Wednesday, May 29, 2013

O2 ऑक्सिजन

1.
काळे ढग दाटले,म्हणून पाऊस येईलच असे नाही।
स्वप्नातली फुले आयुष्यात उमलतीलच असे नाही.....................
.हां ती फुले अंतरंगाला मात्र सुगंधित करतील।।(ऑक्सिजन)@भक्ती

2
पुन्हा पुन्हा घोँगावत वादळ,
मनातल्या घरात कल्लोळ
........... पंखात विश्वासाचे बळ.....परत भरारी!
(ऑक्सिजन)@भक्ती

3.
मोङला ङाव कोणी,
विचारे ङोळ्यातले पाणी
...........वेङया राधा-कृष्णाची'ही' अधुरी कहाणी।।(O2)@भक्ती

4.

सुख-दुःखाची लाट कधी मोती नेती,हाती खडे देती।
घर वाहून नेताना,पायाखालची घेऊन जाते रेती
............लाटांना भिऊन किनारेही नाही लाभती।।
(O2)@भक्ती

5.

जीव हजारो वाटा धुंडाळतो,खरा मार्ग ना मिळतो
कधी पत्ता चुकीचा,कधी पत्ता सांगणारा चुकीचा असतो।
..............पण पाय अजुन चालते आहेत तेव्हा जीव नाही दमतो।।(O2)@Bhakti

6. 
खचत इवल मन
कुठेतरी पोकळी
दोन मुठभर व्यापुन
राहू दे माती कोवळी

भक्ती

 (O2)@Bhakti

7. 

निभावत येत जीवन
कुंपणाच्या आत तीन दगड मांडुन
चार नात्यात रमुन
सापडत जीवन
कुंपणाच्या बाहेर ठेचाळुन
त्या रक्ताचा मळवट भरुन।।
गाता येत गाणं
स ला स जोडुन
मान डोलवुन
बहरत गाणं
दिलाच्या हाकेतुन
बोलक्या डोळ्यांच्या भाषेतुन।।
भक्ती
(O2)

वेली विष

जाळे शब्दांचे, अर्थ दडले खोल
फसव्या मनाला नसे याचे मोल।

संवेदनांचा जरि पांघरला झोळ
घायाळ अंतरीच अश्रु अनमोल।

नाते उद्याचे,रोपले खोट्या 'बी ' ने
वेली विषाच्या आवळति गळा गोल।

@भक्ती

1

तु समीप असला की भरत 
मन तु नसला की रित रित मन।

तुझा हात हाती बावरत मन
नजरेला नजर वाहवत मन।

तुझ्यासाठी प्रेमाचे शब्द शोधत मन 
तु बोलतांना स्वःताला विसरत मन।

दुराव्याचे ऊन जाळत मन
तुझ्या कातर सावलीत सांजावत मन।

(हिरव मन)
@भक्ती




2.
सावलीच्या घराला उन्हाचे दार,अनवाणी तू काळजी फार,
पावसाळी टिपूरला उशीर फार,घरावर काळ्या ढगांची गर्दीच फार।।
(हिरव मन)
bhakti




3.

तु दूर जातो
वैशाख अंग जाळतो।
तु मागे वळुन हासतो
हा गुलमोहर बहरतो।।

तु दुर जातो
पाखरु उदास गातो।।
तु दुरुन हात हलवतो
मनातल्या पावसात मोर थुईथुईतो।।
(हिरव मन)@Bhakti




4.

 सागराच्या खार्या पाण्याने भरली ओंजळ
वेड्या मना ना कळले सुखाचे मृगजळ.....


@Bhakti


 रातीच्या कुशीत स्वप्ने शिरली
गुलाबी रंगात मनं रंगली

बावर्या मना वाहू दे......

जादूई हवेत अंतरंग तरंगती
अनोख्या जगात क्षण रमती

बावर्या क्षणा वाहू दे......

भक्ती
(हिरव मन)