Wednesday, December 18, 2019

वेदना

का सोडवावा गुंता साऱ्या भावनांचा
नको मोकळा धागा हसर्या वेदनांचा

अनाहूत अन् थोपवलेले क्षणांचे पसारे
काळजाला ठिगळ् बावऱ्या श्वासांचा

गुंतलेले पाऊले देती हेलकावे मनाला
गुंगी मदिरेचि समज साऱ्या जगाचा
 
कुठे सोडलेले नाव नव्या वळणावर
पुन्हा गुंतले चक्र फिरणार्या उमाळ्याचा

Wednesday, November 27, 2019

मी एक राजहंस

       डेस्कवर सगळ टापटीप ठेऊन ताज्या फुलांना मनभर न्याहाळून प्रियांका कामाला लागली.प्रियांका ,बड्या कंपनीत उच्चं पदावर ,ऑफिसमधली  सर्वांत हुशार एम्प्लॉयी ....पण थोडीशी काळी सावळी ,नाकावरती चष्मा. लग्नासाठी स्थळांची नकारघंटा.
               आज एक महत्वाची क्लायंट मीटिंग होती. प्रेसेंटेशन प्रियांका करणार होती. ती आली,आत्मविश्वासाने प्रेसेंटेशन करू लागली. फाईलमध्ये मग्न असलेल्या समीरचे लक्ष तिच्याकडे गेले. समीर सीईओ होता. प्रेसेंटेशन यशस्वी झाले.प्रियांकाचे अभिनंदन करायला स्वतः समीर गेला... दोघांत छान गप्पा झाल्या.
           संध्याकाळी  घरी कांदापोह्याचा  कार्यक्रम पाहून प्रियांका स्तब्ध ...चल ग  म्हणाली.. समोर समीरला पाहून प्रियांका आश्चर्यचकित झाली.समीरने मागणी घातली,म्हणाला "दुपारी तुझ्या एका उत्तराने मी भाळलो ,की रूपाने नाहीतर गुणांनी माणसाने स्वतःचे फेव्हरेट असावे ",प्रियांका म्हणाली "हो आहेच मी माझी फेव्हरेट कारण मी एक राजहंस."

@भक्ती जामगांवकर

Monday, November 25, 2019

निर्णय


                  'निर्णय ही  एक मानवी प्रक्रिया ,बुद्धीच्या आणि मनाच्या झुंजीतून याचा जन्म होतो . कधी तो एकट्याने तर कधी तो सामूहिक रीतीने अस्तित्वात  येतो.कोणत्याही निर्णयापर्यंत पोहचण्याची प्रक्रिया पण वेगवेगळ्या ... खूप दीर्घ अशी विचारांची खलबत .... तर कधी एका झटक्यात ....निर्णय .
(सध्याच्या..  त्रिकुट vs मी पुन्हा येईनचच  बघा ना.)
               आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर .. निर्णय अंमलबजावणीत आल्यावर इतिहास बदलतो....
सकारात्मक -नकारात्मक बदल घडतात.या बदलांमुळे निर्माण झालेल्या  परिस्थितीवर बोटे ठेवणारे हि अनेक .... मात्र भरपूर अस्तर लावलेल्या ह्या निर्णयावर ठाम राहण्याची क्षमता हवी. हीच 'निर्णय क्षमता' ..... उच्च पदावरच्या व्यक्तीच्या विकासात हीचा अधिक वाटा.
               आपण आपल्या निर्णयावर शंकाग्रस्त  न होता ठाम असू तर त्याला निर्णय म्हणता येईल ....नाहीतर सारा पोरखेळच.

@भक्ती..