Sunday, August 28, 2022

बीट आणि नारळाची कोसांबरी

 



दिवाळीची तयारी सुरू झाली,म्हणजे इट क्लीन :)

मागे इथेच कोसांबरीची रेसिपी वाचली होती.भिजवलेल्या मुगाच्या डाळीचा वापर यात होतो.मी बीट आणि ओल्या नारळाचा वापर केलाय.प्रोटीन आणि आयर्न यांचा चांगला मेळ यात मिळतो.

साहित्य-

एक किसलेले बीट,काकडी,सफरचंद

एक वाटी किसलेले ओले नारळ

एक वाटी भिजवलेली मुगडाळ

एका लिंबाचा रस

चवीनुसार चिरलेली मिरची,मीठ,चाट मसाला,साखरदाणे

सर्व किसलेले बीट,नारळ,काकडी,सफरचंद,

भिजलेली मुगडाळ एकत्र करायची.चवीनुसार लिंबाचा रस टाकावा किंवा दही.मिरची कोथिंबीर,चाट मसाला,साखरदाणे टाकून एकत्र करावे.आवड असल्यास मोहरी कढीपत्ता फोडणी द्यावी.

-भक्ती

Sunday, August 7, 2022

अळूच्या वड्या आणि अळू देठांची कोशिंबीर
















पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आळुच्या वड्या बनवायलाच पाहिजेत. या वेळेस मी गुजराती पद्धतीचा अळूच्या पत्र्या असे त्याला म्हणतात अशा ही करायच्या ठरवल्या.

या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घेता येईल की इतके दिवस जो माझा पदार्थ चुकत होता, ज्या प्रकारे त्याला लेयर पडत नव्हते .लक्षात आले की जे बेसन पीठ आहे ते घट्ट मळायचे आहे मळायचे म्हणण्यापेक्षा ते त्याचं जे बेसन पीठ आहे ते त्याचा घोळ जो आहे तो घट्ट करायला पाहिजे.

चला तर करूया मग अळूच्या पानाच्या वड्या

पहिल्यांदा ळूची दहा-बारा पाने घ्यायची पाणी स्वच्छ करून घ्यायची आणि त्याची देठे काढून घ्यायची अळुच्या पानांना आता तेल लावून घ्यायचे.

आता बेसन पीठ साधारणतः तीन वाट्या ग्यायाचे.

त्यात  दोन चमचे मिरची आलं लसूण पेस्ट ,ओवा, तीळ, हळद ,हिंग ,मीठ असे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचे आणि थोडे थोडे पाणी टाकत घट्टसर मळून घ्यायचे.

आळूची पानं घशाला खवखवणे म्हणून ती त्रिकोणी असतील असलेली हवी याकडे लक्ष द्यायचे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये चिंच गुळाचा एक छोटी वाटी कोळ घालायचा आहे .

आता आता आळूचे एक पान घेऊन त्यावर हे बेसन पिठाचे घोळ पसरवायचा आहे हातानेच आणि त्यावर दुसरे पान ठेवून तो देखील घोळ त्याच्यावरती पसरवायचा आहे तुम्हाला जेवढे जास्त लेअर्स हवे तेवढे जास्त पाने एकावर एक ठेवत जायच आहे. मी इथे साधारणता तीन पाने एकत्र घेतलेली आहेत.

https://drive.google.com/uc?export=download&id=11BdpF4m-7GNtA6QlejlLgEPtsjHi7-_F

त्यानंतर याची गुंडाळी करायची आहे .

ह्या अळूच्या पानांची केलेले गुंडाळी आता डायरेक्ट बारीक चिरून तळू शकतो म्हणजे उकडता ही पहिली पद्धत.

दुसर्या पद्धतीमध्ये आळूची ही रोल केलेली पाने उकडून घ्यायचे. अर्थात शिट्टी लावता ते भांड्यात किंवा इडली पात्र मध्ये उकडून घ्यायचे.

https://drive.google.com/uc?export=download&id=11UaCzRyWnNDScZO2fWCAWH7TZBy4wHCu

आता उकडलेली पाने गोलसर चिरून ती खमंग खुसखुशीत डीप फ्राय करून घ्यायचे.

अशा पद्धतीने दोन पद्धतीने अळूच्या वड्या झटपट तयार होऊ शकतात.

अळूच्या देठांची कोशिंबीर

आता आता अशी एक गंमत की आळूच्या देठांचं करायचं काय ?

तर शोधता शोधता एक पारंपरिक रेसिपी सापडली.

यामध्ये पहिल्यांदा आळूच्या देठाचे ज्या शिरा आहेत वरच्या त्या काढून घ्यायच्या, वरचा आवरण काढून घ्यायचे.

ते आवरण काढून घेतल्यानंतर त्याचे एक ते दोन सेंटीमीटर चे तुकडे करून घ्यायचे.



या देठांपासून ही दोन रेसिपीज तयार करू शकतो.

१.     ज्या पद्धतीने इतर भाज्या करतो त्या पद्धतीने परतवून हे देठ  हलकेसे भाजून  परतवून शेंगदाण्याचा कूट घालून भाजी करू शकतो.

२.      किंवा याची आपण कोशिंबीर किंवा रायता करू शकतो.

 तर मी कोशिंबीर केली यामध्ये

ही देठ पाण्यामध्ये उकळून घ्यायची

उकळलेल्या देठांमध्ये दोन किंवा एक चमचा दही घालायचे आहे.

दोन चमचे दाण्याचा कूट ,मीठ ,साखर (कधीही कोणत्याही लिंबू किंवा दह्याचा वापर केल्यावर एक चमचा साखर घालावी जेणेकरून ती चव जी आहे ती अतिशय आंबट होता बॅलन्स होते )

आता फोडणीसाठी तेल गरम करायचे.

गरम तेलामध्ये जिरे, हिंग आणि तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि गॅस बंद केल्यावर कोथिंबीर टाकायची चिरलेली कोथिंबीर टाकायची.

ही फोडणी तयार केलेल्या रायत्यामध्ये घायायाची.

करता करता आणखी एक आठवलं की फ्रिजमध्ये एक वाटी सोललेले डाळिंब आहे आणि मग अचूकच त्याच्यामध्ये मी डाळिंब दाणे टाकले.

अशी ही आळूच्या देठांची अधिक डाळिंबाची कोशिंबीर तयार तुमच्याकडे पेरू, सफरचंद जे फळ असेल ते बारीक चिरून ही तुम्ही ते टाकून ही कोशिंबीर तयार करू शकता.

परंतु ही कोशिंबीर फळांमुळे जास्त वेळ ठेवता लगेच खावी लागते


अळू वड्या,अळू देठ डाळिंब दाणे कोशिंबीर,घरी बनवलेली पनीर चिली J मैत्री दिनाच्या शुभेच्छा!



-भक्ती