Friday, September 14, 2007

ईठे....


काट्याकुट्याना तुडवित
लाकडाची मोळी डोईवर घेत
सांजवेळ झाली ईठे चल बिगीबिगी....

माय दारी उभी
गोठ्यात वासर हंबरडा फ़ोडी
पाऊल उचल ईठे झपझप....

पारावर भूत असत्यानी
मनात काहुर उठतय
शप्पथ तुला ईठे चल की लगबग....

मावळला डोकस्यावरला तो
किर्र किर्र धस्स जीवी ही
माज्यामागन ईठे चल लटपट....

आल बग माय घर
जीवात जीव आला फ़ार
ईठे घरला तुझ्या जा लवकर चल चाल की बिगीबिगी.....
@भक्ती

Tuesday, September 11, 2007

हवय


नकोय मला त्या आखलेल्या रेषा
ज्या जाणत नाही पावलाची भाषा

नकोय तो मोहरणारा गंध
जो फ़ुलाला खुडुन्यात धुंद

नकोय ते कोसळणारे धबधबे अनंत
जे चिंब करण्याआधीच वाहुन नेतात

नकोय पोकळ खोल श्वास
जे विरतात सोडण्याआधी उच्छ्वास

खरच मला नकोय मला त्या आखलेल्या रेषा
ज्या जाणत नाही पावलाची भाषा

खरच मला हवय ते आभाळ
ज्या निळाईत शोधयला
मिळेल एक निष्पाप काळ!!!!
@भक्ती
१९०८०७

Monday, September 10, 2007

आपली मैत्री


आपली मैत्री एक गोंडस भेट
जणु पिवळ्या गुलाबाचे देढ
रुणझुण ही मैत्रीची मनाला देते साद थेट

आपली मैत्री एक अथांग सागर
जणु सुख दु:खाची आयुष्याला झालर
जीवाला जीव देत मनाला सुखावते फ़ुंकर

आपली मैत्री एक सुरेख गहिरे चित्र
जणु नवी पालवी सुखावी चैत्र
कधीही ना होई हे सोनेरी पान गलितगात्र

आपली मैत्री एक गुज मनीचे
जणु सुंदर गीततराणे ह्या जीवनाचे
नाते हे आहे अनमोल विश्वासाचे
@भक्ती
०४०८०७

वजाबाकी


तुज्यातुन मी वजा होताना
माझी बाकी तुझ्या हवाली करताना
मनाच्या पाटीवर गणित सारे मांडताना
काहीतरी हिशोब चुकतोय अस तु म्हणाला

त्या उन्हात तर तुझ्यासाठी मी नेहमीच सावली व्हायची
माझ्या घासातला घास तुझ्यासाठी वेगळा ठेवायची
निराश झाला की तुला हसवायला जीव कासावीस करायची
पण काहीतरी हिशोब चुकतोय अस तु म्हणाला

तुझ्या ओंजळीत माझ्या गजर्‍याही फ़ुले असायची
चिडला की मीच विस्कवटवलेले केस मीच लाडाने नीट करायची
सार सार बरोबर माझ्याकडुन मांडल होत
पण आपल्या...
नाही तुझ्या घरासाठी पाहिलेली स्वप्ने ती मी तुला परत कशी करु?
@भक्ती
२७०७०७

दयाघना


दयाघना जाणिसे हर मना
प्रेमाचा भवसिन्धु अपरंपार करुणा
निरामया अलक अनादी ही क्रिपा

संकटात निराश तनुचा तु विधाता
शरण भक्ताच्या पाऊलाचा तु मार्ग
निरामया अलक अनादी ही क्रिपा

ठाई ठाई रुप सुखावी लोचना
तहानलेल्या जीवा अम्रृताचा पेला
निरामया अलक अनादी ही क्रिपा

गरिब-आमिर ना भेद असे दारी
श्रद्धा ज्या-जवळी रिता ना तु उरि
निरामया अलक अनादी ही क्रिपा

दयाघना लीला तुझी काय वर्णावी
'देर है पर अंधेर नही'अशी थोरवी
निरामया अलक अनादी ही क्रिपा
@भक्ती



असा बरसला की
मातीत अंकुर मातेच्या कुशीत खेळतो
ईन्द्रधनु पित्याबरोबर रंग उधळतो
प्रवाहात मासोळीचे सोने विखरते
दर्याचे तुफ़ाण किनाराशी आदळते

असा मस्त मौसम खुणावतो
नकळत पाऊले घराबाहेर झेपावतात
हळव्या अश्रुची संगत वाहुन हसवते
भिजुन भिजुन थेंब थेंब ओला होतो

असाच बरस रे
कधी वळव्यानी
कधी धो धो हस रे
तु असाच रोजच ये रे.......

धरतीची लेकरे
तुला मारती हाक रे
हिरवी झाडे कशी डोलती रे
तु असा सुखावुन जा रे......


चातकाची ही तहान रे
मोराचा मनमोहक नाच रे
प्रत्येकाच्या मनातील आस रे
तु असा देवदुत होउन धाव रे......

चिमणीच्या पंखाना ओले कर रे
कोरड्या मनाला न्हाऊ घाल रे
वाफ़ळलेल्या चहाच्या कपात थेंब टाक रे
तु असा अचानक धडक रे........

कधी खळखळ आवाज होईल रे
कधी 'धुडुम धुडुम'धबधबा उतरेल रे
पावसात नाचतानाचा नाद छुमछुम रे
तु असाच आनंद आण रे........

ओलेचिंब हा कवितेचा कागद रे
होडी त्याची केव्हाच झाली रे
अंगणातून वाहणार्‍या झर्‍यात रे
तु तिला दुर घेऊन जा रे....
तु असाच बरस रे
#भक्ती.











***ही तरुणाई***


***ही तरुणाई***
नुपुर झुपुर झंकारती
आला टप्पा ही तरुणाई
टप्पोरी मोठाली बोर
हुंदडायला जशीही आमराई

कुहु कुहु आळवित
सुरात भिजवी ही तरुणाई
फ़ु-फ़ुगडी,झि-झिम्माड
कानात कुजबुजते ही नवलाई

दुरुन हासे हा भ्रमर
लाजुन फ़ुले फ़ुलराणी ही तरुणाई
भिरभिर रंगीत भिंगरी
डोळ्यांत शराबी आल्हाद निळाई

रात्रीच्या कपाळी चांदण्या भाळी
नक्षत्रांचे देण्यात विखुरलेली ही तरुणाई
वेलीत वेल ,हातात हात
मनाला सुखावी ही थंडाई
@भक्ती
२५०६०६


तुझी आठवण येते तेव्हा......


अलड्ड वयातील कळीची ही कविता आहे

तुझी आठवण येते तेव्हा......
आईच्या कुशीत शिरुन
हलकेच मुक अश्रु गिळुन
मी घेते अलगद रडुन
आई म्हणते,"काय झाल बाळा?"
मी म्हणते "काही नाही डोके दुखतेय अजुन"


तुझी आठवण येते तेव्हा......
प्रिय सखीचा हात धरते घट्ट
बोलावे वाटते पण मन करते निगरगट्ट
विसरुन जाते पुढचा काळोख कुट्ट
सखी म्हणते ,"काय झाले प्रिये?"
मी म्हणते"काही नाही तु हवी हाच हट्ट"


तुझी आठवण येते तेव्हा ........
मनीला मी खुप खुप कुरवाळते
तिच्यावरच्या मायेत ओलावा सापडतो
केशराची ढेव तिच्या दुधात ओतते
मनी काही नाही म्हणत,फ़क्त डोळे लुकलुकवते
मी मात्र तिच्या पुढे एकदम व्यक्त होते....

#भक्ती.

गवसते.....


दुर झाडाच्या शीतल छायेत
मखमली हिरव्या गवताच्या सुखात
फ़ुलाच्या उडणार्‍या पाकळीच्या गन्धात
टप टपणार्‍या पावसाच्या प्रत्येक थेंबात
काहीतरी शोधताना मीच हरवते …..

वार्‍याच्या सुरेल दरवळणार्‍या स्वरात
सागराच्या भेटिला आतुर नदीत
फ़ुलपाखराच्या कोमल रंगेबेरंगी रंगात
स्वछ्न्द उडणार्‍या पाखराच्या भरारीत
काहीतरी शोधताना मीच हरवते…..

रात्रीच्या किर्र भासणार्‍या अंधारात
लुकलुकणार्‍या चांदणांच्या प्रकाशात
मनीच्या निळ्या निळ्या डोळ्यात
हसणार्‍या गुलाबाच्या गोड खळीत
काहीतरी शोधताना मीच हरवते ….

पण डोकवताना...
उफ़ळणार्‍या ज्वालामुखीच्या उदरात
एखाद्या उदास ह्रिदयस्पर्शी गीतात
बोचर्‍या काट्याच्या खिन्न आसवात
बुद्धाच्या त्या दुर्मिळ हास्यात.....
मी स्व:ताला पुन्हा पुन्हा गवसते.....

भक्ती.