Friday, November 26, 2010

-आनंदयात्री-

-आनंदयात्री-

हाती मोती आनंदाचे
ओठी हासू निखळ जिथे,
यात्री सारे गाती इथे
गाणे जादूई आयुष्याचे॥१॥

घेई हिंदोळॆ क्षण-झुला
संगे आशा बहरत असे,
कारूण्याची थोडी पिसे
हाका देती एक एक फ़ुला॥२॥

आभाळाच्या द्वारामधे
ओंकाराचा नाद घुमतो,
चैत्यमय झरा वाहतो
ह्र्दयस्थ देव्हारामधे॥३॥

इंद्रधनुच्या मागति रंगा
रंगेबेरंगी करति कला,
आहे आयुष्याशी लळा
चाले आनंदी (यात्री)लगबगा॥४||

No comments: