Saturday, May 4, 2024

सेपियन- पुस्तक परिचय

 




युवल नोव्हल हरारी हे नाव आता कोणाला माहित नाही हे फार कमी आहे. आपण कोण आहोत? आपण इथपर्यंत कसे आलो? येताना काय काय मागे सुटले आहे ?काय काय गाठोड घेऊन इथे आलो आहोत? ते गाठोड आहे का ते ओझं आहे? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हा माणूस एका झटक्यात (ह्या पुस्तकात) देतो. याचा अभ्यास इतका दांडगा आहे की त्याने अशा गहन विषयांवर सोपी वाटणारी अनेक पुस्तके लिहिले आहेत. पण हे पुस्तक जे आहे 'होमो सेपियन' हे पुस्तक  2012 म्हणजे जवळपास आज पासून बारा वर्षांपूर्वी दिलेले आहे. म्हणजे पुस्तक मला उशीरच मिळाले आहे. हे पुस्तकाची सुरुवातच होते ते पृथ्वीच्या उत्पत्तीपासून ज्यामध्ये पहिल्यांदा अणू येतात.मग त्यांपासून पदार्थ बनतात या पदार्थांपासून जीव बनतात आणि मग ह्या जीवांमध्ये हळूहळू उत्क्रांती होत होत माणूस ते शहाणा माणूस म्हणजे आपण उत्क्रांत होतो.पण ही नैसर्गिक उत्क्रांती होत असतांनाच अनेक प्राण्यांचे अस्तित्व आपण जाणूनबुजून संपवत आलो ही काळी बाजूही यात मांडली आहे.  हळूहळू इतर प्राणी व इतर आपल्याच प्रजाती निअंडरथर्ल माणसाला देखील संपून हा होमोसेपियन एकटा जगावर राज्य करत आहे. 

"आपले पूर्वज निसर्गाशी सुखसंवाद करून राहिले हा पर्यावरण प्रेमींच्या म्हणण्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका"... उलट "होमोसैपियन हे सर्वात संहरी प्रजाती होत". उत्क्रांती  दरम्यान होमोसेपियन ज्या ज्या ठिकाणी (खंडात)गेले तेथील प्रजातींचा आश्चर्यकारक विनाश होत गेला. 

होम सैपियन हे  आफ्रिका-आशिया नंतर ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या खंडात जाऊन स्थलांतरित झाले त्याचवेळी तेथे मोठे उलथापालथ झाली.पर्यावरण /हवामान बदलाने की तेथील प्राण्यांचा नाश झाला .परंतु हा योगायोग होमोसेपियन तिथे येणार आणि काही काळातच आणि एवढ्या महाकाळ प्राण्यांचा नाश होणे ही गोष्ट वारंवार घडत गेली.

आपण पाहू शकतो ऑस्ट्रेलियातील जवळपास 24 पैकी 23 मार्सुपिअल प्रजाती (सद्यस्थितीतील प्रसिद्ध कांगारू हा मार्सुपिअल म्हणजेच पिलांना पोटा बाहेरच्या पिशवीत वाढवणारा प्राणी) नष्ट झाल्या.साधारण न्यूझीलंड बाबतीत आहे. आग लावून गवत,झाडे जाळायची.अन्नासाठी गवताळ भागात प्राण्यांना यावे लागत आणि त्यांची शिकार करायची असे होमोसैपियन तत्व होते. त्यामुळेच अग्नी रोधक अशा निलगिरी वनस्पती व  त्यांवर जगणारे अनेक प्राणी वाचले.

ही होमोसैपियनची खुनशी लाट जमिनी पुरतीच होती.पाण्यातले जीव अनेक लक्ष उत्क्रांतीने इथवर पोहचले आहेत.पण आता समुद्री औद्योगिक क्रांतीने हे होमोसैपियन त्यांना पण नष्ट करतील.

हे सगळं घडलं नसतं तर मार्सुपिअल सिंहाचं आज राज्य असतं....



त्याला लागलेल्या शेतीचा शोध एक मोठा भाग म्हणजे स्वावलंबी झाला परंतु निसर्गाच्या विरुद्ध ही गोष्ट होती आणि तो नकळत गुलाम झाला आणि इथूनच गुलामगिरीचा देखील सुरुवात झाली.

उत्क्रांतीचे चलन भूक नाही आणि दुःखही नाही तर ते आहे डीएनएची नक्कल. एखाद्या कंपनीच्या बँकेत किती डॉलर जमा आहेत त्यावर कंपनीचे यश मोजतात कर्मचाऱ्यांच्या समाधानावर नाही. त्याचप्रमाणे प्रजातीतील जातीचे उत्क्रांती विषयक यश तिच्या डीएनएच्या नकलांच्या प्रतिवर मोजले.डीएनए आणखी प्रति शिल्लक नसतील तर जाती कायम नष्ट होऊन जातात एखाद्या जातीच्या अनेक प्रती असल्याची बढाई मारली जाते तेव्हा त्या जातीचे यश आणि तेव्हा त्या जातीची भरभराट होती यातून पाहिलं. तर शंभर पेक्षा हजार प्रती कधीही चांगल्या. 

वाईट परिस्थितीत अधिक लोकांना जिवंत ठेवण्याची क्षमता हीच कृती कृषी क्रांतीचे सार आहे

-युवलहरारी

कृषी क्रांतीने भटक्या सेपियन्सला डोमेस्टिक(घरात बसणारा) केले सेपियन्सने पिकांना माणसाळवल नाही.अशातही गहू ,तांदूळ आणि बटाटा यांच्या शेतीने त्याला पोषणमूल्ये तर नाहीच मिळाले पण कुपोषण व रोगराई वाढले.लोकसंख्येचा भस्मासुर निपजला.

शेतीसाठी खडतर कष्ट उपसून पाठीचा कणा सरकलाच पण हार्निया इतर समस्याही उद्भवला.पिकांवर अवलंबून राहत ,त्यांच्या सुरक्षेखातर अनेक टोळी संघर्ष सुरू झाले.कृषीक्रांती घोडचूक होती जी अनेक पिढ्यांनी comfort zone म्हणून परत परत केली??



मग काय माणसाकडे वेळ, पैसा काय काय यायला लागलं.नाही त्या गोष्टी सुचायला लागल्या .मस्त गोष्टी निर्माण करायला लागला. आणि अनेक संस्कृती निर्माण केल्या. या संस्कृतीमध्ये तो गटात देखील विभागला गेला.

३५,०००-४०,००० हजार वर्षांपूर्वी जर्मनीतल्या प्रागैतिहासिक काळात प्रारंभिक बोधात्मक क्षमता विकसित काळात होमो सेपियन्सने ही मूर्ती घडवली.अन्नसाखळीत तेव्हा सिंह सर्वोच्च होता.पण लवकरच सेपियन्सनी ती जागा घेतली.तरीही सिंहाबद्दलचा नितांत आदर इथे दिसतो आहे का?

कदाचित एक श्रद्धा निर्मितीचे सर्वात प्राचीन उदाहरण!



हे सर्व असतानाच लिपींचा लावलेला शोध कथा रचण्यासाठी मदतच करू लागल्या.

फक्त कायदे करणे आणि आपला प्रतिपाळ करणाऱ्या देवांच्या गोष्टी सांगणं या बाबी मोठी राज्य टिकून ठेवण्यासाठी पुरेशा नव्हत्या. राजाला काहीतरी कर गोळा करावा लागत असे"

-युव्हाल नोव्हा हरारी

पण माणसाची बौद्धिक क्षमतेमुळे हे कर ,त्यांची येणी,बाकी सर्व लक्षात ठेवणार कसे? मग तेव्हा पहिल्यांदा लेखन कलेचा उगम झाला मेसोपोटेमियात ही लेखन आंशिक(चित्र लिपी)होती.म्हणजे केवळ कराची नोंदणी यात होत असे काव्य,नाटक वगैरे गोष्टी यामध्ये लिहिल्या जात नसेल एकंदरीत म्हणजेच गणिती संकल्पना जेव्हा माणूस वापरू लागला तेव्हाच खूप मोठ्या  क्षेत्रासाठी ती उपायुक्त झाले.त्यात ही भारतीयांनी शोधलेले शून्य ते नऊ हे अंक अगदी महत्त्वाचे ठरले परंतु तेव्हा अनेकदा अरबांनी भारतावरती आक्रमण केले होते आणि त्यांनी ही शून्य ते नऊ ही अंक पद्धती जगाला ज्ञात करून दिली.युव्हाल म्हणतोय लिपी प्रथम मेसोपोटेमियात शोधली पण नक्कीच इतरत्रही ती विकसित होत असणारं.



जसा हरारी काय म्हणतो की या सगळ्या गोष्टी माणसाने रचलेल्या कथा आहेत मी ह्याच कथांवर विश्वास ठेवून माणूस अजून एकमेकांशी भांडत आहे माझा धर्म श्रेष्ठ की तुझा धर्म श्रेष्ठ? माझा माझं राज्य श्रेष्ठ की तुझा राज्यश्रेष्ठ? ब्ला ब्ला ब्ला ...

हे सगळं घडत असतांना निसर्गाने केले नाही इतका भेदभाव शहाण्या माणसाने सर्वत्र सुरू केला.याच्या अधिक बळी पडल्या स्त्रिया..

डिस्क्रिमिनेशन म्हणजेच भेदभाव जगात काळे -गोरे, श्रीमंत- गरीब, स्वतंत्र -गुलाम अशा प्रकारचे भेदभाव चालत आलेले आहेत आणि हे दुष्टचक्र अजूनही संपले नाहीये. तो आणि ती म्हणजेच लिंग भेदभाव पण आहेत.हे निसर्गनिर्मित नाही तर मानवनिर्मित आहेत. तसेच आपण पाहतो की पितृसत्ताक  हे जगामध्ये जास्त ठिकाणी आहे. 

हरारी म्हणतो,

 "या सगळ्या नाट्यमय बदलांमुळेच लिंगभावाचा इतिहास चक्रावून टाकणारा ठरतो पितृसत्ताक पद्धती जैविक घटकांवर आधारित नसून निराधार पूरा कथान वर आधारित असल्याचे आज स्पष्टपणे दिसून येत आहे मग असा प्रश्न उपस्थित होतो की पितृसत्ताक व्यवस्थेला विश्वव्यापकता आणि स्थैर्य या गोष्टी कशा बरे लाभले असतील?"

फोटोत तेच सांगितले जैविक/निसर्ग कधीच स्त्रीला वेगळं समजत नाही ती मात्र सांस्कृतिक/सामाजिक पातळीवर अनेकदा भेदभावाला बळी पडत राहिली आहे.

पुस्तकात औद्योगिक क्रांती आणि वैज्ञानिक क्रांती यांचा खुप चांगाला आढावा घेतला आहे.अज्ञानाचा शोध आणि  ज्ञानाचा उलगडा ...e=mc2ह्या समीकरणाने सगळं जग बदलून टाकलं. माणूस हे सगळं करत असतानाच निरीक्षण शक्ती लागली त्यातही एका ज्ञानेंद्रियाने देखील आपण निरीक्षण करून त्यामध्ये वेगळे ज्ञान मिळू शकतो. हे निरीक्षण गणितीय साधनांनी केले तर त्याची पूर्णपणे पुष्टी होते. आणि हेच ज्ञान सत्य आहे की नाही ही त्याची खरी कसोटी नसून ते आपल्याला शक्ती देते की नाही याची खरी कसोटी आहे. त्याची उपयुक्तता ठरते .मग त्यालाच आपण उपपत्ती म्हणजेच संशोधन म्हणतो. हे संशोधन आपल्याला नवनिर्मितीसाठी अतिशय समर्थ बनवतात. अजून नवीन ज्ञान तयार करतात पण हे विज्ञान अजूनही स्वतःचे अग्रक्रम रवण्यास असमर्थ आहे. तेव्हा  साम्राज्याने त्याला हाताशी धरले. झालं तर अशाप्रकारे विज्ञानाचा वापर करून शुक्र मार्गक्रमण शिकण्यासाठी समुद्री मोहीम काढल्या गेल्या जगाच्या चार कोपऱ्यांमध्ये या धाडण्यात आल्या. सायबेरिया, उत्तर अमेरिका, मादागस्कर, दक्षिण आफ्रिका पुढे गेलेल्या येथे देखील त्या गेल्या महासागरात देखील त्या गेल्या. पण हे सगळं असताना लक्षात काय आलं की एवढ्या मोठ्या मोहिमा करताना त्यातील काम करणाऱ्या लोकांचा  दूर मोहिमेत मृत्यू  होतं.पण तिथेच स्कर्व्ही रोगाचा शोध लावला आणि आणि ब्रिटिश जेम्स लेंड यांनी सीट्रस फ्रुट देण्याचा सपाटा लावला.तिथे आणि मग काय जादू झाली. सागरी मोहिमांमध्ये विटामिन सी च्या कमतरतेने होणाऱ्या स्कर्वी रोगावर बऱ्या प्रकारे नियंत्रण मिळाल्यावर माणूस लांब लांब समुद्री मार्गाने जायला लागला आणि एक नवीनच विश्व त्याला समजले हिरो के लोकांनी याच्यामध्ये आणि त्यांनी पुढाकार घेतलाच नाही तर व्यापार नावाचे नवे तंत्र जगामध्ये स्थापित केले. आता या मोहिमा काढताना खर्चही लागत असेल आणि मग आला तिथे आणि एक लोकांनी एकत्र येऊन उभारलेली भांडवलशाही आणि या भांडवलशाहीतून होणाऱ्या नफा वेगवेगळ्या उद्योगांमध्ये देण्यात आला. उद्योगाची चक्रे वेगाने फिरली त्यापूर्वी फक्त मसल ऊर्जा किंवा सौर उर्जा याचाच माणूस वापर करत असे.  मग पुढे काय वेगवेगळ्या ठिकाणी वापर करताना वेगवेगळ्या खाण्यांचा शोध घेण्यात आला .मग सापडले अल्युमिनियम अल्युमिनियम हे पूर्वी सोन्यापेक्षा देखील महाग होते. कारण की त्याची उपयुक्तता आणि हाच अल्युमिनियम वापरून पुन्हा एकदा बदलले. 

हे सागरी मोहिमा करत असताना अनेक ठिकाणी लुटमारीचे देखील प्रकार व्हायला लागले. स्थानिक लोकांकडून देखील आक्रमणाचे भीती वाटायला लागली.फक्त राज्याचे सैन्य नाही किंवा राष्ट्राचे सैन्य नाही तर अशी मोठमोठे जहाज देखील स्वतःचे असे वैयक्तिक, पर्सनल सैन्य बाळगू लागले. तिथूनच पुढे महायुद्धाची हळूहळू पार्श्वभूमी बनत होती.

हे सर्व चालू असताना कुठेतरी विजेची ठिणगी पडली एडिसिनच्या डोक्यातच की, अस की आणि मग काय इलेक्ट्रिसिटी देखील आली आणि जगाचा पुन्हा एकदा कायापालट झाला.तो आजपर्यंत सुरू आहे.

पण हे सर्व कशासाठी सुरू आहे सुखासाठीच ना..पण तिथेही ज्या मेंदूतील जीव रसायनांमुळे सुख भावना निर्माण होती.त्या मेंदूला समजून घ्यायला आपण जोमाने सुरूवात केली आहेच..


सेरोटोनिन,डोपामाईन,ओक्सिटोक्सिन ही मेंदूतील जीव रसायने सुख मिळवण्यासाठी कारणीभुत आहेत.पण यांचा स्त्राव होण्याचा कालावधी प्रत्येकीसाठी, वेगवेगळ्या घटनांमध्ये वेगवेगळा असतो.याचीसुद्धा जनुके काही मागच्या पिढीतून मिळतात तर काही उत्क्रांतीसाठी /वंश चालविण्यासाठी हजारो वर्षांपासून बरोबर पुढे जात आहे.

एवढं सर्व असतानाही बाह्य घटकांनी,विचारधारेने बर्याच लोक शहारले जातात.स्थिर जितके राहायला शिकू तितकं मेंदूला समजून घेत राहू.त्यावर विजय मिळवून जग जिंकता राहू..

इति लेखन सीमा

-भक्ती