Tuesday, December 7, 2010

संचित



मोडलेल्या झोपडीपाशी अजूनी
पाखरे गाती;उरला दाणा टिपूनी॥१॥

तांबडा सूर्य क्षितिजाषी बुडूनी
माखते संध्या प्रिती रंगा स्मरूनी॥२॥

सावळ्या मेघा नको जाऊ फ़िरूनी
डोंगरा ओलांडुनी,आला दुरूनी॥३॥

ठेव सारे क्षण तरीही विणूनी
राह्तो मागे हर्ष,त्रागा विरूनी॥४॥

संकटे आली दिव्याला मालवूनी
गत जन्मीच्या रे पुण्या ये धावूनी॥५॥

-भक्त्ती

Monday, November 29, 2010

alfaaj***by Bhakti

दिल मै एक तुफ़ान सा लेकर घुमते है
इस दर्या के ’शोर’ से भला हम नही डरते है।
~~~~~~~~~~~~~~
2
जख्मोंपर मरहम लगाने वाली शख्शिअत नसीबसे मिलती है,
उस वक्त दुनिया की सारी खुशिया करीब लगनी लगती है।
~~~~~~~~~~~~~~
3
क्या खुब अल्फ़ाज सिखाया था तुने
जिंदगी को सपनोसे मिलाया था तुने
~~~~~~~~~~~~~~
4
क्या खुब अल्फ़ाज सिखाये थे तुने
जैसे जिंदगी को सपने दिलाये थे तुने
~~~~~~~~~~~~~~~
5
नही बताई जाती
दिल की बात अभी.....
क्यो पुर्वाई गाती सताती
दिल की यादों को कभी कभी....
 ~~~~~~~~~~~~~~~
 6. उन्हे नही मिलानी नजरो से नजर
तो हमारे इशारो की क्या जरुरत।
मैफिल मे छलकता रहा अनजाना प्यार
लेकिन मुक्कमल इश्क की नही नजाकत।

त्रिवेणी by Bhakti


त्रिवेणी
त्रिवेणी बद्दल........
ह्यात पहिल्या दोन ओळी गंगा जमुने सारख्या आहेत, एकाच विचाराला धरुन . पण ह्या दोघांच्या संगमात एक गुप्त सरस्वती नदी आहे जी कधी दिसत नाही.तिस-या ओळित पहिल्या दोन ओळितला एक गुप्त विचार लपलेला असतो.



1 दूरपर्यंत दोघे बरोबर चालयचो
पायवाट पुढे पुढे पळत असे
.
.
.
.
आता तुझ्याविना वाटच हरवलेली दिसे
~~~~~~~~~~
2
उंच उडाव आकाशात
घ्याव सारं ते पंखांत
.
.
.
.
नंतर मात्र जमिनीकडे झेपावावे अलगद
~~~~~~~~~~~~~
3
फ़ुल तु माळत जा
गंधही तु घेत जा
.
.
.
.
तेवढा गज~याचा हट्ट माझ्याकडॆच कर ग..
~~~~~~~~~~~``
4
मन सारे चिंब भिजले
क्षण होत थेंब घरंगळले
.
.
.
.
तु होऊन श्रावण मला साद घातली
~~~~~~~~~~~~~~
5
डोळ्यांत भावना दाट्लेल्या
पापण्या अश्रूंनी भिजल्या
.
.
.
.
तुझे रूप मी आहे साठवल
~~~~~~~~~~~~
6
चंद्राशी भांडून चंदेरी सुख ओरबडले
ओंजळीत राखच फ़क्त होती आली
.
.
हातावरली जखम अजुन आहे ओली
~~~~~~~~~~~~~~
7
डोळ्यांत भाव शोध
उमगले जरी सांगू नको
.
.
खोटारडी मला हिणवू नको
~~~~~~~~~~~
8
स्वप्न हिरव पान
पानगळ सोसावी लागेल
.
.
मी आधीच ते पान खुड्ते
~~~~~~~~~~~~
9
जुन्या कवितंची पाने फ़डफ़डतात
मनाला हवीहवीशी नाजूक जखम होते
.
.
शब्दांच्या पाकळ्या वा~यासवे अलवार उडतात
~~~~~~~~~~~
10
स्मॄतीच्या खेळात मी स्व:ताला लोटले
हातातले क्षणांचे अस्तित्व त्या जाळ्यात गुंतले
.
.
मनाला स्वैर ठेवणे हल्ली धोक्याच आहे
~~~~~~~~~~~~~~~
11
लाजून तू नजर झुकावते
त्या सावळ्या सावलीत प्रियकर सुखावतो
.
.
उन्हात एकट्याची निरागसता टॅन होईल
~~~~~~~~~~~~~
12
आयुष्य पुढे समांतर चालले, असे का व्हावे?
आठवड्यातून एकदा दूध नक्की आटवावे
.
.
गोड घटानांची बासुंदी चवीला अप्रतिm
~~~~~~~~~~~~~
13
धूंदी प्रीतीची,फ़ुलांतून ओसांडते
मंजूळ धून आसमंती वेडावते
.
.
रानवारा तुला स्पर्श करून येतो
~~~~~~~~~~~~~~
14
तुझे माझे मार्ग बदलले
वलयांकित आयुष्य जाहले
.
.
अन एकांती तुझ्या आठ्वणींचा कल्ला
~~~~~~~~~~~
15
नुपूर झंकारती मनाच्या गाभा~य़ात
मंजुळ शांतता धुंद सख्याच्या बाहूंत
.
.
श्वासांत न उरले अंतर
~~~~~~~~~~~
16
मृगजळ हाती येत नाही
धावणे तरीही थांबत नाही
.
.
मनाची तहान ,नजरेने रचले खेळ
~~~~~~~~~~~~~~~~
17
क्षितिज स्वामी एक साक्षी
प्रेम त्याच्या डोळ्यांत पाहिले
.
.
पापणींची पाखरे नाही हलली
~~~~~~~~~~~~~~
18
लग्नाआधी तारे-चंद्र तुझ्यासाठी आणिन
लग्नानंतर चंद्रासारख्या पो्ळ्या तुझ्यासाठी लाटेण
.
.
प्रेमासाठी वाटेल ते करेन ’वचन द्यायच’
~~~~~~~~~~~~~~~~
19
पारिजातक रात्री फ़ुलतो
आठवणी देत पहाटे रडतो
.
.
गंध त्याचा कसा विसरतो?
~~~~~~~~~~~~~
20
नाजुक कळ्या ओंजळित देऊन ...हसला
डोळे मिटून गंध ह्र्दयात साठवत होते...हरवला
.
.
फ़ुले प्रश्न विचारित सतावितात
~~~~~~~~~~~~~~~
21
जवळी उभी कविता
अभागी तो काव्यसंग्राह वाचे
.
.
काव्य शब्द नशिबाला हसे..
~~~~~~~~~~~~~~~
22
जीवनाच्या वाटॆवर तुझी भेट
ह्र्दय हरवलेय,तुझ्यात धडधडते ते थेट
.
.
आता मी सर्वार्थाने जगायला शिकतेय
~~~~~~~~~~~~~~
23
एका श्वासांचे अंतर
माझ्यात तु अन तुझ्यात मी.
.
.
.
एक झाले दोन मन खोलवर.....
~~~~~~~~~~~~~~~~
24
त्या झाडाआड पालापाचोळा पसरलेला
सोसाट वा~याने उड्तांना आवाज चिरकला....
.
.
.
.
एकांत असाच कर्कशात जळतो.....
~~~~~~~~~~~~~~
25
नाही समजल किती दूर आले
हातातल्या माळेतुन किती मोती गळाले
.
.
.
.
त्याच्या डॊळ्यात पाहत चालताना .
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
26
ते झाडांना नाही हालवत
ते पाण्याला नाही थांबवत...
.
.
.
विचार’ मन का चंचल करतात?....
~~~~~~~~~~~~~~~~~~
27
त्या वाटेवर फ़ुले घेऊन
ती उभी केव्हाची थिजून
.
.
तो नाही येणार फ़ुलांनाही माहीत नव्हत...
~~~~~~~~~~~~~~~
28
तुझ्यासाठी अश्रू कोरडे वाहतात
ह्रदयात कणसूर स्वर कंपतात
.
.
छे!तुझी आठवण मात्र पाठ सोडत नाही...
~~~~~~~~~~~~~~~~~
29
यशाच्या पारंब्या होत्या
हाताशी त्या येत नव्हत्या..
.
.
खुज्या मनोवृत्तीची तेवढी उंचीच कुठे?
~~~~~~~~~~~~~~~~~~~
30
तिच हासू एक खळाळता झरा
तिचे अश्रू जणू प्राजक्ताची फ़ुले
.
.
ती होती का?मीरा?
~~~~~~~~~~~~~~~~
31
सागराकडे येतांना लाटा होती बेभान
पोचता किना~याशी होती संथ रममाण.....
.
.
प्रेमात निशब्दपणे कुर्बान.

Sunday, November 28, 2010

ह्र्दयाचा खेळ झाला


ह्र्दयाचा खेळ झाला

- - u u - - - u- - =meetar

सारा,... ह्र्दयाचा खेळ झाला
जेव्हा,... तु समोरी सख्या आला॥

जीवात प्रितीच्या उठे ज्वाळा
काठावर बैसे सांज भोळा।

चंद्रास सतावे प्रेम गाणे
रात्रीत झुरे तुझे दिवाणे॥

सारा... ह्र्दयाचा खेळ झाला
जेव्हा... तु समोरी सख्या आला....

वाहे फ़ुलं,वाजे घुंगुरूही
चाहूल तुझी जादू करे ही।

स्वरा भिडला आर्त मारवा
माझ्यात तु झंकार पहावा॥

सारा... ह्र्दयाचा खेळ झाला
जेव्हा... तु समोरी सख्या आला....

-भक्ती

Saturday, November 27, 2010

कविता रसग्रहण

लय?

कविता लयीत आहे म्हणजे काय्?
कवितेची लय
१.शब्दांच्या उच्चारांना लागणा~या काळाची पुनरावृत्ती,
२.शब्दांत येणा~या त्याच त्या अक्षरांच्या उच्चाराची ठराविक काळाने होणारी पुनरावृत्ती -यांना आपण यमक व अनुप्रास म्हणतो,
३.शब्दोच्चरांचे गुणधर्म -म्हणजे त्यांचे उच्चार होताना येणारे आघात ,त्या आघातांचे नाददृष्ट्या मृदृत्व वा कठोरत्व.
या सर्वाच्या पुनरावृत्तीतू जन्माला येणा~या आकृतीतून साकार होत असते.
संदर्भ :संग्रहित

कंचनीचा महाल - (rasagrahaN सदोष असू शकते.

कंचनीचा महाल - कवी ना. घ. देशपांडे

तोच तो इच्छित दीपक दिसला काठाशी हासत आले
क्षितीजा पासून क्षितीजा पर्यंत आकाश कंपीत झाले
अहंते वर या ओवाळले रे मी पाचही हे प्राण माझे
भरून छातीत नेत्रांत धावले उन्मत्त उधाण माझे
ताठर नाचत होता रे माझ्या या भुवयां वरती माज
माथीचा चंद्रही बघत होता हा बुडून गेलेली सांज
तोच ती आली रे हाक त्या पोराची उभार ते हात होते
दाबून घट्ट हे अधर तरी मी समोर पहात होते
आतले कठीण्य तनूत आले रे तोच अन झाले मी काळी
कठीण पणा हा गोठून पडले दगड बनून खाली


माझ्या या महाला मधल्या प्रत्येक कमानी कमानी पुढे
वार्‍याच्या झुळूकी वरुन आत्ताच वाजत गेले रे चुडे
प्रत्येक रंगीत हातात होती रे उज्ज्वल दीपाची थाळी
प्रत्येक कपाळी शोभत होती रे मोत्यांची सुंदर जाळी
तुपाचे दीपक जाळून होता मी चांदवा धूसर केला
जेथून निघाले त्याच या भूमीचा संपूर्ण विसर केला
बाभळी वरल्या फुलांत आता मी सोसते पाऊस ऊन
आज मी आहे रे पाषाण होते मी कोमल कुसुमाहून
फुलले परंतु वाहिले नव्हते चंपक पुष्प मी ताजे
कळस लावून रितेच ठेविले मानस मंदिर माझे

खालच्या मैदानावर मी रात्रीत दुरात ऐकते टापा
ऐकते तमात एकाकी गुराच्या या भिंती जवळ धापा
कमानी कमानी मधून सारखा हुंकार देतात वारे
पाहत जातात भकास निळ्या या आकाशा मधले तारे
आतून लागते आच पण हा दगड पेटत नाही
सगळे पारखे दयेचे मायेचे कुणीच भेटत नाही
अंधार्‍या रात्रीत ती सारी नगरी तमात बुडते बाई!
मिटल्या दातांच्या ओसाड भिंती या बोलत नाहीत काही
पुनव येताच वासनामय मी दगडा मधून येते
महाला भोवती चांदण्या खालती तेच ते फेर मी घेते

कशी रे रंगवू आज मी राजसा ते चित्र पुसट लेले
पुनव रात्रीत माझे हे हिंडते मानस विस्कटलेले
दक्षिण दाराच्या बाहेर पडले अनेक शतके अशी
पाषाण मय हे अचल जिवीत सोशीत आहे मी पिशी
पडल्या शीळेला भेटला नाही रे कुणीच रंक वा राजा
मीच रे ऐकला मानव वांछेचा सुदीर्घ निःश्वास माझा
दोनच उरले मजले खालचे कुणीच नाही रे गडी
एकही कवाड नाही रे आणखी एकही नाही रे कडी
घुमतो पारवा झोंबतो गारवा वार्यात वाजते शिटी
सहस्त्र भुजंग बळाने राजसा एकच घाल रे मिठी !
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~`

कंचनीचा महाल - (rasagrahaN सदोष असू शकते.)

हे काव्य भाव अथवा रूपक काव्य भासत नाही तर एक कथा यात जाणवली.ही कथा विश्लेषण,संदेश देत नाही तर वाचकाला एक अनुभूती देते त्या नायिकेची.
जी नायिका मला भेटली ती शतकांशतकांपासून कशाच्या तरी शोधात आहे.....
स्वप्नांचा महाल साकारतांना.....तो हरवून गेल्याने ती गोठून गेली आहे अगदी शिळेप्रमाणे आणि ह्याच महालाची कथा ती सांगते आहे,कवीने आजुबाजूची स्थित्यंतरे रेखाटलेली असल्याने आपणाला हिची व्यथा महाल साकारण्याची किती काळापसून अतृप्त असेल असा भास होतो.
नायिकेने परंतू हा बंदिस्त दगडी स्वप्नांचा महाल आपलासा केला आहे ही पुढील ओळींतून दिसते.

जेथून निघाले त्याच या भूमीचा संपूर्ण विसर केला
बाभळी वरल्या फुलांत आता मी सोसते पाऊस ऊन
आज मी आहे रे पाषाण होते मी कोमल कुसुमाहून
फुलले परंतु वाहिले नव्हते चंपक पुष्प मी ताजे
कळस लावून रितेच ठेविले मानस मंदिर माझे

ती अजूनही वाट पाहतेय .....ती व्यक्ती आहे?....ती इच्छा आहे?.....तो सूड आहे?.....तो मृत्य़ू नाही अथवा तिला या कथेचा शेवट करायचा नाही...तर तिला हवाय आनंद,मोकळा श्वास जो तिची यात साथ देईल मुक्ती नाही तर साथ देईल.......
माझ्या दृष्टीने तो आनंद म्हणजे हरवत चाललेली 'माणुसकी'असा घेते...कारण हीच मिठी कोण त्याही काळात जन माणसाला..संस्कृतीला तारू शकते.

पडल्या शीळेला भेटला नाही रे कुणीच रंक वा राजा
मीच रे ऐकला मानव वांछेचा सुदीर्घ निःश्वास माझा
दोनच उरले मजले खालचे कुणीच नाही रे गडी
एकही कवाड नाही रे आणखी एकही नाही रे कडी
घुमतो पारवा झोंबतो गारवा वार्यात वाजते शिटी
सहस्त्र भुजंग बळाने राजसा एकच घाल रे मिठी !

म्हणून शेवटची ओळ पंच लाईन आहे...जो वाचक ह्याचा जो अनुभव वा अर्थ घेईल त्या नुसार याचे आकलन होईल
भक्त्ती.

कविता रसग्रहण

कविवर्य ग्रेस-कविता

"मेंदू आणि मेंदूच्या मागील कुंडलिनीमार्गे आत्म्यात पोचते ती खरी कविता, कवितेला स्पष्टीकरणे आणि पुरावे नसतात;आणि अशी कविता जगूच शकत नाही."-कविवर्य ग्रेस

"कलावंताला इमेज नसते .तो फ़क्त आरसा असतो.कितीही सुंदर स्त्री वा पुरूष असला, तरी ते आरशासमोर किती वेळ उभे राहू शकणार?काही क्षणांनंतर त्यांना स्व:ताचीच लाज वाटू लागते. त्यामुळे एखाद्या हत्याराने ते हा आरसा फ़ोडतात.मात्र त्या लुटलेल्या आरशचे अनेक तुकडे त्या तोडणा~यांची अखंड प्रतिमाच दाखवित असतात."-कविवर्य ग्रेस
~~~~~~~~~~~~~~~~~~~~```

द.भि.कुलकर्णी-कविता

"कवितेतीत शब्द सुटे नसतात,कवितेतील वाक्ये सुटी नसतात.कवितेतील स्र्व वाक्ये मिळून एकच वाक्य तयार झालेले असते.म्हणून कावितेस महाकाव्य म्हणतात."-.द.भि.कुलकर्णी.

शिशिरागम-rasgRAhan

शिशिरागम-rasgRAhan

शिशिरर्तुच्या पुनरागमे,
एकेक पान गळावया
का लागता मज येतेसे
न कळे उगाच रडावया.
पानांत जी निजली इथे
इवली सुकोमल पाखरेअ,
जातील सांग अता कुठे?
निष्पर्ण झाडित कापरे!

फुलली असेल तुझ्या परी,
बागेतली बकुलावली;
वाळूत निर्झर बासरी;
किती गोड ऊब महीतली?
येतील ही उडुनी तिथे,
इवली सुकोमल पाखरे,
पानांत जी निजली इथे,
निष्पर्ण झाडित कापरे!
पुसतो सुहास,स्मरूनिया
तुझ आसके,जरि लागले
एकेक पान गळावया
शिशिरर्तुच्या पुनरागमे.

बा.सी.मर्ढेकर
संदर्भ:शिशिरागम.
मर्ढेकरांच्या कविता.
~~~
शिशिरागम-rasgRAhan
मर्ढेकरांच्या समग्र कविता वाचतांना त्यांच्या शब्द संपदेपुढे शब्द गुंफणात आकाश ठेंगणेच आहे.

पानगळीच्या कविता वाचून मनात आठवणींचा पाचोळा होतो..या पानगळींनी...ऋतुचक्राच्या या वलयाने कवींच्या मनात भावनेचे कल्लोळ अनंत काळापासून केलेले आहे.

शिशिर ऋतुंचा सोहळा गर्द काळोखात घेण्यासाथीच येतो जणू.

एक एक झाडाला घट्ट बिलगलेले,घरट्यातील पिलांच्या चिवचिवाने,वर्षासरींनी तृप्त झालेले पान ह्या झाडांचा निरोप शिशिर आगमनाने घेतात..आणि तो त्याच्या पोता~यात सारी पाने भरत राहतो..
पण ही ऋतुची वलये जी झेलती ती सृष्टी निष्पर्ण झाडांकडे पाहते आणि तिला नकळत गळणारी तिची आसवे रोखता येत नाही..

सुखात राहणारे पंख फडफडतात नव्या दिशेने...भीतीचे सावट आकाशाला देत पोचतात ..फुलांनी डवारलेल्या सीमित जगात..जिथे भीती पानगळीची नाहिशी होईल गोड क्षणिक बासरीचे स्वर त्या६नाअ धुंदावतिल...
पण ह्या गारव्याने ...पानगळीचे सृष्टीचे अश्रू थांबतिल का?शिशिर येतच राहिल दर्वेळी आणि आसवे नकळत टपटपतिल...

भक्त्ती.

रसग्रहण:स्वप्न

रसग्रहण:स्वप्न

स्वप्न

जळतात पर्वत ,जळतात नद्या,जळतात तारे;
तापून भिरभिर भटकतात वारे;
ढळताहे सा~या जीवनाचा तोल्:
गुरांच्या तोंडांत जळतात चारे.
वाकत मुडपत तडकून कडकड जळतो पाला;
जळत्या झाडांत पाखरांचा स्वर केविलवाणा झाला.
मानूस विसरतो माणूस;वाडे झाले बेचिराख;
नाही 'सखी',नाही 'सजण',नाही 'पान्हा',नाही 'तान्हा'
पेटलेल्या कुरणांत
गो~हे अन गायी
भटकतांना जळतात ,भडकतात जळतांना.
कोरडे पर्वत,कोरड्या राई,कोरडी नदी,नाले उदास
कोठेच काही उरले नाही,सारे काही झाले भकास,
नाही 'आज',नाही'उद्या',नाही'रात्र',नाही 'सकाळ',
नाही'मागे',नाही पुढे':
गोंधळतो,बिचकतो,थबकतो काळ
एकच एक उरते घशांत कोरड्या
तहान
तहान.

एक गोरी भिल्लीण करतांना नर्तन एक उंच घेते सातरंगी गान
इंद्रधनूसारखी गुहेतून येते
संजीवन देत:
पडलेली पाखरे उंचवतात मान;
उचंबळते गगन;
पुन्हा सुरू होतात पृथ्वीच्या भोवती चंद्राचे फेर;
चहूकडे होते नव्याने जुन्या जीवनाची पेर.
सखीला मिळतो सखीचा सजण,
पडतात सरी तापलेल्या शेतांत ,गर्जत येतात ढग काळेभोर;
बुट्टीदार हिरवा
पिसारा पसरत
हिरव्यागार गवतांत आंब्याच्या खाली थयथय थयथय नाचताहे मोर
हिरवे होते रान ,पुन्हा येते भान,केळ येते पणांत;
आईला पान्हा :
दूध पितो तान्हा;
फणा काढून डोलते नागाचे जोडपे केतकीच्या बनांत.
-ना.घ.देशपांडे
(१९८४)
~~~~~~~~~~~~~~`
रसग्रहण:स्वप्न
डोळ्यांच्या पापणींची उघडझाप अगदी नकळत होत राहते,ते आपल्याला जाणवतही नाही,क्षणाच्या साधारण दहाव्या भागाकरता आपल्या डोळ्यापुढे अंधार असतो,तो दिसतो का?....नाही

स्वप्न ही कविता अगदी अशीच आहे.एका नकोशा स्वप्नाकडून नकळत हवहव वाटणार स्वप्न कवितेला पडते.
तहान ..तहान...मनाला..धरणीला जाळणारी ..अतृप्तेचे स्वप्न ..सर्वांगाला जाळत असते.


नाही 'सखी',नाही 'सजण',नाही 'पान्हा',नाही 'तान्हा'

.......................................
नाही 'आज',नाही'उद्या',नाही'रात्र',नाही 'सकाळ',
नाही'मागे',नाही पुढे':

.......................................
तीच तहान हे दर्शवतात..
ढग दाटून यावेत ,कडाडावेत...जणू मल्हार गातात ते....
त्यासाठी योजलेला गोरी भिल्लीण ,तिची सातरंगी तान...जी इंद्रधनूसारखी मेघांच्या कुट्ट गुहेतून बाहेर येते धुंद होत ...धुंद करत.कवितेला जाळ्णा~या शब्दांना 'संजीवन देत'येते...


सखीला मिळतो सखीचा सजण,
........................................
पुन्हा सुरू होतात पृथ्वीच्या भोवती चंद्राचे फेर;
चहूकडे होते नव्याने जुन्या जीवनाची पेर.
........................................

डोळ्यांच्या पापणीच्या उघडझाप मध्ये दृष्टीला ही मनोरम सृष्टी पुन्हा दिसावी ..त्या प्रमाणे मनोरम ओळी सुख स्वप्न दाखवतात.
हिरव्या शालूत धरती पुन्हा खुलते.


आईला पान्हा .
दूध पितो तान्हा;

युगांयुगांची तहान आई पिलांची शमावते.. सा~या स्वप्नाची तहान तृप्त होते.


फणा काढून डोलते नागाचे जोडपे केतकीच्या बनांत.
..................................
शेवटच्या ओळींनी कवितेच स्वप्न मनात कायमच सळसळत राहते.~~~~~~~~~~~

-भक्त्ती.
संदर्भ:खूणगाठी

रसग्रहण:स्वप्न

रसग्रहण:स्वप्न

स्वप्न

जळतात पर्वत ,जळतात नद्या,जळतात तारे;
तापून भिरभिर भटकतात वारे;
ढळताहे सा~या जीवनाचा तोल्:
गुरांच्या तोंडांत जळतात चारे.
वाकत मुडपत तडकून कडकड जळतो पाला;
जळत्या झाडांत पाखरांचा स्वर केविलवाणा झाला.
मानूस विसरतो माणूस;वाडे झाले बेचिराख;
नाही 'सखी',नाही 'सजण',नाही 'पान्हा',नाही 'तान्हा'
पेटलेल्या कुरणांत
गो~हे अन गायी
भटकतांना जळतात ,भडकतात जळतांना.
कोरडे पर्वत,कोरड्या राई,कोरडी नदी,नाले उदास
कोठेच काही उरले नाही,सारे काही झाले भकास,
नाही 'आज',नाही'उद्या',नाही'रात्र',नाही 'सकाळ',
नाही'मागे',नाही पुढे':
गोंधळतो,बिचकतो,थबकतो काळ
एकच एक उरते घशांत कोरड्या
तहान
तहान.

एक गोरी भिल्लीण करतांना नर्तन एक उंच घेते सातरंगी गान
इंद्रधनूसारखी गुहेतून येते
संजीवन देत:
पडलेली पाखरे उंचवतात मान;
उचंबळते गगन;
पुन्हा सुरू होतात पृथ्वीच्या भोवती चंद्राचे फेर;
चहूकडे होते नव्याने जुन्या जीवनाची पेर.
सखीला मिळतो सखीचा सजण,
पडतात सरी तापलेल्या शेतांत ,गर्जत येतात ढग काळेभोर;
बुट्टीदार हिरवा
पिसारा पसरत
हिरव्यागार गवतांत आंब्याच्या खाली थयथय थयथय नाचताहे मोर
हिरवे होते रान ,पुन्हा येते भान,केळ येते पणांत;
आईला पान्हा :
दूध पितो तान्हा;
फणा काढून डोलते नागाचे जोडपे केतकीच्या बनांत.
-ना.घ.देशपांडे
(१९८४)
~~~~~~~~~~~~~~`
रसग्रहण:स्वप्न
डोळ्यांच्या पापणींची उघडझाप अगदी नकळत होत राहते,ते आपल्याला जाणवतही नाही,क्षणाच्या साधारण दहाव्या भागाकरता आपल्या डोळ्यापुढे अंधार असतो,तो दिसतो का?....नाही

स्वप्न ही कविता अगदी अशीच आहे.एका नकोशा स्वप्नाकडून नकळत हवहव वाटणार स्वप्न कवितेला पडते.
तहान ..तहान...मनाला..धरणीला जाळणारी ..अतृप्तेचे स्वप्न ..सर्वांगाला जाळत असते.


नाही 'सखी',नाही 'सजण',नाही 'पान्हा',नाही 'तान्हा'

.......................................
नाही 'आज',नाही'उद्या',नाही'रात्र',नाही 'सकाळ',
नाही'मागे',नाही पुढे':

.......................................
तीच तहान हे दर्शवतात..
ढग दाटून यावेत ,कडाडावेत...जणू मल्हार गातात ते....
त्यासाठी योजलेला गोरी भिल्लीण ,तिची सातरंगी तान...जी इंद्रधनूसारखी मेघांच्या कुट्ट गुहेतून बाहेर येते धुंद होत ...धुंद करत.कवितेला जाळ्णा~या शब्दांना 'संजीवन देत'येते...


सखीला मिळतो सखीचा सजण,
........................................
पुन्हा सुरू होतात पृथ्वीच्या भोवती चंद्राचे फेर;
चहूकडे होते नव्याने जुन्या जीवनाची पेर.
........................................

डोळ्यांच्या पापणीच्या उघडझाप मध्ये दृष्टीला ही मनोरम सृष्टी पुन्हा दिसावी ..त्या प्रमाणे मनोरम ओळी सुख स्वप्न दाखवतात.
हिरव्या शालूत धरती पुन्हा खुलते.


आईला पान्हा .
दूध पितो तान्हा;

युगांयुगांची तहान आई पिलांची शमावते.. सा~या स्वप्नाची तहान तृप्त होते.


फणा काढून डोलते नागाचे जोडपे केतकीच्या बनांत.
..................................
शेवटच्या ओळींनी कवितेच स्वप्न मनात कायमच सळसळत राहते.~~~~~~~~~~~

-भक्त्ती.
संदर्भ:खूणगाठी

कविता रसग्रहण

प्रार्थना

गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे!
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे!

पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो;
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे!

सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो;
सारखे अस्तित्व माझे पेटताना वर्दळू दे!

लाभु दे लाचार छाया मोठमोठ्याना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे!

आणु दे गा वंचकांना क्रूस छद्माचा दयाळा;
रक्त येशूचे परी डोळ्यांत माझ्या साकाळू दे!

-सुरेश भट
संदर्भ-रंग माझा वेगळा.
~~~~

प्रार्थना-rasgRahan

येथे कोणी खुज्या मनोवृत्तीची व्यक्ती दय़ाळा कडे मागणे करीत नाही तर...एक विवेकशिल व्यक्ती प्रार्थना करीत आहे .याचे स्मरण कित्येक पटींचे बल देते....
गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे
-वाणी,तिचे शब्द यांना धारदार वजन लाभू दे
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे
-'स्व':तचा आत्मविश्वास मनाच्या सत्यतेने वाढू दे....

वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे
-अफलातून ओळ आहे ही....वर वर दूरवर पसरलेला समुद्र भरतीच्या लाटांनी किना~यावर पहाडासारखा आदळतो....हे त्याचे रूप ह्याच ओळींत दिसते.चार भिंती-बंधने जी सर्वांच्या प्रवासात येतात पण वादळी आवेग -महाचिंतन व आचरण असणारे यांची बाळगत नाही....बंधनांची तमा नाही..

लाभू दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे
-महान लोक़ांची चरित्रे ह्याव्हे मूर्तिमंत उदाहरण आहेत.
हे गीत सा~यांचेच आवडीचे आहे...यातील प्रार्थना आयुष्याला फळू दे.

कविता रसग्रहण कसे करावे याविषयी थोडे....

कविता रसग्रहण कसे करावे याविषयी थोडे.....
कविता प्रथम दोनदा -तीनदा वाचून ती संपूर्णपणे समजून घ्यावी.कविला कवितेतून काय सांगायचे आहे म्हणजेच तिची मध्यवर्ती कल्पना थोडक्यात विशद करून सांगावी.कवितेतील भावना,कल्पना,विचार ,नादमाधूर्य,चाल,अलंकार,काव्यगुण,कवितेचा प्रकार,कालाटणी,सूचकता,विडंबन यापैकी जे जे गुण आढळतात त्यांची नोंदी करावी.आपले म्हणणे स्पष्ट करण्यासाठी शक्य तेथे कवितेतील ओळी पुन्हा सादर कराव्या.शेवटी आपल्या मनावर त्या कवितेचा कोणता परिणाम झाला हेही सांगावे.कवितेत कवीला काय सांगायचे आहे याचे विवेचन रसग्रहणात करावे.दोषदिग्दर्शन शक्यतो टाळावे.रसग्रहणात कवितेवर टीका करू नये.कवितेतील सौंदर्य दर्शन म्हण्जेच रसग्रहण मात्र विसरू नये.
संदर्भ:सुगम मराठी व्याकरण-लेखन
लेखक:कै.मो.रा.वाळंबे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~`
रसग्रहणासाठी कवितेतील सौंदर्यस्थाने:
१.रसानुकूल चाल:म्हणजे अंगाई गीत शांत रस व त्याप्रंमाणे वाचन.तसेच इतर रस.
२.नादानुकारी शब्दरचना:उदा."रूणूझूणू ये रूणूझूणू ये झंकारित वाळा
लुटूलुटूलुटू दुडुदुडु ठुमकत ये बाळा"
३.विषयाला अनुरूप भाषा:उदा"या बसा पाव्हन अस राम राम घ्या
कोनच्या तुमी गावच गाठुड तिठ राहू द्या"
यात ग्रामीण भाषा वापरली याप्रमाणे इतर बोलीभाषेंचा ढब ब~याच कवितेंमध्ये दिसतो.
४.अलंकार-रूपक,अतिशयोक्ती,द्रूष्टांत इ.
५.अक्षरांच्या पुनरावॄत्तीने अनुप्रास साधला जातो.
उदा."हटातटाने पटा रंगवूनि जटा धरिशी का शिरी?
मठाची उठाठेव कातरी?"
यात ट आणि ठ या अक्षरांची पुनरावॄत्ती झाली आहे.

कविता रसग्रहण


सुखाच्या शोधांत
फ़िरते पॄथ्वी
घेऊन हातांत
चंद्राचा चोरकंदील!
आणि फ़िरतात
त्याच्याच शोधांत
पृथ्वीची पोरे
अतॄप्त मुशाफ़िर!
ओसाड पॄथ्वीची
सुखाच्या शोधांत

जंगले पिंजणा~या
माझ्या मुशाफ़िर!
थांब जरासा;
आपल्या बाळांच्या
विस्कळीत केसांतून
फ़िरव बोटे.
पहा असेल
सांड्लेले सूख
तेथेच लपलेले!

माझ्या मुशाफ़िरा!
थांब जरासा;
वादळी जीवनाच्या
सहस्त्र स्वप्नांनी
जागृत होऊन
आकाश पिंजण्य़ापूर्वी
पहा रे आपल्या
उशीच्या खाली;
असेल तेथेही
सूख दड्लेले!

माझ्या मुशाफ़िरा
ऐक,ऐक,
दमलेल्या भागलेल्या
नाजुक हातांनी
आत्ताच दिलेल्या
खरपूस ,खमंग
लसणीच्या फ़ोडणीचा
चर्र आवाज;
आणि तव्यावर
उडू पाहणा~या
भाकरीची फ़डफ़ड!

ऐक,ऐक,
खळ्यांच्या कोप~यावरील
मोहरलेल्या आंब्याच्या
विशाल वॄक्षावर
डॊके टेकून
टिकाळी शोधणा~या
रसाची कुजबूज:

"स्थीर राहूनही
वाढते उंची;
जातात पाळे
खोल खोल;
स्थीरतेचाच
बुरखा पांघरून
जगते गती
निराळ्या पातळीत !"

याच गतीला
असते शोधीत
सुखाचे भूत
बंदिस्त स्थितीतून
होण्या विमुक्त.
सुखाचे भूत-
जे काढते
सर्वांची कळ;
आणि लपते
त्यांच्याच सावलीच्या
मिस्किल अंधारांत!
-विं दा क रं दी क र
~~~~~~~~~~~~~~~~~~`
सुखाच्या शोधांत-रसग्रहण

अनंत काळापासून अगदी मानवाच्या निर्मीतीच्या पासून सुखाचा शोध चराचर सृष्टी सुखाच्या शोधात आहे...सूर्य हेलियम शोधात,पृथ्वी जीवननिर्मितीच्या सुखात,चंद्र प्रकाश आनंदाच्या शोधात..यापुढे अफ़ाट मानव सुद्धा सतत सुखाच्या शोधात आहे...त्याचा हा घडा कायम डगमगतच असतो..
विंदानी सदर कवितेत ह्याच सुखाच्या शोधाच्या मिस्किल गोंधळात,आजुबाजुचे अमूल्य सुख दूर्लक्षित केले आहे हे सांगितले आहे.जसे

माझ्या मुशाफ़िरा!
थांब जरासा;
वादळी जीवनाच्या
सहस्त्र स्वप्नांनी
जागृत होऊन
आकाश पिंजण्य़ापूर्वी
पहा रे आपल्या
उशीच्या खाली;
असेल तेथेही
सूख दड्लेले!

इवलस हे सूख लाखमोलाच!

आयुष्यात मनपाखरू स्पप्नाच्या आकाशात घारीसारखे फ़िरते ’स्वप्नाचे भक्ष्य ’मिळवण्यासाठी .हो कोणालाही हे सूख झदप घालूनच मिळवायच असत...त्यात तो एक विसावा हरवतो कायमचा...ही आहुती का?सुखाच्या शोधासाठी..
कवितेतील शेवटच्या ओळींनी ह्या सुखाचा गॊंधळ विंदांनी काहीसा सोदअले..नव्हे सुखाचे मर्म सांगितले आहे...

स्थीर राहूनही
वाढते उंची;
जातात पाळे
खोल खोल;
स्थीरतेचाच
बुरखा पांघरून
जगते गती
निराळ्या पातळीत !"

याच गतीला
असते शोधीत
सुखाचे भूत
बंदिस्त स्थितीतून
होण्या विमुक्त.


सुख हे त्या वृक्षासारखे आहे..खोल पाळे मुळे गाडून घ्यायची, व रसदार फ़ळे वर्षांवर्षे सुखाने मिळ्वायची,कुजबुज रसाची ऐकायची अनुभवायची चेतनेने...
माणसाने देखील सुखची सीमा मनात रूजवावी ,सुख मनात रूजवाय्च,सुखाला कायम नाविन्यपूर्ण रूप द्यावे,पहावे..सुख नूतनीक्षम आहे.आनंदाच,सुखाच झाड मनात लावाव

पापण्या मिट्ल्यावर होणा~या मिणमिणत्या धुंद काळोखात जे सूख लपलेले आहे ..ते डोळे उघडे ठेवून शोधावे..नक्कीए जवळ्च असेल हे सूख!!
विंदानी सुखसागराच्या किना~यावर आपल्याला पोहचवले आहे.उडी मारूयात..

या कवितेतील काही रूपक अप्रतिम आहेत मनावर अलगद परिणाम करतात,
चंद्रचा चोरकंदील,सांडलेले सुख,रसाची कुजबूज,सुखाचे भूत.

-भक्त्ती
संदर्भ:मृदगंध

कविता रसग्रहण


कपडे धुण्याचे गाणे..

भरभर वरती फेस उसळतो
खळखळ हसते साबणपाणी
धुणी धुते मी लख्ख पांढरी
आणिक गाते मजेत गाणी

चुबकुन पिळून घड्या घालुनी
हळूच टाकते तारेवरती
मजेत झुलती कपडे सुकती
ऊन तळपते वारे फिरती

मनामनांवर कपड्याऐंशी
धूळ साठते डागही पडती
कसे उरावे कलंक परि ते
निळ्या नभांतिल तेजापुढती?

उद्योगी रत असता मानव
शोकाला नच मिळतो थारा
फुले फुलविती हसुन तयाला
आणि उजळती प्रकाशधारा

डोके करू दे विचार आणिक
सुख दु:खाने हृदय भरावे
एक मागणे देवाजवळी
हातांनी पण काम करावे

संदर्भ:चारचौघी
(अनुवादित:शांता शेळके)


मला जर कोणी सांगितले असते की कपडे धुण्यावर गाण आहे,तर मी समोरच्याला वेड्यात काढले असते.चारचौघीमधील अनेक मुक्तछंदातील कवितांपैकी ही एक कविता\गाण आहे.
ह्या कवितेला उपजतच एक लय आहे,त्यामुळे ही कविता \गाण ध्यानात राहते.

मनामनांवर कपड्याऐंशी
धूळ साठते डागही पडती
कसे उरावे कलंक परि ते
निळ्या नभांतिल तेजापुढती

ह्यात मस्त comparison केल आहे.कपड्य़ांवरील डाग ज्याप्रमाणे सुर्यप्रकाशात धुण्यानंतर नाहिसे होतात,त्याप्रमाणे माणसाच्या मनावरील धूळ,कलंक अंधारत-वाईट वातावरणात,लपले,तरीही सत्याच्या तेजापुढे समोर येऊन नाहिसे होतात....

मराठित एक अभंग आहे या आशयाचा...मला सापडल्यावर येथे देइल.

शेवटच्या दोन कडव्यांत कमालीचा आशादायी विचार मनाला सुखावून देतो.कार्यमग्न,उद्योगशीलता हीच यशाची आणि आयुष्याच्या सकारात्मक प्रवाहाची जननी आहे हे हातांनी गाण लिहून सहज पट्वून दिले आहे.धन्य हे गाण!!!!!

-भक्त्ती.

कविता रसग्रहण


एकटी

मी एकटीच माझी असते कधीकधी
गर्दीत भोवतीच्या नसते कधीकधी

येथे न ओळखीचे कोणीच राहिले
होतात भास मजला कधीकधी

जपते मनात माझा एकेक हुंदका
लपवीत आसवे मी हसते कधीकधी

मागेच मी कधीच हरवून बैसले
आता नकोनकोशी दिसते कधीकधी

जखमा बुजून गेल्या सा~या जुन्यातरी
उसवीत जीवनाला बसते कधीकधी
-सुरेश भट

गझल,वृत्त्,गा ल गा काय आहे?असे अनेक प्रश्न...यांची उत्तरे मिळाली 'एल्गार'हाती आल्यावर.अजुनही मी एल्गारमध्येच आहे.कधीही कोणतेही पान उलगडले की एक अप्रतिम गझल...आणि नविन शोध हाती येतो.
पान क्र. ४५ वरील ही गझल वाचली.हरवलेल माझ एकटेपण हातात आल्याच आनंद होतो.आयुष्यात जबाबदारी,कर्तव्य यातून वाट काढत पुढे जात असतांना एक गुंता निर्माण होतो.....नात्यांचा,भावनांचा,मैत्रीचा,आकांक्षा-अपेक्षांचा,विश्वासाचा....मानवी जीवनासाठी हे श्रेयस्करच आहे.पण ;दिल ढूंड्ता है फिर वही फुरसत के रात दिन 'अशी अवस्था होते.

मी एकटीच माझी असते कधीकधी
गर्दीत भोवतीच्या नसते कधीकधी

हा शेर माझ्या पहिल्या कवितेची आठवण करून देतो.यात समग्र एकलेपणाची आठवण राहते.'मी माझी'यातून प्रगट होते.सर्वांत आवडता शेर.

येथे न ओळखीचे कोणीच राहिले
होतात भास मजला कधीकधी

जपते मनात माझा एकेक हुंदका
लपवीत आसवे मी हसते कधीकधी

ही अवस्था तर हजार वेळाहोत असते.मनात हुंदका जपून ओठावर हसू फुलवून जो जीवन जगण्याचे हे गमक प्राप्त करतो,त्याला या जीवनात कशाचीही कमतरता भासत नाही.

मागेच मी कधीच हरवून बैसले
आता नकोनकोशी दिसते कधीकधी

जखमा बुजून गेल्या सा~या जुन्यातरी
उसवीत जीवनाला बसते कधीकधी

ह्या दोन्हीही शेर मधील पहिला मिसरा नायिकेच युद्ध स्व:तहाशी दाखविते.एकटेपणाची परिसीमा दिसते.जे क्षण गेले ,जगून गेले ते पुन्हा परतने अशक्य....दुस~या मिसरातही पराकोटीचा एकटेपणा ठायी ठायी भरला आहे.......परंतू एवढा एकलेपणा जीव गुदमरून टाकेल की......
या कारणामुळे तीन शेर अधिक प्रिय आहेत.रंग माझा वेगळा हाती पडल्यावर काय होईल याची धड्कीच भरते.
सुरेश भट यांचा वट्वृक्ष मराठीला संपन्न करून गेला.

आणखिन आवडत्या गझल:

एल्गार
तुझ्यासाठी
वाटचाल
यार हो!
एवढेतरी
भेट
जगणे
शब्द येतील!
केव्हा तरी पहाटे
उजाडल्यावरी सख्या
कुत्रे
आभार
भल्या पहाटे निघून आले
सुन्या सुन्या मैफलीत
केव्हा तरी पहाटे.

Friday, November 26, 2010

कविता रसग्रहण

शब्द?

शब्द?
ही व्याख्या दोन अर्थांनी वापरली जाते.

१.विशिष्ठ ’उच्चार’ या अर्थाने
उदा.घण घण ..असा नाद करणारी घंटा हा शब्द.
२.विशिष्ठ अर्थ व्यक्त करणारा उच्चार या अर्थाने.
उदा.घोडा,पक्षी इ. म्हणताच तो प्राणी त्याबद्दल सर्व मानसिक संदर्भ जोडून शब्द जोडला जातो.

शब्दाला नादाचे अंग असते अणि ते आपण शब्दोच्चारातून प्रकट करतो.

तसेच शब्दाला अर्थाचे अंग असते ते तो शब्दोच्चार होतोच किंवा तो शब्दोच्चार इतर शब्दोच्चारांच्या समवेत होताच (म्हणजे वाक्य ऐकताच) प्रकट होते.

सुधीर रसाळ
(कविता आणि प्रतिमा)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शब्दांतील रूपकप्रक्रिया:

शब्दांतील रूपकप्रक्रिया:

रूपके:वाच्यार्थ व आत्मिक अर्थ यांची प्रतीती एकाच क्षणी घदल्याने वाच्यार्थबोधक शब्द त्याच क्षणी आत्मिकार्थबोधक म्हणून -रूपक म्हणून - वापर्ता येणे शक्य आहे(.-बारफ़ील्ड.)
उदा.स्पिरीट शब्द उच्चारताच वाइन्ड हा भौतिक अर्थ आणि आत्मिक अर्थही रूपकप्रकियेतून मिळतो.

अमूर्त संकल्पना तयार करण्याची शक्ती व रूपके घडवण्याची शक्ती या दोन्ही मानवाच्या नैसर्गिक शक्ती आहे.
अमूर्त संकल्पना घडविण्याच्या शक्तीतून प्राथमिक अमूर्त संकल्प्नांतून अतिशय गुंतागुंतीच्य अमूर्त संकल्पनेकडे मानव गेल आणि आपला सांस्क्रुतिक व भौतिक विकास त्याने साधला.

एका मानसिक संदर्भाच्या जाळ्यात दुसरा नवा अनुभव पकडणे म्हणजे तो मानसिक संदर्भ संबोधण्यासाठी वापरला जाणारा उच्चार नव्या अनुभवासाठी वापरणे होय,म्हणजेच रूपक वापरणे बनवणे होय.
उदा.टोपी\टोप डोके झाकणा~या वस्तू.याचा आधारे पेनाची निब झाकणा~या वस्तूस आपण टोपण म्हणतो.
आपल्या विचारप्रकियेत व त्यामुळे भाषेत निसर्गत:च रूपकप्रक्रिया असल्यामुळे आपले भाषिक व्यवहार किती तरी सुलभ झाले आहेत.
साधारणत: दोन वस्तूंच्या अंगभूत वैशिष्ट्याअंमधील साम्यविरोधारे आपण रूपके घडवतो.

-भिन्न वस्तू व घट्ना त्यांच्या समान गुणधर्मांना एकत्र करण्याची ही जी रूपकप्रक्रिया आहे ती अपरिहार्यपणॆ संवेदनात्मक व भावनिक असते.
उदा.स्त्री मुकास ’चंद्र’ म्हणतो तेव्हा.चंद्राची संवेदन आणि स्त्री मुखाच्या संवेदना साधर्म्य प्रस्थापित होतो.व चंद्र दर्शनातील आल्हाद भावना व स्त्री मुखाच्या दर्शनातील भावना यांचे नाते प्रस्थापित करतो.

-रूपकात संवेदना व भावना हे मानसिक संदर्भातील दोन घटक सहभागी होत असतात .म्हणूनच आपण रूपकातील विशिष्ट् शब्दांऐवजी पर्यायी शब्द वा स्पष्टीकरण वापरू शकत नाही.उदा.घोड्तोंड्याऐवजी अश्वमुख हा शब्द वापरू शकत नाही.

सुधीर रसाळ
(कविता आणि प्रतिमा)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~`

शब्दांतील नादरचनेतील रूपक प्रक्रिया

शब्दांतील नादरचनेतील रूपक प्रक्रिया

तीन साले शाळेची,
तीन साले वेळेची,
तीन साले चाकूची
तीन साले डाकूची
तीन चोक तेरा
एक चाकू मारा.
डाकू डाकू डाकू,
धारवाला चाकू
पोलाडाचे पान
टोक झाले छान!
-विंदा करंदीकर

ह्या ओळींतील गतिमानता ,उच्चारातील नैसर्गिक आरोह अवरोह ,प्रत्येक शब्दाच्या उच्चाराला लागणारा काळ या सर्वामुळे आपणांस पेन्सिलचे टोक करताना जे क्रिया करावी लागते.ती ज्या गतीत ,तालात होत असते,तिचा प्र्त्यय येत राहतो.
या दोन्ही ठिकाणी शब्दांच्या नैसर्गिक उच्चारातून निर्माण झालेल्या लयबद्धतेत एक रूपकप्रक्रिया घदली आहे.या लयबद्धतेतील नादांचे गुण्धर्म आपणांस अन्य रूपातीतील,अन्य संवेदनशील काही घटनांचा ,अनुभवांचा व भावनिक ताणांचा प्रत्यय घडवित असते.

-सुधीर रसाळ
(कविता आणि प्रतिमा)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

क्रियाविशेषणव्यये:

क्रियाविशेषणव्यये:

गर्द दाट मधली झाडी।मंद मंद हलवा थोडी,
पराग ,सुमने हसलेली।नीट बघ पायाखाली,
पुष्पांचा बसला थाट।हळू हळू काढा वाट,
गोड सुवासाचे मेघ ।आळसले जागोजाग;
हिमकणिका त्यांच्या पडती।गोद गोड अंगावरती;
पुनीत ही गंगामाई।स्नान करा झटपट बाई.
-बालकवी

यात मंदमंद,थोडी ,नीट,हळूहळू ,झटपट ही क्रिया विशषणव्यवे अप्सरांच्या कॄतींची चित्रे रेखाटीत आहेत.
परागांना दुखापत हौउ नये म्हणून पायाखाली नीट पाहणा~य़ा’हळूहळू’वाट काढणा~या या अप्सरा
‘मॄदू मनाच्या आहेत हे आपल्या लक्षात येते.म्हणूनच त्यांच्या ‘कृतीच्या पद्धती त्यांच्या मनो‘वॄत्तीच्या प्रतिमा बनल्या आहेत.
अनेकदा ही अव्यये रूपक म्हणूनही वापरली जातात.

सुधीर रसाळ
(कविता आणि प्रतिमा)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

वर्णनपर ,उभयान्वयी रूपकप्रक्रिया:

वर्णनपर ,उभयान्वयी रूपकप्रक्रिया:

-जरा पुढे अन असे वळा ,मग
पुन्हा असे, अन तिथेच ते घर;
बघा खुणेला समोर आहे
सोनतु~यावर पिवळा मोहर

.
तेव्हापासून ....
लाल धुळीतिल ती पदचिन्हे-
मनांत टिपला हिशोब त्यांचा
आभाळाने,सोन तु~याण्ने,
कुणी कुणी अन....
-इंदिरा संत

पहिल्या चार ओळींत घराच्या पत्त्याचे केवळ वर्णन आहे.परंतू आपण जेव्हा दुस~या कडव्याकडॆ वळतो तेव्हा मात्र पहिल्या कडव्यातील वर्णन प्रतिमा बनते.
या मार्गावर 'वळणे' आहेत-सुख्दु:खाची,आशानिराशांची.
परंतु शेवटी ही वळणे चालून गेल्यावर 'घर' लागते तेथे पिवळ्य़ा मोहराने फ़ुललेल्या सोनतु~याची खूण आहे.आता 'घर' आणि 'सोनतुरा' यांनाही रूपकत्व प्राप्त झाले आहे.
पहिल्या दोन ओळींतील अन या शब्दाच्या जागाही लक्षात घेण्याजोग्या आहेत.येथे जणू प्रेमाच्या प्रवासात्ले थबकणे सूचित होत आहे’.
’अन’ या उभयान्वयी अव्ययायाला कवयित्रेने दिलेला ह अर्थ रूपप्रक्रियेतूनच जन्मलेला आहे.

सुधीर रसाळ
(कविता आणि प्रतिमा)

कविता रसग्रहण

भाषा आणि काव्य

भाषा ही संकल्पनांची रचना करणारी,आपल्या विचारांना रूप देणारी आणि त्याच बरोबर त्या रूपा‍ची निर्मिती करणारी गोष्ट आहे.
बाह्य वस्तू किंवा घटना व आपले मन यांबद्दल आपण जी व्यवस्था लावतो तिला त्या वस्तूंची,घटनेची किंवा मनातील घडामोडींसंबंधीची संकल्पना म्हणता येईल.वस्तूंबद्दल सरळ ,सोपे व प्राथमिक अनुभव आपणांस येत असतात.त्यांच्या संवेदनात्मक,भावनात्मक घटकांचे परस्परांशी नाते जोडून खूप गुंतागुंतीच्या काही पातळींवरल्या व काही प्रमाणात अमूर्त संकल्पना आपल्या मनात घडत जातात.काही नियम संकल्पनांच्या जडणघड्णींवर प्रकाश टाकतात:
१.माणूस स्व:ताला व स्व:ताच्या अनुभवघटकांना जाणून घेऊ शकतो.
२.दोन अथवा अधिक वस्तू समोर आल्या की माणूस त्यांच्यातील संबंध जाणून घेऊ शकतो.
३.एक वस्तू व एक संबंध दिला गेल्यास माणूस दिलेल्या संबंधाच्या आधारे दुस~या तत्संबंधे वस्तूची कल्पना करू शकतो.
यांतील दुसरा नियम संकल्प्नांच्या जडणघड्णीच्या दृष्टीने व तिसरा नियम नवनिर्मितीच्या महत्वाचा आहे.
विचार हे मानसिक,भावनेशी जोडलेले असतात.:वस्तू व घटना यांचा एका विशिष्ट पद्ध्दतीने संबंध जोडून केलेला गट म्हणजे मानसिक संदर्भ होय.या घटकांचे वैशिष्टय़ असे की इतर समान गुणधर्माच्या वस्तू अगर घटना समोर आल्या की त्या या मानसिक संदर्भाशी जोडून घेतात.

कविता रसग्रहण

कविता?

प्रमाणित अनुभवापासून व एकमेकांपासून एका मर्यादेबाहेर फारशा भिन्न नसलेल्या अनुभवांचा एक गट म्हणजे कविता,...
प्रमाणित अनुभव म्हणजे पूर्ण झालेल्या रचनेवर चिंतन करतांना कवीला त्या रचनेसंबंधी येणारा अनुभव..
-रिचर्डस.


"अनुभवांची किंवा भावनिक अर्थाची लयपूर्ण संघटना"

..शब्दात जो अनुभव कोरलेला अस्तोअ त्याच्या आकाराच्या कडा \रेषा नाजुक आणि अलुवारपणे प्रसरणशील असतात.अशा शब्दा६चा अर्थ काय,हे तुम्ही कसे वापरता यावर अवलंबून असते..प्रतिभाशाली कलावंताच्या इवल्याशा स्पर्शाने त्या स्पंदन पावतात नि किनार बदलते"

-बा.सी.मर्ढेकर



~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~`

कविता रसग्रहण

लाजू कशी
सजू कशी
उरी आली कळ
थकलेल्या सुरापाशी
पिकलेले फळ
सांगू कशी
झाले पिशी
कानी आली साद
भादव्याचा देह माझा
सावरीचे भान

या भावनेमध्ये एका परिपक्व प्रेमाचा आनंद लाभतो.अल्लड वयातिल,हुरहुरणारे ,भोळे प्रेम यांना खळखळाट फारच...पण या शब्दांमध्ये एक खासच वैशिष्ट्य ,विशेष भाव,ती नजाकत आहे.
सांगू कशी
झाले पिशी
कानी आली साद
भादव्याचा देह माझा
सावरीचे भान
वाह!!!!प्रीतीत हरवू गेली ती,भान अस्तित्व सारसार प्रेमाच्या एशा~यान ती भूलून गेली..भाद्रपदचा देह,काहीसा प्रगल्भपणा दिसतो आणि श्रावणासारख नव पल्लवीच नाजूक मन म्हनॅजे प्रेमात हरवलेल्या लावण्य़वती पण पिकलेल्या या प्रीत गोड फळाच्या फांदीला कोमल कोवळ्या पानांची झालर आहे.


ठुमरीच्या पायात राधेचे पैंजण
ठुमरीच्या हातात कान्हाची मुरली
ठुमरीच्या श्वासात मीरेची भक्ती
ठुमरीच्या कंठात आत्माचची पुकार
ठुमरीच्या डोळ्य़ांत मिलनीची तृप्ती
ठुमरीच्या वाटेवर अमूर्ताचे मंदिर
जियो! जियो! सूर ताल लय...सार संगीत भारतीय संगीत जियो!

ह्या ओळीवाचून संगीताचा घट भरलेला आहे पण मी तहानलेलीही होउ शकत नाही अशी अवस्था आहे..
म्हणून शब्द रसग्रहण...

सृष्टी न सृष्टी ,तन अन मन अलौकिक भावनेनी जणू भारलेली या शब्दांनी भासते.की हीच ठुमरी जिने राधेचे पैंजण ,कान्हाची मुरली,मीरेची भक्ती,मिलनाची आस,आत्म्याची पुकार आपल्या
पायात्,हातात,श्वासात,कंठात ,डोळ्यांत धारण करून अप्रतिम सौंदर्य मिळवले आहे...तिच्या पुढच्या वाटेवर या संपुर्ण सच्च्या रूपामुळे पवित्र मंदिर भेटणार आहे,,की ज्याचा आस्वाद ठुमरी रसिकांना देणार आहे.मस्त.

कविता रसग्रहण

शब्द
शब्दांत एवढ सामर्थ्य असत की
त्याच्या तोडीला कोणीच नसत
म्हणूनच बनतात लेखक-कवि शब्द
शब्दच त्यांची किर्ती पसरवतो
शब्दानेच बनतो आशेचा किरण
त्याला व्यक्त करते कवीह मन
जीवन एक सुरेल सुरेख संगीत आहे
त्याला साद देतांना होते
शब्दांचे गीत
प्रकट होत असते शब्दांतून प्रत्येक भावना
यासाठीच शब्दांची
साथ हवी जीवना
शब्दांच्या बलावर
मीही झेप घेइन आकाशी
यासाठीच तर्
जोडीन शब्दांना आयुष्याशी
कवितेत शब्द वापरीन
मी हृदयस्पर्शी
आणि सर्वांची स्तुती
मिळवील साजेशी
शब्दांचा दोर हवा
जीवनाच्या पतंगाला
तरच तो पतंगहि भिडेल
विशाल गगनाला
सर्व कला गुण संपन्न असा हा शब्द
चंद्र,सूर्य,ता~यांना करितो स्तब्ध
-स्वप्नल उगले
संदर्भ:दैनिक केसरी(१९९९)

अगदी रोमांच उठलाय अंगावर आज पुन्हा ही कविता वाचून्.स्वप्नलची माझ्या बालमैत्रीणीची ही कविता आहे.she is dynamic,Brilliant girl.
ही कविता तिने लिहली वयाच्या १३ व्या वर्षी....
अगदी कोणालाही प्रेरणा देणारी कविता आहे.शब्द गुंफून या कवितेतून पंतगाची दोर शब्दांना करून ती पोहचली आहे चंद्र सूर्यापर्यंत....शब्दांचा गोडवा लागावा अशी ही सुंदर मुक्तछंद रचना...
शब्दांमध्ये ताकद आहे थांबलेल,भांबावलेल आयुष्य पुढे पुढे नेण्याच ,फुलवायच..शब्द जर अनुभवातून घडले तर लेखणीच आणि रसिकांच अहो भाग्यच ठरत.पण 'जे ना देखे रवि ते ते देखे कवि' या उक्तीप्रमाणे जर भविष्यातील कल्पना लेखणिच्या साथीने 'शब्दांनी'मांडल्या की स्वप्नलने लिहलेली कवितात्याच भविष्याची कल्पनेची साद देते.'शब्द'साधना करणे हे जीवनफुलाला भूत-वर्त-भविष्यकाळाला जवळ करण्यासारख आहे.
-भक्त्ती

कविता रसग्रहण

पिवळा साज

पिवळा साज

पिवळीच मी पाकोळी की
पिवळेच कृष्णनाथ चाफ्याची कळी
पिवळे पात्ळ बारिक गवती
पदरावर शेवंती की
पिवळ्या चोळिवर जडली मोती
पिवळ्या किनारीवरती की
पिवळी बनून आले श्रीहरीजवळी
पिवळिच मी पाकोळी की
-अनामिका
संदर्भ:( स्त्रीगीत-रत्नाकर )
निसर्गोत्सव
लेखिका:दूर्गा भागवत.

या ओळी वाचून दूर्गा भागवत यांना अलौकिक आनंद झाला.पाकोळीसाठी कोणिही सरस लिहले नाही. त्यांची ही खंत ह्याो ळी वाचून संपली.हे स्त्री गीत आहे असे त्यांनी उल्लेखले आहे.
खरच इवलिशी पाकोळी पिवळी सोनकळी जणू चाफ्याचिच.त्या चाफ्यावर आनंदाने बसते.(चाफ्याचा गंध भ्रमर घेत नाही!!!!!)पाकोळी गवतांवत हिंडते..जणू हे पिवळे सुंदर पातळ आहे,ज्याच्या पदरावर शेवंतीची सोनपिवळी वेल आहे.धार्ण केलेली चोळीही सोन्यासारखी धम्म पिवळे सोन रंगाची आहे की जिच्या किनारीवरती मोती जडले आहेत ,जे लख्ख रंगाचे आहेत.
आणि शेवटी...
पिवळी बनून आले श्रीहरीजवळी
पिवळिच मी पाकोळी की
या ओळी भास निर्माण करतात...
वाटते गोपिकाच सुंदर पिवळी चोळी,तसाच पिवळा पदर जरतारी किनारीचा असे सोन्यासारखे वस्त्र परिधान करून हरी चरणाशी आली आहे.ती पाकोळी भासत आहे.
का?पिवळी पाकोळी हरी चरणाशी आली आहे..
-भक्त्ती.

कविता रसग्रहण

'आई'


एक बाई होणार असते आई
एक पुरूष त्याला बापपणाची घाई|


नऊ महिने तिने वाहिला आहे निमूट भार
आता जीवघेणी शेवटची घटका श्वास अडविणार


तोही आतुरतेने ठेवून होता नऊ महिने लक्ष
या शेवटच्या तासात तो अस्वस्थ आतूर दक्ष


देवा सुखरूप कर हिला मोकळी
त्याची सारी पितरं खोळंबली


तिला आईपणाची भ्रांत
त्याचे पौरूषत्व चिंताक्रांत|


-प्रॉमिथिकस

ही माझी सर्वात आवडती कविता होती आणि कदाचित आहे.ही कविता मी वाचली तीन वर्षांपूर्वी 'मधुरा' या साप्ताहिक पुरवणीत.(माझ वाचन खरच खूप कमी आहे.)मी ही कविता माझ्या मैत्रीणींना वाचून दाखविली.(त्यांनी माझी चेष्टा केली होती..वेडया).असो.

तर.......
'आई' हा कवितेचा विषय नेहमीच मनाचा हळूवार कप्पा आणि नयन ओलावून टाकतो.'आई' ही सा~या जगात कोठेहि वात्सल्यमूर्ति... एकसारखिच असते, ह्या कवितेमध्ये मात्र या कवीनी पण एका बाप होणा~या पित्याचीही घालमेलही मांडली आहे...केवळ असामान्य.
प्रत्येक कडव वाचताना ज्याप्रमाणे ती प्रत्येक्ष या सर्व आईपणातून जात आहे त्याचप्रमाणे तोही तेवढाच पूर्ण वेळ आणि प्रेम देत त्याच बापपण अनुभवत आहे हे दिसत.
एकूणच ही कविता आपल्याला आई-वडिल होणा~या जोड्प्यांची हळूवार आणि अलुवार भावनेची ओळख करुन देतो.या अप्रतिम कलाकृतीसाठी कवीला नोबेल द्यावस वाटत

कविता रसग्रहण**

माझी मुलगी जागोजागी भेटत असते माझी मुलगी कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी हळूहळू मग चालतात हे वादळवारे झोक्यावरती जेव्हा बसते माझी मुलगी कर्जाचा हा डोंगर थोडा हलण्यासाठी मुलासारखे राब असते माझी मुलगी तिला न रुचते नटणे-बिटणे तरी नेहमी परीसारखी सुंदर दिसते माझी मुलगी गळ्यात माझ्या घास उतरण्या नाही म्हणतो अवती-भोवती जेव्हा नसते माझी मुलगी चित्र काढते,पोळ्या करते,गाणे गाते दु:खालाही खुशाल पिसते माझी मुलगी घरी यायला मला जरासा उशीर होतो आईसोबत जागत बसते माझी मुलगी तिला लागली गझलेची या खोड आगळी रात्री माझ्या कुशीत घुसते माझी मुलगी आठवते मज माझी आई अशीच होती जेव्हा माझ डोळे पुसते माझी मुलगी तिला न्यायला राजकुमार उशिरा ये तू अजुनी मजला अल्लड दिसते माझी मुलगी -प्रदीप निफाडकर (पुणे) (संदर्भ:विवेक) अरे आपला friend 'गणेशा' कुठेय?मागे त्याने त्याची एक छान अशीच 'माझी मुलगी' या आशयाची कविता लिहली होती.तेव्हा मला ही कविता खूप आठवली होती,आज लिहते. अत्यंत साध्या आणि सोप्या या कवितेतून एक सामान्य आणि मध्यम वर्गीय पित्याची आपल्या पिल्लूबद्द्लचे प्रेम आणि माया व्यक्त झालेले दिसते.पिता-मुलगी हे नाते अनमोल बंधाचे असते. काय लिहू अजून या कवितेबद्द्ल...सर्वच 'पिता-मुलगी'यांना लाख लाख सलाम या कवितेतून.

कविता रसग्रहण

मी काही बोलू का?
मला काही जप्त करायचे आहे...
महाभारत परत बोलायचं आहे...
त्यामागचा उद्देशच वाहताना दिसतोय...
माझ्या अर्थाचा अनर्थ होताना दिसतोय...
डोळेझाक करून कसे चालेल...मला तरी...
जप्त करू का प्रत्येकातून काही तरी...
मग नवेच महाभारत होईल...
परत मला सांगायला येईल का तो हरी?
न का येईना कोणी...
पण मी जप्त करणार काहीतरी प्रत्येकाचे
सांगाल कोणी काय काय जप्त करू??
पंडुचे...
द्रौपदीचे...
कुंतीचे...
पितामहांचे...
कर्णाचे...
हम्न...ओह मी?
मी गीता...हम्न तीच ती...गीता.
-रेणु खटावकर
(संदर्भ-शरपंजरी आज मी)

'शरपंजरी आज मी'या एका उत्तम कलाकृतीमधील awesome कविता.ही कविता या पुस्तकातील peak point आहे असे मला वाटते.सर्व महाभारतातील पात्रे अशी सुंदर बोलत असतात आणि एका नंतर एक अंगावर येत असतात:)त्यात मस्तपैकी मध्यावर रेणु यांचा हा प्रश्न.दोन मिनिटे ही कविता शांत करते आणि मग पुन्हा महाभारतातील कान्हा,कुंती,गंगा,भीष्मे इतर पात्रे संवाद साधतात...मन गुंतवतात.रेणु यांनी खरच खुप शांत आणि संयमी 'गीता रेखाटली आहे.

शब्द शब्द वेचिले


शब्द शब्द वेचिले

शब्द शब्द वेचिले
पंखांनी आकाशात उडणारे
निळ्या सागरात तरंगणारे
मनगाभा~यात प्रितीत दरवळणारे
धुंद मधुर गीतात उसळणारे
तुला-मला बंधनात बांधणारे
शब्द शब्द वेचिले
मखमली पेटीत साठवले....

शब्द शब्द वेचिले
फांदी-फांदीवर घोशात लटकणारे
पाना-फुलांच्या संगतीत खेळणारे
वा~याच्या मनात घोंगावणारे
सावळ्या सावलीत मिटणारे
तुला-मला साद घालणार
शब्द शब्द वेचिले
अक्षर-मोतीमाळेत गुंफिले....

शब्द शब्द वेचिले
गुफेच्या काळोखात घुमणारे
पाण्याच्या डोहात वल्हवणारे
वणव्यासारखे रानात पसरणारे
धरतीच्या कुशीत बागडणारे
तुला-मला युगांयुगांसाठी जोडणारे
शब्द शब्द वेचिले
समयीच्या ज्योतीत उजळले....

शब्द शब्द वेचिले
घुंगरांच्या नादात छणछणारे
थेंबांनी टपटपत ओघळणारे
मैफिलीच्या स्वरांत भिडणारे
पहाटवा~याची शिरशिरी अनुभवणारे
तुला-मला अर्थ देणारे
शब्द शब्द वेचिले
शब्दांना जीवापाडच जपले....

-भक्त्ती

रंग रंगला कसा!!!



रंग रंगला कसा!!!

छन छन छन...छम छम... छननन....

पाहा पाहा ग सखे
का कुठे? दिसतो कान्हा ?
कोरी कोरी ग ओढणी
रंगी भिजवतो तो कान्हा
पाहा पाहा ग सखे||

खन खन खन ... खण खण...खननन....

श्याम सुंदर ग छाया
का कुठे? वाजतो पावा ?
गोरी गोरी ग काया
रेशमी रंगवितो तो सखा
पाहा पाहा ग सखे||

तेन तेन तेन...तुम तुम..तेननन....

प्रेम प्यार ग सप्त रंग
का कुठे?उधळितो इंद्रधनू ?
लाजरी बावरी ग राधा
वृंदावनी नाचतो संगे तो हरी
पाहा पाहा ग सखे||

रंग रंगला कसा!!!

-भक़्त्ती
गंध माला

उभा अंगणी तो,असे गंध
जरा छेडिता मी,हसे गंध माला|

कळीचे बहाणे,तराणे अनोखे
तया घेत हाती,फसे गंध माला|

तिथे दूर नेते,झळाळी दिव्यांची
कसा मंद लाजे,हसे गंध माला|

सुनी रात आज,शब्द गोठलेले
कशी बोलु सांगा,नसे गंध माला|

तु जाता असा,हा अस्वस्थ जीव
तरीही तुझी मी ,असे गंध माला|


-भक्त्ती.

वसंत वाटिका.

संत वाटिका.

कुजबुज सुमनांच्या अंगणी रंगलेली
जवळ मलमल जे पंख खेळे झुलूनी
चल हळूच धरूनी ते बसवू परागी
किलबिल इवली ही ऐकता ती उडाली|

चमचम हसू ओठी शांत डोले अबोली
झुळ झुळ एक वेडी सांगते चंद्रास गाणी
भिर भिर मन आहे आज सूर्यफुलाचे
तनमन चहु स्वप्न रात होती निजलेली|

एकट घरट होता त्या रडल्याच वेली
मग लगबग आली ती जुई ही दुरूनी
सरगम लय गुंजे राजपुत्र गुलाबी
वसंत सुख उरी हे वाटिका धुंदलेली|

-भक्त्ती

माझा विठू पाहिला मी असा


माझा विठू पाहिला मी असा

सावळा ग विठू माझा उभा पुंडलिकेच्या विटेवरी
द्यावया दर्शन सकल भक्तजनी नेसुनी पितांबर भरजरी|

घालूनी तुळशीमाळा गळी मज पाहे लावुनी चंदन टिळा माथ्यावरी
देई साथ तो वारक~यासी रात्रौ-प्रात: होऊनी मुकुटाधिस्त खोचून सुगंधी तुरी|

म्हणे तुमचा मी सखा जन्मोजन्मीचा ठेवूनी करकमला कंबरेवरी बालकापरी
देई प्रत्येक जीवाला गारवा सामावून डोळ्यांत थंडी निळाई सागरापरी|

उभे रूपच पंढरपुरात जणू हरी-सखा सकलजनी
माझ्या प्राणज्योतीत विसावते हे रूप गतपुण्याईने जन्मजन्मोतरी|

भक़्ती.
२२\०४\०४

चल ये..रे जगा..

चल ये..रे जगा..

कोवळी आहेत पाने अजून..
हिरवी आहे मेहंदी नाजूक..
नको रे जगा...
खुडु नको
पुसु नको....
ह्र्दयाची भाषा अबोल
बोलतेय मन हे बोल
घे जाणून रे जगा...

दीप आहे मिणमिणता हातात..
स्वर आहेत कोमल जीवनात..
नको रे जगा...
विझवू नको
दुखवू नको....
आयुष्याची कुसुमवेल फुलेल
क्षण आनंदाने बहरेल
ये माझ्यासह रे जगा...

-भक्त्ती

पाकळ्यांची थेंबमोती माळ

पाकळ्यांची थेंबमोती माळ

फुलांनी कळींना गुलाबी अंगाई
निशेच्या गर्भी, रजईसह दिली

कळ्या गुंतल्या स्वप्नी,देत जांभई
पहाटे फुलण्यासही ती लाजली!

नभांच्या मुलांना बघूनी तयांसी
हसू आवरेना ,थेंबी थेंब झाली

गर्द त्या हिरव्या कुशी ही कोमलसी
पिलांचा कल्ला धरीला लाग आली!

थेंब मोती गवतावर धावले
ओवूनि दव-सर,पाकळी सजली

नभी उन्ह धारा ,तेज विखुरलले
प्रितीत चिंब फुले,वैभवात हसली!
@BHAKTEE

वेड हवच


वेड हवच

वेड हवच-1

शहाणपणाच सोंग
चांगुलपणाचा मुलामा
ख~यापणाचा बोलबाला
सार सार दिवसभर सांभाळून
एक तरी क्षण स्वच्छंदी जग़ण्याचे
तुफान वेड हवच....

वेड हवच
ढीगभर कामाचा बोजा
एकसारखे चहाचे कप
डोक्यावरचा भिरभिरणारा पंखा
किती किती नियम सांभाळून
थोडस अस्ताव्यस्त हुंदड्ण्याचे
काठोकाठ वेड हवच....

वेड हवच
सुर्यास्त डोळ्यात साठवायला
सागराला कवेत घ्यायला
पानगळ होणारी सोसायला
जरा जरा ओंजळीत पाणी घ्यायच
असामान्य वेड हवच....

-भक्त्ती

वेड हवच 2

वा~यासह स्पर्धा करण्याचे
अवखळ ,अल्लड होण्याचे....
आभाळात विहार करण्याचे
कल्पना ,कविता होण्याचे....

वेड हवच
पाखरासह घरट बांधण्याचे
चिवचिवणारी चोच होण्याचे....
शब्द मनातले बांधण्याचे
शब्द मोती,शब्द माळ होण्याचे....

वेड हवच
प्रतिबिंब सतत शोधण्याचे
शोधक,साधक होण्याचे....
रंगमंची स्व:तला शोधण्याचे
घुंगरू ,प्रकाश होण्याचे....

वेड हवच
जीवनाला साद देण्याचे
अणू ,रेणु कण होण्याचे....
मनु अनोखे स्वप्न देण्याचे
पाउलवाट ,मार्ग होण्याचे....
-भक्त्ती

पराजय

पराजय

स्वातंत्र्यानंतर काही काळ अनोखा होता
सुवर्णयुग सर्वत्र नांदत होता
सत्यमेव जयते नारा घुमत होता....

भ्रष्टाचाराची राक्षसे अशी पसरले
काळ्या पैशाला पायही फ़ुटले
बापू नोटेवर एकाकी उरले....

लहानपणापासून ऐकत होते
लाचखोरी नीती धूळीस मिळवते
आणि माझ्यासाठीच बाबांनी डोनेशन दिले होते????....

पायरी चढत आज युवक खुर्चीवर बसतो
भ्रष्टाचाराचा चक्रव्यूह सभोवती पाह्तो
हा व्यूह इतका जीवघेणा असतो....
कौरव अथवा अभिमन्यू
होण्याशिवाय वेगळा पर्याय नसतो
.
.
पण शेवटी दोघांचा पराजय हा असतो...
एक धिक्कारासम पराजय
एक शापित पराजय...
-भक्त्ती

आयुष्याचा डीएने:मॉलिक्य़ूलर बॉयोलॉजीच्या भाषेत:


आयुष्याचा डीएने:मॉलिक्य़ूलर बॉयोलॉजीच्या भाषेत:

आयुष्यात पुढे पुढे जावे
सकारात्मक,नकारात्मक
दोन्ही बाजु पेलून असावे
..............................डीएने च्या ५’ टू ३’ सिन्थेसिस सारखे
नवीन साथ-मैत्री जोडीत निघावे
यशाची शिडी वाटेत वळणे घेईल
गुंतुनि घट्ट एकमेकांत रहावे
.................................डीएने च्या ड्बल हेलिक्स ३० ऍगस्ट्न सारखे
जगात चुकत चुकत शिकावे
त्या दुरूस्त करून सुधाराव्या
कार्यरत हाताने नशीब घडवावे
....................................डीएने च्या पाम आणि फ़िंगर मॉडेल सारखे

मागील बंधातूनि हळू हळू निसटावे
जुन्या आठवणीसह नव्यात नाते गुंफ़ावे
धागे प्रेमाचे सांभाळित जगावे
....................................डीएने च्या सेमी कॉन्सरवॅटिव्ह रेप्लिकॅशन सारखे
काम झट पट करावे
प्रत्येक क्षण झपाटून लढ्णॆ
स्वप्नपूर्तीसाठी रडावे हसावे
.....................................डीएने च्या पॉलीमरेझ ३ प्रोसेसिटिव्हिटी सारखे
आयुष्याचा प्रेमात पडावे
ध्यास सुंदरतेचा मनास जडावा
सोनेरी पानांत स्व:ताचे नाव कोरावे
......................................डीएने मॉडेल मांडणा~या वॅट्सन आणि क्रिक सारखे
-भक्त्ती

"कहा गया उसे ढूंडो" -"त्याला शोधूया"


"कहा गया उसे ढूंडो" -"त्याला शोधूया"

सैरभैर वा~यासारखा होता तो....
स्वछंदी उडणा~या पतंगासारखा होता तो....
कुठे आहे गेला तो?
त्याला शोधूया....
त्याला शोधूया....

आम्हांला वाटा पुढे ओढायच्या
तो स्वत: त्याच्या वाटा बनवायचा
पडायचा..धडपडायचा....
धुंदीने तो पुढे चालायचा....

आम्हांला सतत उद्याची चिंता सतावयची
तो फ़क्त "आज-आताचा" उत्सव करायचा
प्रत्येक क्षण तो सोहळ्यासारखा जगत....

कोठून आला होता तो....?
त्याला शोधूया....

पोळणा~या उन्हाच्या झळांमध्ये सावलीसारखा
रणरणत्या वाळवंटी गजबजलेल्या गावासारखा
हळूवारपणे मनाच्या जखमा भरणा~या एखाद्या मलमासारखा....
.
.
आम्ही अस्वस्थपणे एखाद्या विहरीत पडायचो
तो खळखळत्या नदीत मनसो्क्त डुंबायचा
तो प्रवाहाच्या विरूद्ध धारांशी लढत पोहायचा
भन्नाट अवखळ वाराच होता तो....
यार आमचा होता तो....
कुठे गेला आहे तो?
त्याला शोधूया....
त्याला शोधूया....
-भक्त्ती

थ्री इडियट मधील "कहा गया उसे ढूंडो" ह्या माझ्या आवडत्या गाण्याचा स्वैर मराठी भावानुवाद केला आहे.

का?प्रकाशाने जळाळ्लेल्या


का?प्रकाशाने जळाळ्लेल्या

भयान काळोखाने
वाटा अंधारलेल्या
आशा जीवनाच्या
बुडालेल्या,गोठ्लेल्या...

चालले सरळ दिशेने
अस्तित्व हरवलेल्या
मागे की पुढे?
अवस्था ह्या भांबावलेल्या...

अन डोकावले सूर्याने
भाषा तमाच्या जळाल्या
पृथ्वीचा अक्षरेषा का?
प्रकाशाने जळाळ्लेल्या...
-भक्त्ती

मानवाला शाप आहे..


मानवाला शाप आहे...

भविष्यासाठी पळणा~या मानवाला
कोरड्या इतिहासाचा शाप आहे...
की-बोर्डवर चालणा~या हाताला
साधूसाठी हात जोड्ण्याचा जाच आहे...
साखरचे भाव वाढले तरी
नैवेद्य-भोग चढवायचा नियम आहे...
हुंड्यासाठी सुनेला छळतांना
मंदिरात हुंडीत सोने वाहण्याची रीत आहे...
एकामेकांचे पाय खेचतांना लाज नाही
दर्शनाच्या रांगेत पाय दुखत आहे...
असाह्याला विचारायची गरज ती काय?
जुनाट रूढी पाळायचा नादच आहे...
घड्याळावर चालतांना मनात अभिमान प्रगतीचा
धर्म,जात,रूढी,परंपरा इ.इ.तरी पाळाय़ाचाच वेडेपणा आहे...
-भक्त्ती

नको आता थांबू


नको आता थांबू

नको आता थांबू, घुटमळत राहू, कृष्ण निशा
उठू दे त्या पालख्या,निलस नयना,छेडिति कशा?॥१॥

तुझ्या सूक्ष्म श्वासा,मंद तनु गंधा,मुक्त उधळू
उडाया पंखांची,पिसं पदरास,वाहति हळू॥२॥

शुभ्र माळा हाती, अलगद तुटे,बंधन फ़िटे....
हलू लागे मागे,जपवुनि दर्द ,पल्लव काटे॥३॥

नसे आभासी हा,हसत हलता, स्वप्निल झुला
नभी प्रभाकांता,उमलत.. फ़ुले देई तुजला॥४॥
-भक्ती

कैफ़ात सांडताना(विरह)


कैफ़ात सांडताना(विरह)

व्रुत्त:गागाल गालगागा,गागाल गालगागा


डोळ्यांतली निळाई,कैफ़ात सांडताना।
का याद आज त्याची,आयुष्य पांगताना॥१॥

जातो पतंग दोरा,उंचीवरी नभाच्या
धागे तुटे प्रितीतच,नादात भांडताना?॥२॥

अंधार पांघरूनी,गेल्या निजून रात्री
येई सुगंध फ़ुलां,जीवात नांदताना॥।३॥

बांधून मोडलेल्या,खेळातल्या घराची
लाभे अजून रेती,पाण्यात रांगताना॥४॥

पिंडीस कावळ्यांनी,माझ्या तरी शिवावे
आवाज हुंदक्यांचा,स्वर्गात टांगताना ॥५॥

-भक्ती.

-आनंदयात्री-

-आनंदयात्री-

हाती मोती आनंदाचे
ओठी हासू निखळ जिथे,
यात्री सारे गाती इथे
गाणे जादूई आयुष्याचे॥१॥

घेई हिंदोळॆ क्षण-झुला
संगे आशा बहरत असे,
कारूण्याची थोडी पिसे
हाका देती एक एक फ़ुला॥२॥

आभाळाच्या द्वारामधे
ओंकाराचा नाद घुमतो,
चैत्यमय झरा वाहतो
ह्र्दयस्थ देव्हारामधे॥३॥

इंद्रधनुच्या मागति रंगा
रंगेबेरंगी करति कला,
आहे आयुष्याशी लळा
चाले आनंदी (यात्री)लगबगा॥४||

-भुरभुरत-


-भुरभुरत-

उतरून नभाच्या कुशीतुनी
निघते प्रितवेडी चांदणी
भुरभुरत स्वप्नल रजनी...१

मिटल्या कलिकांत साठली
मग रात नशा मंद रंगली
भुरभुरत धुंदी गंधावली...२

दव धावत आले कळ्यांवरी
उमलून सुधा ठेवी मंदिरी
भुरभुरत जाती खुशी खरी...३

फ़ुलपाखरं सारी विसावली
पित अमृत तृप्त झेपावली
भुरभुरत रंगाची सावली...४

-भक्ती

सुख

सुख
चिंब त्या हिरवाईवरी
दवबिंदूचे ओस विखरुले,
प्रकाशाच्या झेलता सरी
पाचूंचे अस्तित्व भासले...
असेच
झुलावे जीवन झुल्यावरी
क्षण जुने-नवे झेलले,
तेजस्वी तव नयनांनी परी
ओंजळ ही सुखाने भरली जाणले...
-भक्ती.

Wednesday, November 17, 2010

पावसाची सखी उभी..

पावसाची सखी उभी....

आठवणी मुठीत गच्च आवळूनी
उंबरठा तरूणाईचा ओलांडूनी
तेज मुखावरी,वीजेसम चमकुनी
पावसाची सखी उभी वेडावूनी॥१॥


रिक्त हात,गेल्या आठवणी वाहूनी
तळहाती इवले मोती देऊनी
खुणावतो पाऊस रिमझिम धारांनी
पावसाची सखी उभी आनंदूनी॥२॥


चेह~यावर स्वप्न गेले बरसूनी
ओले चैतन्य मनी पांघरूनी
सरी सा~या अंगावर झेलूनी
पावसाची सखी उभी चिंब न्हाऊनी॥३॥

-भक्ती