
कैफ़ात सांडताना(विरह)
व्रुत्त:गागाल गालगागा,गागाल गालगागा
डोळ्यांतली निळाई,कैफ़ात सांडताना।
का याद आज त्याची,आयुष्य पांगताना॥१॥
जातो पतंग दोरा,उंचीवरी नभाच्या
धागे तुटे प्रितीतच,नादात भांडताना?॥२॥
अंधार पांघरूनी,गेल्या निजून रात्री
येई सुगंध फ़ुलां,जीवात नांदताना॥।३॥
बांधून मोडलेल्या,खेळातल्या घराची
लाभे अजून रेती,पाण्यात रांगताना॥४॥
पिंडीस कावळ्यांनी,माझ्या तरी शिवावे
आवाज हुंदक्यांचा,स्वर्गात टांगताना ॥५॥
-भक्ती.
No comments:
Post a Comment