Monday, July 24, 2023

ओपनहायमर नोलन कलाकृती



 यापुढे ओपनहायमर -नोलन हे नाव पुरे आहे  सिनेमांच्या पुस्तकात सुवर्ण अक्षरांनी कोरण्यासाठी.

अमेरिकन प्रोमिथियस: द ट्रायम्फ अँड ट्रॅजेडी ऑफ जे. रॉबर्ट ओपेनहायमर हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांचे चरित्र आहे.या‌ पुस्तकावरून प्रेरणा घेत नोलनने एक जबरदस्त बायोपिक बनवला आहे.

भौतिक शास्त्राच्या अनेक शाखांपैकी पुढे क्वांटम फिजिक्स, न्यूक्लियर फिजिक्स या शाखेने कमालीचे संवेदनशील संशोधन अणू-भंजन /अणू विखंडन जगाला बहाल केलं.आणि बाटलीतला जिनी बाहेर पडला अणुबाँब बनून.हा जिनी बाटलीत परत टाकता येणार नाही तरीही त्याचा वापर करावा लागला ते घडवणार्या पैकी एक ओपनहायमर.

सिनेमात नोलनच्या शैलीप्रमाणे प्रेक्षकांनी केवळ मनोरंजन हा हेतू न ठेवता माणूस म्हणून येणाऱ्या पिढीसाठी चांगलं उत्तम द्यायला बांधील आहात  हे अधोरेखित  करायला सांगितले आहे. काही सीन  ब्लॅक अँड व्हाइट (जेव्हा ओपनहायमर/परिस्थिती अणुबाँबच्या समर्थनात आहे.)तर रंगीत सीन जेव्हा ओपनहायमर अणुबाँबपासून दूर जाण्याचा लोकांचा,सृजनाचा विचार करतो तेव्हा येतात असं मला वाटतं.

सिनेमाच्या सुरुवातीला खुप व्यक्ती सतत येत राहतात, त्यासाठी माझा होमवर्क कमी पडला.हे बरेचसे शास्त्रज्ञ होते ज्यांची नावं आज पर्यंत शाळा , महाविद्यालयात पुस्तकात वाचली आहेत.

याच दरम्यान महायुद्ध, कम्युनिस्ट, सोशलिस्ट यांचे संदर्भ येत राहतात.यावर ओपनहायमर आधी डाव्या विचारसरणीचे होत,हे समजले.हळूहळू काही नावांभोवती सिनेमा फिरू लागतो  कैथरिन ,लेस्ली ग्रोव्ह,जिन,टेलर,लारेन्स,बोरिस,नील बोर्ह,फ्रंक ओपनहायमर  इत्यादी (ही यादी खूप मोठी आहे)यांचं योगदान मैनहट्टन प्रोजेक्टसाठी बहुमूल्य आहे.

लॉस एलामोस,न्यू मैक्सिको येथे ओपनहायमरच्या म्हणण्यानुसार शहरच वसवलं.हजारो लोक गुप्तपणे अमेरिकाच्या 'महासत्ता' होण्याची तयारीत आहेत.प्रेशर आहे जर्मनीच्या आधी अणुबाँब बनवण्याचे.तीन अणुबाँब प्लुटोनियम २३९, युरेनियम २३५ युरेनियम २३९ हे तयार झाले.

ट्रायल -ट्रिनिटीचा प्रसंग त्यावेळच्यानुसार हुबेहूब चित्रित झालाय...आधी हजार सूर्याचा प्रकाश काही मिनिटे आणि मग धडकणारा आवाज...प्रकाशाचा वेग ध्वनी पेक्षा जास्त आहे तेच शाळेत असतानाही हेच उदाहरण शिकवला होतं ना.

ओपनहायमरलाही धडकी भरते..गीतेतला श्लोक आठवतो ज्यात कृष्ण म्हणतो..


"काल: अस्मि लोकक्षयकृत्प्रविद्धो लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्त:।।"

..."आता मी काळ आहे जो जगाचा नाश करणार आहे."

ओपनहायमरला भगवद्गीताने आयुष्यात समतोल राखण्यासाठी मदतच केली होती असे वाचनात आले.


जर्मनीने शरणागती पत्करली पण ओपनहायमरमधला वैज्ञानिक आपल्या  बांम्बचा प्रभाव पाहण्यासाठी उत्सुक होता? त्यालाही ठाऊकच असणार अणुबॉम्बने मोठी जीवितहानी होणार पण हिरोशिमा आणि नागासाकी घडतं ओपनहायमर अणुबॉम्बचा जनक होतो.

आणि पडद्यामागच्या लेविस स्ट्रास (रॉबर्ट जॉन डाउनी जूनियर अबबब कमाल अभिनय :)हा अध्याय १९५४ ला सुरू होतो.एका देशप्रेमीला थेट कम्युनिस्ट हेर म्हणून आरोपित केलं जाते. यात खुद्द आईन्स्टाईन त्याला हा खटला सोडून द्यायला‌ सांगतो पण ओपनहायमर आपण चूक नाही  तेव्हा लढा लढायाचा हे ठरवतो.....

शेवटचा प्रसंग दोन महान‌ शास्त्रज्ञांना समजलं आहे की जिनी आता एक नाही अनेक बनणार...जग परत पूर्वीप्रमाणे नसणार...चेन रियाक्शन सुरू झाली आहे....


-भक्ती

Tuesday, July 18, 2023

चीझी पालक मका

 चीझी पालक मका 





पालकावर माझा विशेष लोभ आहे.पण आतापर्यंत तो पाण्यात उकळून प्युरी करत धपाटे,पुरी,पालक पनीर,पालक इडली -डोसा,पालक चिला असेच बनवले आहे.नुसता न उकळता चिरून पीठ पेरून भाजी घाईच्या वेळेत होते.डायट पाळणं सात दिवस झालं जमलंच नाही.

मका होता पालक होता.न उकळता फक्त  पालक चिरून तेव्हा झटपट रेसिपी केली.

साहित्य -दोन वाटी उकडलेले मक्याचे दाणे,अर्धी जुडी चिरलेला पालक, अर्धा चिरलेला कांदा, लसूण, एक चमचा मैदा,तीन चमचे दूध ,२५ ग्रम चीझ,

एक चमचा हर्ब्स,तिखट , मीठ चवीनुसार,एक चमचा लिंबाचा रस.


कृती-

एक चमचा पनीर  कढईत टाकून गरम झाल्यावर बारीक लसूण फोडणीला दिला.कांदा परतून घेतला.मक्याचे दाणे परतले.हर्ब्स,तिखट मीठ टाकले.चिरलेला पालक फोडणीत टाकला.मक्याचा पिवळसर रंग आणि पालकाचा हिरवा रंग सुंदर दिसू लागला.यत एक चमचा मैदा आणि नंतर दूध घातले.एका वाफेनंतर किसलेले चीझ टाकले.हळूहळू चीझी स्टेक्चर आले.किंचित लिंबू पिळले.

याच पुढे ब्रेड टोस्ट करायचे होते पण ब्रेड विसरले.मग पोळीच तुपात गरम कळून हे चीझी मिश्रण त्यावर पसरून पोळीची घडी घालून कडक खरपूस भाजली.

लेकीला याचा मक्याचा गोड आणि मेल्टेड चीझचा यम्मी स्वाद आवडला.आणि तिच्या पोटात पालक गेला याच आई म्हणून समाधान मिळालं.

या मका पालक चीझी मिश्रणाचे स्प्रिंग रोलही बनवता येतात.झटपट भरपेट पदार्थ आहे.

-भक्ती

Sunday, July 16, 2023

प्रकाशवाटा


 अमावस्येला आकाश काळ्या चादरीवर चांदण्यांचे बुट्टे लेवून असते. त्याचा सखा शशी आज दूर फिरायला गेलाय जणू! तेव्हा या आकाशाचे पृथ्वीच्या निजरातीशी हितगुज मनमोकळे होत असावे.

म्हणूनच का दिव्यांचे उत्सव त्या आकाशाचा एकाकीपणा घालवायला अमावस्येलाच असतात का?दीपअमावस्या ,दीपावली हे त्यातले उत्सव अग्नि तत्वाशी एकरूप!

मला जशी जाण आली तशी अनेक गोष्टी पंच तत्वाशी जोडायची सवयस जडली. दीपावलीला दिव्यांची रांग ओळ मांडताना ती संपूच असं वाटतं .सगळं जग लखलख उजळून निघताना मनातला अंधार नाहीसा होतो .तिथे एक दीप मंद तेवतो .

दीप अमावस्याचे तत्वही अग्नी! आधी त्या दिव्याला पितांबरी इतर अनेक गोष्टींनी घास घास घासून तो दिवा लख्ख दिसू पर्यंत चैनच पडत नाही. तेव्हा अनेक गोष्टी ज्या आत कुठेतरी मनाच्या, भावनांना तंतूत उगाच चिकटलेल्या आहेत त्याही याबरोबर निघून जाऊ पाहतात .नंतर तो स्वच्छ सुंदर दिवा सम ई पाहून प्रसन्न वाटते.तेल- तूप त्यात ओतताना तेल स्निग्धता देणारी माणसांनी असेच आयुष्य त्यांनी भरून जावे असे वाटते .कापसाच्या वातीचे वळण त्या तेलात सामावल्यावर मऊ होते माणसांची स्निगधता माझाही बिन कामाची सरळता एकरूप करावी असेच वाटते :).
वात प्रज्वलित होत असताना खाली वाहिलेले एक सुंदर फुल त्या अग्नी प्रकाशालाच सुगंधित भासवते.
त्या मंद मंद जळणाऱ्या दिव्या कडे पाहत त्याचे तेजोवलय पाहत आपल्याही भोवती एक सुंदर प्रकाश वलय कायमच असावा असेच वाटते.

त्या अग्नी तत्वाचे दिव्य अंश नेहमी आपल्या मार्गाला पुढे प्रकाशमान करत राहावं असंच वाटतं .
प्रकाशवाटा कायम लाभत राहो.
-भक्ती

Monday, July 3, 2023

सैंधव/ हिमालयीन/खेवडा मीठ

 काल सैंधव मीठ विकणारा एक ट्रक पाहिला.त्यात गुलाबी रंगाचे मोठमोठाले खडक होते,हे मी पहिल्यांदाच पाहत होते.



सैंधव मीठ ज्याला

हिमालयीन मीठ-हिमालयाच्या पायथ्याशी सापडतं

सैंधा /सैंधव मीठ -सिंधू नदीच्या भागात सापडते

खेवडा/खैबुर/लाहौरी मीठ-पाकिस्तानमधील खेवडा प्रांतात याच्या खाणी आहेत.

गुलाबी मीठ-रंगाने गुलाबी आहे.

Rock salt-खनिज पदार्थापासून मिळवलं जातं.

जगातली मीठाची दुसर्या क्रमांकाची खाण पंजाब -पाकिस्तान येथे आहे.आणि ती इतकी मोठी आहे की आणखीन कित्येक शतकं यातून सहज सैंधव मीठ मिळवता येईल.



५००-६०० लक्ष वर्षांपूर्वी या भागातील समुद्र बाष्पीभवन प्रक्रियाने आटले.मीठाचे अधिक प्रमाणात अंश येथे उरले.पुढे बर्फ,लाव्हा यामुळे  यांचे जमिनीखाली दाबून खडक बनत राहिले.भूगर्भातील टेक्टॉनिक हालचाली सुरू झाल्या.मोठ्या दाबाने हे मिठाचे डोंगर पर्वत रांगा होऊन वर आल्या.अल्केझांडर द ग्रेट या भागात मोहिमेवर असताना त्याच्या युद्धातल्या घोड्याने हे डोंगर चाटले व चाटतच राहिला त्यामुळे या खारट गुलाबी पर्वताची ओळख जगाला झाली.पाकिस्तान यांची निर्यात भारताला करतो,त्यांच्याकडे याच्या प्रोसेसिंगचे तंत्रज्ञान नाही.भारत या खडकांवर प्रकिया (शुद्धीकरण)करुन यांची निर्यात जगभर करतो.

याचे विशिष्ट गुणधर्म म्हणजे सोडियम क्लोराईड (NaCl)शिवाय यात मग्नेशिअम, पोटॅशियम ,कॅल्शियम आयर्न आढळते.आयर्न ओक्साईड याचा रंग गुलाबी आहे.परदेशातील नागरिक या गुलाबी खडकापासून शोभेच्या वस्तूही बनवतात .

याच हिमालयीन मीठावर गंधक प्रक्रिया करून काळे मीठ बनवतात.ज्याची चव वेगळी होते.बाजारात समुद्री मीठावर प्रक्रिया करून बनवलेल्या काळ्या मीठाचाही सुळसुळाट आहे.

तरीही सैंधव मीठामध्ये आयोडिन (जीवाश्म प्रक्रियेत मिसळते?) नाही.अयोडिन हे समुद्री मीठात आढळते जे थायरॉईड ग्रंथीना कार्य करण्यासाठी गरजेचे आहे.तरीही केवळ सोडियम क्लोराईड बरोबर आणखीन भरपूर मिनरल मिळवण्यासाठी सैंधव मीठ उपयोगी आहे.पण कोणतेही मीठ असो प्रमाणात खावे.

सैंधव मीठात rock salt because it not only contains sodium chloride, but also gypsum (CaSO4) and sylvite (KCl), potassium sulfate and polyhalite (K2Ca2Mg(SO4)4.2H2O)! हेही घटक आहेत,ते शुद्ध होते गरजेच आहे.एकदंतरीत सैंधव मीठ हे ग्लोरीफाईड झाल आहे.त्याचा शरीराला फारसा फायदा नाहीच.

-भक्ती