Friday, February 16, 2024

मुळा चटणी, पराठा,सैलड

 


#आजचामेन्यू
#मुळा
#radish
#countbiomolecule

हरभरे भिजवलेले होते तेव्हा रविवारी भिजवले होते तेव्हा विचार केला की हरभरे भिजवले होते तेव्हा विचार केला की मुळ्याचे काहीतरी करूया. मुळ्याचा ठेचा/ मुळ्याची चटणी करायचा ठरवलं.

त्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं आहे सर्वप्रथम भिजवून उकडलेले हरभरे पाहिजे.किंवा केवळ भिजवलेले हरभरे आपण वापरू शकतो. किसलेला मुळा दोन वाटी,हिरवी मिरची जिरे, लसूण पाकळ्या.

पहिल्यांदा फोडणी दिल्यानंतर मुळा आणि हरभरा मिरची सह आणि लसणासह चांगला परतून घ्यायचे आहेत आणि हे परतलेले जिन्नस मिक्सर मधून वाटून घ्यायचे आहेत. आता ज्यांना ज्यांना ठेचा/चटणी आवडते त्यांनी भाकरीसोबत खाण्याचा आनंद घ्या.



आता तुमची मुलं मुळा खात नाही ना?? हे तुम्ही म्हणतच असाल तर त्याला आता आपण करूया मुळ्याचे पराठे. हा तयार मुळ्याची चटणी आहे ती पराठा करताना आपण वापरू शकतो. गव्हाच्या पिठातल्या उंड्यामध्ये आपण हे सारण भरून त्याचे पराठे खरपूस असे भाजून घेऊ शकतो. लहान मुलांना खायला देऊ शकतो.



आता काही घरी डायट वाले पण मंडळी असतील व त्यांच्यासाठी  सॅलेड बनवू शकतो मुळा आणि हरभऱ्याचे. हेच जे हरभरे आहेत ते उकडून घेतले असतील उकडताना सर्वांना माहितीच आहे की त्यामध्ये एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद हिंग तमालपत्र अशा गोष्टी टाकून त्यामध्ये अजून त्याची पौष्टिकता किंवा त्याची चव आपण वाढवू शकतो.


सॅलेड तयार करण्यासाठी ज्या आपल्याला अजून भाज्या लागतात त्या म्हणजे चिरलेला टोमॅटो, चिरलेला थोडासा कांदा ,किसलेला मुळा आणि आत्ताच सीजन जो आहे त्या सीझनमध्ये मिळणाऱ्या कैरीच्या आपण थोडे थोडे फोडी करून घेऊया आणि त्याचबरोबर एक वेगळी टेस्ट म्हणून त्याच्यामध्ये आंबट गोड अशी टेस्ट म्हणून त्याच्यामध्ये ताजे द्राक्षे काप करून टाकायचे आहेत.
म्हणजे एक वेगळीच चव लागते त्यामध्ये तिखट मीठ टाकायचं आहे कैरी असल्यामुळे लिंबाची गरज नाही.

पण तरीही जर आवडत असेल तर दही चांगले फेटून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये हे तयार झालेले सॅलेड टाकायचे आहे. असेही खाऊ शकता एक वेगळे चाट मसाला टाकून त्याची छान चाट ही तयार होतं


-भक्ती

Tuesday, February 6, 2024

आधुनिक जीवशास्त्राची साधने - जनुककोशशास्त्र (Genomics)

 



आधुनिक जीवशास्त्राची साधने - जनुककोशशास्त्र (Genomics)-

लेखक-असीम अमोल चाफळकर 

सध्याच्या युगात जैविक संशोधन हे येणार्या पिढ्यांसाठी वरदान ठरणार आहे.त्यासाठी नवीन तंत्रज्ञान त्यांचा वापर कसा केला जातो हे पुस्तकात सांगितले आहे.

ज्याप्रमाणे भाषा हे संवादाचे, माहितीचे साधन आहे.जी मानवनिर्मित असते.तसेच निसर्गनिर्मित भाषा डीएनए जिची मुळाक्षरे  AGCT/U आहेत.या मुळांपासून संपूर्ण सजीवांचा उत्क्रांती पासूनचा ग्रंथच जीनोम स्वरूपात लिहिला गेलाय.जो अभ्यासाठी सिक्वेन्सिंग, डेटाबेस हे महत्त्वाचे टप्पे आहेत.जे या पुस्तकात रोचक पद्धतीने सांगितले आहे.

सर्वप्रथम डीएनए म्हणजे काय कसा बनतो.त्यापासून‌ पुढे प्रथिने वगैरे सांगितले आहेच पण जंक /रद्दी डीएनए बद्दल भरपूर उहापोह केला आहे.पुढे संगरने रचिला पाया थर्ड जनरेशन सिक्वेन्सिंग झाला कळस उक्ती सार्थ करणारा सिक्वेन्सिंग/अनुक्रमण पद्धती स्पष्ट केली आहे.ते तंत्रज्ञान इतके प्रगत होत गेले की काही लाखांचा खर्च काही हजारांत आणि हातावर मावेल इतक्या छोट्या यंत्रापर्यंत पोहचला आहे.पुढच्या प्रकरणात ही जनुक अनुक्रमण  माहिती एकत्रित करण्याची पद्धत डेटाबेस जीनबैंक एनसएंबल कसे काम करतात हे सांगितले आहे.

पुढील तीन प्रकरणात शास्त्रज्ञांच्या मुलाखतीद्वारे जनुककोशशास्त्र आणि समावेशी सजीवसृष्टी, कृषिक्षेत्र, वैद्यकीय क्षेत्रातील त्याचे उपाययोजना अनेक उदाहरणं सहित वाचण्यासाठी मनोरंजन आहे.

जसे मुंगी कशाप्रमाणे कित्येक कोटी वर्षांपासून बुरशीची शेती करते.

कशाप्रकारे 'क' जीवन सत्व करण्याची क्षमता मानव हरवून बसला.

लुकाचा जनुककोश शोधायचे प्रयत्न ,काही अंतराळात,रेडिएशन मध्ये जगू शकणार्या सर्वशोशिक जीवांचे जनुककोश कसे फायदेशीर होऊ शकतील.

कृत्रिम जनुककोश -न्यूनतम जनुककोश तयार करतानाच प्रवास म्हणजे केवळ आवश्यक प्रथिने/घटक तयार करणरेच जनुकं वापरत जास्तीचे जनुक कमी करत जाणे.

QTL अनुक्रमण हे जीबी आणि जनुककोशशास्त्र द्वारे सहज होऊन नवीन वाण तयार होण्याचा काळ ८-१० वर्षांहून कमी होत २-३ वर्षे होऊ शकतो हे स्पष्ट करतना भारतीय हरभरा पिकाचे संशोधन खोलवर सांगितले आहे.

वैद्यकीय क्षेत्रात सार्स  चे वेगवेगळे ७३ प्रकार COVIDSeq पद्धती कशी विकसित केली गेली दिसून येते.

लेखक असीम चाफळकर यांनी सद्य स्थितीतील जनुककोशशास्त्रातील संशोधन,त्यातील भारतीय संशोधक केंद्र CSIR,PUSA तेथील संशोधकांचे  यांचे मोलाचे योगदान समजतेने दृष्टीस पाडले आहे.

पुस्तकात इंग्रजी शब्दांसाठी अनेक मराठी शब्द लीलया सुंदर पद्धतीने वापरले आहेत.जनुकोशशास्त्र हा शब्द आधी जनुकसंचित जरासा क्लिष्ट होता.तसेच क्लाऊड साठी माहितीमेघ,म्युटेशनसाठी उत्परिवर्तन,मैक्रोमोलिक्यूल महारेणू ,बेसपेअर स्केल-जनुकीय मोजपट्टी,प्रायमेट कपीकूळ. आकर्षक मुखपृष्ठ पुढेही योग्य अशी असंख्य छायाचित्रे, तुलनात्मक तक्ते यांची रेलचेल आहे.

खुप दिवसांनी आधुनिक संशोधनपर पुस्तक वाचल्याचे समाधान मिळाले.

-भक्ती