Saturday, November 27, 2010

कविता रसग्रहण


एकटी

मी एकटीच माझी असते कधीकधी
गर्दीत भोवतीच्या नसते कधीकधी

येथे न ओळखीचे कोणीच राहिले
होतात भास मजला कधीकधी

जपते मनात माझा एकेक हुंदका
लपवीत आसवे मी हसते कधीकधी

मागेच मी कधीच हरवून बैसले
आता नकोनकोशी दिसते कधीकधी

जखमा बुजून गेल्या सा~या जुन्यातरी
उसवीत जीवनाला बसते कधीकधी
-सुरेश भट

गझल,वृत्त्,गा ल गा काय आहे?असे अनेक प्रश्न...यांची उत्तरे मिळाली 'एल्गार'हाती आल्यावर.अजुनही मी एल्गारमध्येच आहे.कधीही कोणतेही पान उलगडले की एक अप्रतिम गझल...आणि नविन शोध हाती येतो.
पान क्र. ४५ वरील ही गझल वाचली.हरवलेल माझ एकटेपण हातात आल्याच आनंद होतो.आयुष्यात जबाबदारी,कर्तव्य यातून वाट काढत पुढे जात असतांना एक गुंता निर्माण होतो.....नात्यांचा,भावनांचा,मैत्रीचा,आकांक्षा-अपेक्षांचा,विश्वासाचा....मानवी जीवनासाठी हे श्रेयस्करच आहे.पण ;दिल ढूंड्ता है फिर वही फुरसत के रात दिन 'अशी अवस्था होते.

मी एकटीच माझी असते कधीकधी
गर्दीत भोवतीच्या नसते कधीकधी

हा शेर माझ्या पहिल्या कवितेची आठवण करून देतो.यात समग्र एकलेपणाची आठवण राहते.'मी माझी'यातून प्रगट होते.सर्वांत आवडता शेर.

येथे न ओळखीचे कोणीच राहिले
होतात भास मजला कधीकधी

जपते मनात माझा एकेक हुंदका
लपवीत आसवे मी हसते कधीकधी

ही अवस्था तर हजार वेळाहोत असते.मनात हुंदका जपून ओठावर हसू फुलवून जो जीवन जगण्याचे हे गमक प्राप्त करतो,त्याला या जीवनात कशाचीही कमतरता भासत नाही.

मागेच मी कधीच हरवून बैसले
आता नकोनकोशी दिसते कधीकधी

जखमा बुजून गेल्या सा~या जुन्यातरी
उसवीत जीवनाला बसते कधीकधी

ह्या दोन्हीही शेर मधील पहिला मिसरा नायिकेच युद्ध स्व:तहाशी दाखविते.एकटेपणाची परिसीमा दिसते.जे क्षण गेले ,जगून गेले ते पुन्हा परतने अशक्य....दुस~या मिसरातही पराकोटीचा एकटेपणा ठायी ठायी भरला आहे.......परंतू एवढा एकलेपणा जीव गुदमरून टाकेल की......
या कारणामुळे तीन शेर अधिक प्रिय आहेत.रंग माझा वेगळा हाती पडल्यावर काय होईल याची धड्कीच भरते.
सुरेश भट यांचा वट्वृक्ष मराठीला संपन्न करून गेला.

आणखिन आवडत्या गझल:

एल्गार
तुझ्यासाठी
वाटचाल
यार हो!
एवढेतरी
भेट
जगणे
शब्द येतील!
केव्हा तरी पहाटे
उजाडल्यावरी सख्या
कुत्रे
आभार
भल्या पहाटे निघून आले
सुन्या सुन्या मैफलीत
केव्हा तरी पहाटे.

No comments: