Thursday, June 14, 2012

काहूर

पाणीदार नयनी
अश्रू गोठला
कोणाच्या मनी
काहूर दाटला॥

उल्का दीवानी
आकाश सोडला
भयभीत अवनी
काहूर दाटला॥

वेलीवरी वनी
मंद.. गंध सांडला
फ़ुलांच्या श्वासांनी
काहूर दाटला॥

लाटांच्या सुरांनी
सागर निजला
दीपस्तंभी घंटांनी
काहूर दाटला॥

ना उरे निशाणी
खेळ संपला
को~या पानांनी
काहूर दाटला॥

-भक्त्ती



Monday, June 11, 2012

सहवास

आत्मा

आत्मा-१
पिंपळाच्या फ़ांद्यांवर लटकतांना
झाडांच्या गात्रा गात्रात तु पोहचला
आणि सुसाट वारा जेव्हा आला
तू पानांच्या सळसळीतून निसटतांना
अंगणात सैरभैर धावला
तिथे दिवा होता लावलेला
त्याच्या ज्योती एकटक तू पाहत बसला
मग दिव्याखालच्या अंधारात तू नाहिसा झाला


ते लोक उगाच कुजाबुजता अजून ...त्यांनी तुला पाहिले॥
-भक्त्ती

आत्मा-२
मऊशार ह्र्दय धडधडत होते
तेव्हा तू दूर होता ...कसल्या तरी शोधात
ते ह्र्दय आता धडधडत नाही
तरी तू दूर आहेस....कसल्या तरी शोधात॥
-भक्त्ती

आत्मा-३
तू मनापेक्षा सुदैवीच आहे...
मन ,शरीरासह मरूंन जाते?
पण तू अमर आहे?
जन्मभर मनाला शब्दांचे घाव
कावळ्यांसारखे टोचतात...
मेल्यावर कावळ्य़ांना घास घालतात
तू शांत असावा म्हणून...
तू मात्र खरच मनापेक्षा सुदैवीच आहे....



-भक्त्ती

तुझी मी होताना

तुझी मी होताना
अनामिक वाटेवर
तेजो:गोल प्राशला मी...।

तुझी मी होताना
स्पंदने हळूवार
नाव पुकारती तुझे..।

तुझी मी होताना
न्याहळता आरसा
प्रतिबिंब तुझेच दिसे...।

तुझी मी होताना
डोले तुझ्या तालावर
फ़िरे मनभर मोरपीस...।

-भक्त्ती

भ्रम

विस्मरणाच्या जाळीत
गुंतलेल्या जीवनात
भ्रम झुळूक होतात...

कधी निसट्तात
कधी हादरवतात
भ्रम पावले चोरतात....

मनीचे गुंजन गातात
दु:खाला चिमटीत पकडतात
भ्रम रूप दाखवतात....

काळ्या ढगांत
उन्हाचे अस्तित्व
भ्रम सर्वांग जाळतात...

आठवणींना वर्तमानात
गडद रंगवतात
भ्रम खोल दरीत राखतात....
मनाच्या,कल्पनेच्या,अस्तित्वच्या....असंख्य जागी...


-भक्त्ती.