Friday, November 26, 2010

"कहा गया उसे ढूंडो" -"त्याला शोधूया"


"कहा गया उसे ढूंडो" -"त्याला शोधूया"

सैरभैर वा~यासारखा होता तो....
स्वछंदी उडणा~या पतंगासारखा होता तो....
कुठे आहे गेला तो?
त्याला शोधूया....
त्याला शोधूया....

आम्हांला वाटा पुढे ओढायच्या
तो स्वत: त्याच्या वाटा बनवायचा
पडायचा..धडपडायचा....
धुंदीने तो पुढे चालायचा....

आम्हांला सतत उद्याची चिंता सतावयची
तो फ़क्त "आज-आताचा" उत्सव करायचा
प्रत्येक क्षण तो सोहळ्यासारखा जगत....

कोठून आला होता तो....?
त्याला शोधूया....

पोळणा~या उन्हाच्या झळांमध्ये सावलीसारखा
रणरणत्या वाळवंटी गजबजलेल्या गावासारखा
हळूवारपणे मनाच्या जखमा भरणा~या एखाद्या मलमासारखा....
.
.
आम्ही अस्वस्थपणे एखाद्या विहरीत पडायचो
तो खळखळत्या नदीत मनसो्क्त डुंबायचा
तो प्रवाहाच्या विरूद्ध धारांशी लढत पोहायचा
भन्नाट अवखळ वाराच होता तो....
यार आमचा होता तो....
कुठे गेला आहे तो?
त्याला शोधूया....
त्याला शोधूया....
-भक्त्ती

थ्री इडियट मधील "कहा गया उसे ढूंडो" ह्या माझ्या आवडत्या गाण्याचा स्वैर मराठी भावानुवाद केला आहे.

No comments: