Thursday, June 28, 2007


वाहवत 'मन'

मखमलीच्या पेटित राखुन
सोन्याच्या कोंदणात जखडुन
डोहाच्या भवर्‍यात लपवुन
किती ठेवले.....पण वाहवत 'मन'

चारचौघात रेशमाने सजवुन
अंधारात घट्ट कवटाळुन
मुठमोहर्‍या त्यावरुन ओवाळुन
किती ठेवले.....पण वाहवत 'मन'

मुक्त तार्‍यात आनंदुन
खोटे-खरे येथे तेथे हिरमुसुन
निचरा होऊस्तोर पिळवटुन
किती ठेवले.....पण वाहवत 'मन'

सारीपाटाच्या घरांत अडकवुन
कोसळणार्‍या आवेगाला घाबरुन
मुठीत वाळुसारखे पकडुन
किती ठेवले.....पण वाहवत 'मन'
.
.
.
वाटते द्यावे,तुला पंख परीचे
बळ या सागरात वल्हवाचे
वाहवत जा...काय माहीत...
'कल हो ना हो'!
@भक्ती.