Thursday, January 6, 2011

प्रीत बहरली


प्रीत बहरली

पुनव चांद चांदणी
नदीत उतरली,
निखारे उठे जनलज्जा
त्यान जाळली
प्रीत बहरली...॥१॥

डहाळी फ़ुलाफ़ुलांची
रानात मोडली,
सुगंधात या,जन्माची
साथ जोडली
प्रीत बहरली...॥२॥

मखमली हवा मस्त
वेडात नाचली,
नशा ही,जशी जादू
मनमीत न्हाहली
प्रीत बहरली...॥३॥

तुझे धुंद स्वास ओले
रात गोठली,
सतावू नको,मिठीत तू घे
प्रीत बहरली
प्रीत बहरली...॥४॥

-भक्त्ती
(२८\१२\१०)