राक्षस - तंगडी युद्ध आणि विजयनगरचा ऱ्हास
राजा कृष्णदेवराय यांच्या मृत्यूनंतर, सिंहासनासाठी दोन दावेदार होते; त्यांचे जावई रामराय आणि पुतणे अच्युतदेवराय यांच्यात वाद होता. अच्युतदेवराय हे कृष्णदेवराय यांची निवड होते आणि ते इस्लामी आक्रमकांच्या बाजूने अजिबात नव्हते. त्यांच्या राजवटीत, त्यांनी आदिल शाहशी युद्ध करून रायचूर पुन्हा जिंकले. त्यांनी गोलकोंडाच्या कुतुब शाहशी लढून त्याला पराभूतही केले. त्यांनी त्रावणकोर आणि उम्मतूर ही राज्ये एकत्र केली. रामराय यांच्या विनंतीवरून 'बहमनी सुलतानांनी' या दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. अच्युतदेवराय यांना ठार मारून (त्यांना तुरुंगात टाकल्यानंतर) रामराय एका लष्करी उठावाद्वारे सत्तेवर आले. अच्युतरायाच्या ज्यांचा मृत्यू इ.स. १५४२ मध्ये झाला. त्यानंतर सिंहासन कृष्णदेवराय यांचे भाचे आणि अल्पवयीन असलेले त्यांचे पुत्र सदाशिवराय यांच्याकडे गेले. रामराय यांनी सदाशिवराय यांना नजरकैदेत ठेवून आपल्या विश्वासू माणसांना सिंहासनाभोवती महत्त्वाच्या पदांवर नेमून साम्राज्याचे शासक बनण्याची संधी साधली.
अलिया राम राय (जन्म सुमारे १४८४, मृत्यू २३ जानेवारी १५६५) हे विजयनगर साम्राज्याचे वास्तविक शासक होते. ते कृष्णदेवराय यांचे जावई (अलिया = जावई ) होते. नाममात्र राजा सदाशिव राय होता, पण सत्ता, प्रशासन आणि सेना रामरायांच्या हाती होती. त्यांना अराविडू वंशाचा संस्थापक मानले जाते.रामराय आणि त्यांच्या भावांनी (तिरुमल राय, वेंकटाद्रि) सत्ता हाती घेतली.
रामा रायांचा धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक आणि उदारमतवादी होता आणि त्यांनी आपल्या सैन्यात मोठ्या संख्येने मुस्लिम सैनिकांची भरती केली. त्यांच्याप्रती असलेल्या त्यांच्या वागणुकीचीही प्रशंसा झाली आणि विजयनगर साम्राज्याने पदच्युत केलेल्या अनेक आदिल शाहना आश्रय दिला.रामा रायाच्या रणनीतीमध्ये राज्याचा विस्तार करणे आणि एक धूर्त राजकीय कार्यकर्ता बनणे यांचा समावेश होता.त्यांनी "फूट पाडा आणि राज्य करा" ही नीती अवलंबली. तो पाच विरोधी बहामनी राज्यांनी वेढलेला होता आणि त्याचे श्रेय असे की, त्याने त्या पाच राज्यांमधील दोन सुलतानांना एकमेकांविरुद्ध लढवून सतत युद्धे घडवून आणली.
अली आदिल शाह हा बीजापूरचा सुलतान होता. रामरायांच्या काळात त्यांच्यात मित्रत्व आणि शत्रुत्व दोन्ही संबंध होते. हे संबंध राक्षसी तंगडी युद्धाचे एक महत्त्वाचे कारण ठरले.
१५५७ च्या आसपास अली आदिल शाहने अहमदनगर (निजाम शाह) विरुद्ध मदत मागितली. रामरायांनी त्याला मदत केली. विजयनगरच्या सेनेने अहमदनगरवर हल्ला केला आणि कल्याण, रायचूर दोआब सारखे प्रदेश जिंकले.
अली आदिल शाहने रामरायांना आपला पिता मानले होते. रामरायांच्या दरबारात त्याचे स्वागत मोठ्या सन्मानाने झाले होते. विजयनगरची राणीमाता त्याला "माझा मुलगा" म्हणून संबोधायची.
संबंध बिघडण्याची कारणे
रामरायांनी जिंकलेले प्रदेश (विशेषतः रायचूर, कल्याण) परत द्यायला नकार दिला.रामराय वयस्कर असल्याने अली आदिल शाहला अपमानास्पद वागणूक दिली. त्याच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचवली (फेरिश्ता इत्यादी इतिहासकारांच्या मते).
विजयनगरच्या सैनिकांनी मुस्लिम सैनिकांना अपमानित केले.नंतर रामरायांनी अहमदनगर आणि गोलकुंडाला मदत करून अली आदिल शाहला धडा शिकवला. यामुळे आदिल शाह नाराज झाला.
राम रायाने सुलतानांमध्ये सतत वैर वाढवून विजयनगर साम्राज्याचे रक्षण केले, परंतु ही रणनीती फार काळ टिकली नाही, कारण त्या पाचही राज्यांना हे लक्षात आले की रामा रायाच्या रूपात त्यांचा एक समान शत्रू आहे.
निजामाची मुलगी चांद बीबी हिचा विवाह अली आदिल शाहशी झाला आणि अली आदिल शाहच्या बहिणीचा विवाह निजामाच्या मुलाशी झाला. या विवाह सोहळ्यात इस्लामी घराणी एकत्र आली आणि उत्सवानंतर विजयनगर साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, ते पाच जण एकत्र आले आणि आदिल शाहने राज्याचे दोन महत्त्वाचे किल्ले, रायचूर आणि मुद्गल, यांच्या मागणीसाठी राम रायाकडे एक दूत पाठवला. त्या हिंदू नेत्याने त्या दूताला आणि त्यानंतर आलेल्या इतर अनेकांना नकार दिला. आणि तालिकोट युद्धाला तोंड फुटले .२३ जानेवारी १५६५ ई.कर्नाटकातील तालीकोटा जवळील राक्षसी (रक्कसगी) आणि तंगडी (तेंगडी) या गावांमधील मैदान. यामुळे याला राक्षसी तंगडी युद्ध किंवा बन्नीहट्टी युद्ध म्हणूनही ओळखले जाते.
हिंदू नेत्याने एक लाख घोडेस्वार आणि पाच लाख पायदळ असलेले विजयनगर सैन्य जमवून युद्धाची तयारी आधीच सुरू केली होती. या सैनिकांवर सल्तनतीच्या सैन्याला कृष्णा नदीत प्रवेश करण्यापासून रोखण्याची जबाबदारी होती.
मध्यभाग: रामराय स्वतः (हत्तीवर बसून),उजवी बाजू: वेंकटाद्रि ,डावी बाजू: तिरुमल राय
तथापि, सैन्य पुढे निघाले. क्रोधाने पेटलेल्या रामरायाकडे कोणतीही योजना किंवा रणनीती नव्हती. इतिहासकारांच्या मते, त्याने आपल्या सैनिकांना सल्तनतींवर थेट अंदाधुंद हल्ले करण्याचा आदेश दिला आणि म्हणाला, “आम्ही या क्षुल्लक युद्धाला घाबरणारे भित्रे नाही! पुढे व्हा, लढा.” अखेरीस त्याचा काही उपयोग झाला नाही, कारण मोठ्या संख्येने हिंदू सैनिक मारले जाऊ लागले. उरलेले सैनिक, जे घाबरले होते, ते अमाप संपत्ती आणि राजपद मिळण्याच्या शक्यतेने प्रेरित झाले. याचा परिणाम झाला आणि सैनिकांनी बहामनी सैन्याच्या डाव्या बाजूची संपूर्ण फळी नष्ट केली.
यामुळे सुलतानांमध्ये चिंता निर्माण झाली, आणि त्यांपैकी काहींनी तर आपल्या छावण्यांसमोर 'रहतानत' (सैनिक जिहादमध्ये मरेल आणि स्वर्गात जाईल याची पवित्र शपथ) लिहिलेल्या पाट्या लावल्या. तथापि, निझाम शाह, कुतुब शाह, अली आदिल शाह आणि अली बरीद यांच्या संयुक्त सैन्याने धैर्य एकवटून हिंदू सैनिकांवर हल्ला केला. अली आदिल शाहने रामा रायाचा भाऊ तिरुमला रायावर हल्ला केला, तर इतरांनी रामा रायाच्या इतर महत्त्वाच्या सैनिकांवर हल्ला केला. नंतर अली आदिल शाहने रामा रायावर हल्ला केला आणि निझाम शाह व कुतुब शाह यांना थेट आपल्यासमोर उभे राहण्याची संधी दिली.सल्तनतांनी तोफा चेन करून एक भिंक तयार केली (Rumi Khan च्या नेतृत्वाखाली, Ottoman तंत्रज्ञ). विजयनगरचे पायदळ जेव्हा जवळ आले, तेव्हा नजीकच्या अंतरावरून तोफांची धुव्वाधार गोळीबार (grape shot / copper coins सारखे shrapnel वापरून).यामुळे विजयनगरच्या हजारो सैनिकांचा एकदम नाश झाला आणि त्यांची आक्रमणाची गती थांबली.
तसेच रामरायाचे दोन मुस्लिम कमांडर (गिलानी बंधू) होते.गिलानी बंधूंनी मुस्लिम सैनिकांना हिंदू शासकासाठी लढू नये असा आदेश दिला.
यादरम्यान, विजयनगर साम्राज्यातील अनेक मुस्लिम सैनिकांनी रामरायासाठी लढण्यास नकार दिला . त्यांनी एकतर आपली शस्त्रे खाली ठेवली किंवा रामरायाविरुद्ध सुलतानांना सामील झाले. त्यांनी हिंदू सैन्याच्या बाजूने लढण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर सुलतानांनी विजयनगरच्या सैन्यावर दोन तोफा डागल्या आणि बहुतेक सैनिक मारले गेले. आणखी एक तोफ रामराय ज्या हत्तीवर बसले होते, त्यावर डागण्यात आली.
जखमी झालेल्या रामा राया यांना नंतर रणांगणावर निजामाच्या पायाशी नेण्यात आले, ज्याने त्या हिंदू नेत्याचे शीर धडपासून वेगळे केले, ज्यामुळे त्या विशाल हिंदू साम्राज्याचा अंत झाला. रामरायांचा शिरच्छेद भाल्यावर चढवून दाखवल्यावर विजयनगर सेना मोडून पळाली.
“इस्लामच्या योद्ध्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि समोर दिसणाऱ्या प्रत्येकाची कत्तल केली. सुमारे वीस मैलांचा परिसर मृतदेहांनी भरला होता आणि जमीन रक्ताने माखली होती. इस्लामच्या विजयी सैनिकांनी नाणी, दागिने आणि पुरुष व स्त्री गुलाम यांच्या रूपात अमाप संपत्ती लुटली,” असे ऐतिहासिक नोंदींमध्ये नमूद आहे. तसेच, रणांगणावर पडलेल्या मृतदेहांची संख्या मोजायला १२ दिवस लागले, असेही त्यात पुढे म्हटले आहे.
राक्षसी तंगडी युद्धानंतर (२३ जानेवारी १५६५) विजयनगर साम्राज्याची राजधानी हम्पी येथे दक्कन सल्तनतांच्या सैन्याने ५ ते ६ महिने सतत लूट, नाश आणि हत्याकांड केले. ही लूट इतिहासातील सर्वात भयानक आणि विध्वंसक घटनांपैकी एक मानली जाते.
युद्धानंतर काही दिवसांतच (२६-२७ जानेवारीच्या आसपास) सल्तनतांची सेना हम्पीपर्यंत पोहोचली.राजघराण्यातील प्रमुख व्यक्ती (रामरायांचे भाऊ तिरुमल राय इ.) आधीच पळून गेले होते.सैन्याने शहरात शिरून लूट, आग आणि हत्या सुरू केली.ही प्रक्रिया सुमारे ५-६ महिने (काही स्रोतांनुसार जानेवारी ते जून/जुलै) चालली.
विजयनगर हे त्या काळातील जगातील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक होते. सोने, हिरे, मोती, मंदिरातील मूर्ती, राजवाड्यांतील खजिना सर्व काही लुटले गेले.
पुर्तुगीज इतिहासकार Diego de Couto नुसार “लूट इतकी प्रचंड होती की गठबंधनातील प्रत्येक सैनिक सोने, दागिने, घोडे, हत्ती आणि गुलाम यांनी श्रीमंत झाला.”
विठ्ठल मंदिरात आग लावली.नरसिंह मूर्तीची हात-पाय तोडली.राजवाडे, बाजार, मंदिरे सर्व ठिकाणी crowbars आणि axes ने तोडफोड केली.
मोठमोठ्या दगडी इमारतींना आग लावली. हजारो लोक मारले गेले, बायकांशी अत्याचार, गुलाम बनवले. शहर सोडून लोक पळाले.
समकालीन वर्णन (रॉबर्ट सेल - A Forgotten Empire)
“...आग आणि तलवारीने, crowbars आणि axes ने ते दिवसभर नाश करत होते. जगाच्या इतिहासात कदाचित असे भयानक नाश कधीही एका शहरावर इतक्या लवकर झाले नसेल. एक दिवस श्रीमंत आणि समृद्ध शहर, दुसऱ्या दिवशी लुटलेले, जाळलेले आणि खंडहर...”
त्यानंतर हम्पी कधीही पूर्वीसारखे वसले नाही.
१५६७ मध्ये इटालियन प्रवासी Cesare Federici ने हम्पीला भेट दिली तेव्हा तो म्हणाला: “शहर अजून पूर्णपणे नष्ट झाले नाही, पण घरं रिकामी आहेत. फक्त वाघ आणि इतर जंगली प्राणी राहतात.”
विजयनगर साम्राज्याचा अंतिम पतन झाला. अराविडू वंशाने पेनुगोंडा इ. ठिकाणी राजधानी हलवली, पण पूर्वीची महानता कधीही परत आली नाही.
ही लूट केवळ आर्थिक नव्हती, तर सांस्कृतिक आणि धार्मिक विध्वंसही होता. आज हम्पीचे खंडहर (UNESCO World Heritage) या भयानक घटनेची साक्ष देतात.
