Sunday, May 4, 2014

सरी

सोसाट वारा हवा थंड खट्याळ
मनाला चाहूल दाटले वरी आभाळ

होईल क्षण मोकळे सरी कोसळ
मोहाचा डोह पार ढवळ ढवळ

चिँब चिंब भिजुनी वाहे आनंद खळखळ
थेंब थेंब साठवुन भरल सुखाचं तळ

गोष्ट फुलती सरी अन माझी प्रांजळ
कित्येक येतील मेघ ऋतु ना तुटणार ही नाळ
@भक्ती

पांडुरंग.................

ऐसे भेट व्हावी
भक्त - पांडुरंगा।

जैसे भक्तीभाव
लाभतो अभंग।

नाते जन्मोजन्मीचे
पांडुरंग तु जिवलगा।

घडो सेवा सदा
विसरावे या जगा।

भक्ती

sandhya

संध्येची लालिमा लेवून
पहावी वाट रातीची
चांदण बिंदी घ्यावी गोंदून
मिटावी पाखरे डोळ्यांची
स्वप्नाच्या उंबऱयाशी थबकून
जाणीव बिंदूसम अस्तित्वाची

विहरावे अंतराळी हरवून.....

भक्ती

.......

ऐक अतृप्त ह्रदयाच्या स्पंदनाचा ठाव
कुठवर नाकारशील जीवनाचा डाव।

चंद्राने ना लपवला काळाचा घाव
कसा लपवशील अस्तित्वाचा गाव।

भक्ती

तिऴगुळ घ्या गोड गोड बोला

किती थोडे क्षण
सावर रे मन

रेशीम प्रेमबंधन
जाहले हे ऋण

नको आता रुसण
अढी मनी धरण

एक गोड मागण
नात्याचा गोडवा जपण।

मित्रांनो तिऴगुळ घ्या गोड गोड बोला।

भक्ती

नियीति

या दुरच्या प्रवासात
तु माझ्या कधी मागे....
तर माझ्या कधी पुढे.....
सांग तु कितीदा
माझ्या बरोबर होता?

.
..
...
ताटातुट करायला काळ हजर होता
नियीतिने मांडलेला डाव खरोखर होता...,
फुललेल्या फुलाकडुन
जीवन बहरण्याचा आनंद घ्यावा
इवलाशा पाखराकडुन
उंच भरारीचे स्वप्न घ्यावे
....
.....
.......
अवकाळी पावसाच्या लहरीपणाकडुन
संकट ,दु;ख, ...लहरी आयुष्याचा
धडा शिकुन घ्यावा......
.;...निसर्गाच्या शाळेत शिकत राहावे.....

Bhakti