Friday, November 26, 2010

वेड हवच


वेड हवच

वेड हवच-1

शहाणपणाच सोंग
चांगुलपणाचा मुलामा
ख~यापणाचा बोलबाला
सार सार दिवसभर सांभाळून
एक तरी क्षण स्वच्छंदी जग़ण्याचे
तुफान वेड हवच....

वेड हवच
ढीगभर कामाचा बोजा
एकसारखे चहाचे कप
डोक्यावरचा भिरभिरणारा पंखा
किती किती नियम सांभाळून
थोडस अस्ताव्यस्त हुंदड्ण्याचे
काठोकाठ वेड हवच....

वेड हवच
सुर्यास्त डोळ्यात साठवायला
सागराला कवेत घ्यायला
पानगळ होणारी सोसायला
जरा जरा ओंजळीत पाणी घ्यायच
असामान्य वेड हवच....

-भक्त्ती

वेड हवच 2

वा~यासह स्पर्धा करण्याचे
अवखळ ,अल्लड होण्याचे....
आभाळात विहार करण्याचे
कल्पना ,कविता होण्याचे....

वेड हवच
पाखरासह घरट बांधण्याचे
चिवचिवणारी चोच होण्याचे....
शब्द मनातले बांधण्याचे
शब्द मोती,शब्द माळ होण्याचे....

वेड हवच
प्रतिबिंब सतत शोधण्याचे
शोधक,साधक होण्याचे....
रंगमंची स्व:तला शोधण्याचे
घुंगरू ,प्रकाश होण्याचे....

वेड हवच
जीवनाला साद देण्याचे
अणू ,रेणु कण होण्याचे....
मनु अनोखे स्वप्न देण्याचे
पाउलवाट ,मार्ग होण्याचे....
-भक्त्ती

No comments: