Friday, November 26, 2010

कविता रसग्रहण

पिवळा साज

पिवळा साज

पिवळीच मी पाकोळी की
पिवळेच कृष्णनाथ चाफ्याची कळी
पिवळे पात्ळ बारिक गवती
पदरावर शेवंती की
पिवळ्या चोळिवर जडली मोती
पिवळ्या किनारीवरती की
पिवळी बनून आले श्रीहरीजवळी
पिवळिच मी पाकोळी की
-अनामिका
संदर्भ:( स्त्रीगीत-रत्नाकर )
निसर्गोत्सव
लेखिका:दूर्गा भागवत.

या ओळी वाचून दूर्गा भागवत यांना अलौकिक आनंद झाला.पाकोळीसाठी कोणिही सरस लिहले नाही. त्यांची ही खंत ह्याो ळी वाचून संपली.हे स्त्री गीत आहे असे त्यांनी उल्लेखले आहे.
खरच इवलिशी पाकोळी पिवळी सोनकळी जणू चाफ्याचिच.त्या चाफ्यावर आनंदाने बसते.(चाफ्याचा गंध भ्रमर घेत नाही!!!!!)पाकोळी गवतांवत हिंडते..जणू हे पिवळे सुंदर पातळ आहे,ज्याच्या पदरावर शेवंतीची सोनपिवळी वेल आहे.धार्ण केलेली चोळीही सोन्यासारखी धम्म पिवळे सोन रंगाची आहे की जिच्या किनारीवरती मोती जडले आहेत ,जे लख्ख रंगाचे आहेत.
आणि शेवटी...
पिवळी बनून आले श्रीहरीजवळी
पिवळिच मी पाकोळी की
या ओळी भास निर्माण करतात...
वाटते गोपिकाच सुंदर पिवळी चोळी,तसाच पिवळा पदर जरतारी किनारीचा असे सोन्यासारखे वस्त्र परिधान करून हरी चरणाशी आली आहे.ती पाकोळी भासत आहे.
का?पिवळी पाकोळी हरी चरणाशी आली आहे..
-भक्त्ती.

No comments: