Saturday, November 27, 2010

शिशिरागम-rasgRAhan

शिशिरागम-rasgRAhan

शिशिरर्तुच्या पुनरागमे,
एकेक पान गळावया
का लागता मज येतेसे
न कळे उगाच रडावया.
पानांत जी निजली इथे
इवली सुकोमल पाखरेअ,
जातील सांग अता कुठे?
निष्पर्ण झाडित कापरे!

फुलली असेल तुझ्या परी,
बागेतली बकुलावली;
वाळूत निर्झर बासरी;
किती गोड ऊब महीतली?
येतील ही उडुनी तिथे,
इवली सुकोमल पाखरे,
पानांत जी निजली इथे,
निष्पर्ण झाडित कापरे!
पुसतो सुहास,स्मरूनिया
तुझ आसके,जरि लागले
एकेक पान गळावया
शिशिरर्तुच्या पुनरागमे.

बा.सी.मर्ढेकर
संदर्भ:शिशिरागम.
मर्ढेकरांच्या कविता.
~~~
शिशिरागम-rasgRAhan
मर्ढेकरांच्या समग्र कविता वाचतांना त्यांच्या शब्द संपदेपुढे शब्द गुंफणात आकाश ठेंगणेच आहे.

पानगळीच्या कविता वाचून मनात आठवणींचा पाचोळा होतो..या पानगळींनी...ऋतुचक्राच्या या वलयाने कवींच्या मनात भावनेचे कल्लोळ अनंत काळापासून केलेले आहे.

शिशिर ऋतुंचा सोहळा गर्द काळोखात घेण्यासाथीच येतो जणू.

एक एक झाडाला घट्ट बिलगलेले,घरट्यातील पिलांच्या चिवचिवाने,वर्षासरींनी तृप्त झालेले पान ह्या झाडांचा निरोप शिशिर आगमनाने घेतात..आणि तो त्याच्या पोता~यात सारी पाने भरत राहतो..
पण ही ऋतुची वलये जी झेलती ती सृष्टी निष्पर्ण झाडांकडे पाहते आणि तिला नकळत गळणारी तिची आसवे रोखता येत नाही..

सुखात राहणारे पंख फडफडतात नव्या दिशेने...भीतीचे सावट आकाशाला देत पोचतात ..फुलांनी डवारलेल्या सीमित जगात..जिथे भीती पानगळीची नाहिशी होईल गोड क्षणिक बासरीचे स्वर त्या६नाअ धुंदावतिल...
पण ह्या गारव्याने ...पानगळीचे सृष्टीचे अश्रू थांबतिल का?शिशिर येतच राहिल दर्वेळी आणि आसवे नकळत टपटपतिल...

भक्त्ती.

No comments: