Saturday, November 27, 2010

कविता रसग्रहण

प्रार्थना

गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे!
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे!

पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो;
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे!

सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो;
सारखे अस्तित्व माझे पेटताना वर्दळू दे!

लाभु दे लाचार छाया मोठमोठ्याना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे!

आणु दे गा वंचकांना क्रूस छद्माचा दयाळा;
रक्त येशूचे परी डोळ्यांत माझ्या साकाळू दे!

-सुरेश भट
संदर्भ-रंग माझा वेगळा.
~~~~

प्रार्थना-rasgRahan

येथे कोणी खुज्या मनोवृत्तीची व्यक्ती दय़ाळा कडे मागणे करीत नाही तर...एक विवेकशिल व्यक्ती प्रार्थना करीत आहे .याचे स्मरण कित्येक पटींचे बल देते....
गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे
-वाणी,तिचे शब्द यांना धारदार वजन लाभू दे
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे
-'स्व':तचा आत्मविश्वास मनाच्या सत्यतेने वाढू दे....

वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे
-अफलातून ओळ आहे ही....वर वर दूरवर पसरलेला समुद्र भरतीच्या लाटांनी किना~यावर पहाडासारखा आदळतो....हे त्याचे रूप ह्याच ओळींत दिसते.चार भिंती-बंधने जी सर्वांच्या प्रवासात येतात पण वादळी आवेग -महाचिंतन व आचरण असणारे यांची बाळगत नाही....बंधनांची तमा नाही..

लाभू दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे
-महान लोक़ांची चरित्रे ह्याव्हे मूर्तिमंत उदाहरण आहेत.
हे गीत सा~यांचेच आवडीचे आहे...यातील प्रार्थना आयुष्याला फळू दे.

No comments: