिक संदर्भ जोडून शब्द जोडला जातो.

शब्दाला नादाचे अंग असते अणि ते आपण शब्दोच्चारातून प्रकट करतो.

तसेच शब्दाला अर्थाचे अंग असते ते तो शब्दोच्चार होतोच किंवा तो शब्दोच्चार इतर शब्दोच्चारांच्या समवेत होताच (म्हणजे वाक्य ऐकताच) प्रकट होते.

सुधीर रसाळ
(कविता आणि प्रतिमा)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शब्दांतील रूपकप्रक्रिया:

शब्दांतील रूपकप्रक्रिया:

रूपके:वाच्यार्थ व आत्मिक अर्थ यांची प्रतीती एकाच क्षणी घदल्याने वाच्यार्थबोधक शब्द त्याच क्षणी आत्मिकार्थबोधक म्हणून -रूपक म्हणून - वापर्ता येणे शक्य आहे(.-बारफ़ील्ड.)
उदा.स्पिरीट शब्द उच्चारताच वाइन्ड हा भौतिक अर्थ आणि आत्मिक अर्थही रूपकप्रकियेतून मिळतो.

अमूर्त संकल्पना तयार करण्याची शक्ती व रूपके घडवण्याची शक्ती या दोन्ही मानवाच्या नैसर्गिक शक्ती आहे.
अमूर्त संकल्पना घडविण्याच्या शक्तीतून प्राथमिक अमूर्त संकल्प्नांतून अतिशय गुंतागुंतीच्य अमूर्त संकल्पनेकडे मानव गेल आणि आपला सांस्क्रुतिक व भौतिक विकास त्याने साधला.

एका मानसिक संदर्भाच्या जाळ्यात दुसरा नवा अनुभव पकडणे म्हणजे तो मानसिक संदर्भ संबोधण्यासाठी वापरला जाणारा उच्चार नव्या अनुभवासाठी वापरणे होय,म्हणजेच रूपक वापरणे बनवणे होय.
उदा.टोपी\टोप डोके झाकणा~या वस्तू.याचा आधारे पेनाची निब झाकणा~या वस्तूस आपण टोपण म्हणतो.
आपल्या विचारप्रकियेत व त्यामुळे भाषेत निसर्गत:च रूपकप्रक्रिया असल्यामुळे आपले भाषिक व्यवहार किती तरी सुलभ झाले आहेत.
साधारणत: दोन वस्तूंच्या अंगभूत वैशिष्ट्याअंमधील साम्यविरोधारे आपण रूपके घडवतो.

-भिन्न वस्तू व घट्ना त्यांच्या समान गुणधर्मांना एकत्र करण्याची ही जी रूपकप्रक्रिया आहे ती अपरिहार्यपणॆ संवेदनात्मक व भावनिक असते.
उदा.स्त्री मुकास ’चंद्र’ म्हणतो तेव्हा.चंद्राची संवेदन आणि स्त्री मुखाच्या संवेदना साधर्म्य प्रस्थापित होतो.व चंद्र दर्शनातील आल्हाद भावना व स्त्री मुखाच्या दर्शनातील भावना यांचे नाते प्रस्थापित करतो.

-रूपकात संवेदना व भावना हे मानसिक संदर्भातील दोन घटक सहभागी होत असतात .म्हणूनच आपण रूपकातील विशिष्ट् शब्दांऐवजी पर्यायी शब्द वा स्पष्टीकरण वापरू शकत नाही.उदा.घोड्तोंड्याऐवजी अश्वमुख हा शब्द वापरू शकत नाही.

सुधीर रसाळ
(कविता आणि प्रतिमा)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~`

शब्दांतील नादरचनेतील रूपक प्रक्रिया

शब्दांतील नादरचनेतील रूपक प्रक्रिया

तीन साले शाळेची,
तीन साले वेळेची,
तीन साले चाकूची
तीन साले डाकूची
तीन चोक तेरा
एक चाकू मारा.
डाकू डाकू डाकू,
धारवाला चाकू
पोलाडाचे पान
टोक झाले छान!
-विंदा करंदीकर

ह्या ओळींतील गतिमानता ,उच्चारातील नैसर्गिक आरोह अवरोह ,प्रत्येक शब्दाच्या उच्चाराला लागणारा काळ या सर्वामुळे आपणांस पेन्सिलचे टोक करताना जे क्रिया करावी लागते.ती ज्या गतीत ,तालात होत असते,तिचा प्र्त्यय येत राहतो.
या दोन्ही ठिकाणी शब्दांच्या नैसर्गिक उच्चारातून निर्माण झालेल्या लयबद्धतेत एक रूपकप्रक्रिया घदली आहे.या लयबद्धतेतील नादांचे गुण्धर्म आपणांस अन्य रूपातीतील,अन्य संवेदनशील काही घटनांचा ,अनुभवांचा व भावनिक ताणांचा प्रत्यय घडवित असते.

-सुधीर रसाळ
(कविता आणि प्रतिमा)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

क्रियाविशेषणव्यये:

क्रियाविशेषणव्यये:

गर्द दाट मधली झाडी।मंद मंद हलवा थोडी,
पराग ,सुमने हसलेली।नीट बघ पायाखाली,
पुष्पांचा बसला थाट।हळू हळू काढा वाट,
गोड सुवासाचे मेघ ।आळसले जागोजाग;
हिमकणिका त्यांच्या पडती।गोद गोड अंगावरती;
पुनीत ही गंगामाई।स्नान करा झटपट बाई.
-बालकवी

यात मंदमंद,थोडी ,नीट,हळूहळू ,झटपट ही क्रिया विशषणव्यवे अप्सरांच्या कॄतींची चित्रे रेखाटीत आहेत.
परागांना दुखापत हौउ नये म्हणून पायाखाली नीट पाहणा~य़ा’हळूहळू’वाट काढणा~या या अप्सरा
‘मॄदू मनाच्या आहेत हे आपल्या लक्षात येते.म्हणूनच त्यांच्या ‘कृतीच्या पद्धती त्यांच्या मनो‘वॄत्तीच्या प्रतिमा बनल्या आहेत.
अनेकदा ही अव्यये रूपक म्हणूनही वापरली जातात.

सुधीर रसाळ
(कविता आणि प्रतिमा)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

वर्णनपर ,उभयान्वयी रूपकप्रक्रिया:

वर्णनपर ,उभयान्वयी रूपकप्रक्रिया:

-जरा पुढे अन असे वळा ,मग
पुन्हा असे, अन तिथेच ते घर;
बघा खुणेला समोर आहे
सोनतु~यावर पिवळा मोहर

.
तेव्हापासून ....
लाल धुळीतिल ती पदचिन्हे-
मनांत टिपला हिशोब त्यांचा
आभाळाने,सोन तु~याण्ने,
कुणी कुणी अन....
-इंदिरा संत

पहिल्या चार ओळींत घराच्या पत्त्याचे केवळ वर्णन आहे.परंतू आपण जेव्हा दुस~या कडव्याकडॆ वळतो तेव्हा मात्र पहिल्या कडव्यातील वर्णन प्रतिमा बनते.
या मार्गावर 'वळणे' आहेत-सुख्दु:खाची,आशानिराशांची.
परंतु शेवटी ही वळणे चालून गेल्यावर 'घर' लागते तेथे पिवळ्य़ा मोहराने फ़ुललेल्या सोनतु~याची खूण आहे.आता 'घर' आणि 'सोनतुरा' यांनाही रूपकत्व प्राप्त झाले आहे.
पहिल्या दोन ओळींतील अन या शब्दाच्या जागाही लक्षात घेण्याजोग्या आहेत.येथे जणू प्रेमाच्या प्रवासात्ले थबकणे सूचित होत आहे’.
’अन’ या उभयान्वयी अव्ययायाला कवयित्रेने दिलेला ह अर्थ रूपप्रक्रियेतूनच जन्मलेला आहे.

सुधीर रसाळ
(कविता आणि प्रतिमा)

No comments: