डेस्कवर सगळ टापटीप ठेऊन ताज्या फुलांना मनभर न्याहाळून प्रियांका कामाला लागली.प्रियांका ,बड्या कंपनीत उच्चं पदावर ,ऑफिसमधली सर्वांत हुशार एम्प्लॉयी ....पण थोडीशी काळी सावळी ,नाकावरती चष्मा. लग्नासाठी स्थळांची नकारघंटा.
आज एक महत्वाची क्लायंट मीटिंग होती. प्रेसेंटेशन प्रियांका करणार होती. ती आली,आत्मविश्वासाने प्रेसेंटेशन करू लागली. फाईलमध्ये मग्न असलेल्या समीरचे लक्ष तिच्याकडे गेले. समीर सीईओ होता. प्रेसेंटेशन यशस्वी झाले.प्रियांकाचे अभिनंदन करायला स्वतः समीर गेला... दोघांत छान गप्पा झाल्या.
संध्याकाळी घरी कांदापोह्याचा कार्यक्रम पाहून प्रियांका स्तब्ध ...चल ग म्हणाली.. समोर समीरला पाहून प्रियांका आश्चर्यचकित झाली.समीरने मागणी घातली,म्हणाला "दुपारी तुझ्या एका उत्तराने मी भाळलो ,की रूपाने नाहीतर गुणांनी माणसाने स्वतःचे फेव्हरेट असावे ",प्रियांका म्हणाली "हो आहेच मी माझी फेव्हरेट कारण मी एक राजहंस."
@भक्ती जामगांवकर