Saturday, November 27, 2010

रसग्रहण:स्वप्न

रसग्रहण:स्वप्न

स्वप्न

जळतात पर्वत ,जळतात नद्या,जळतात तारे;
तापून भिरभिर भटकतात वारे;
ढळताहे सा~या जीवनाचा तोल्:
गुरांच्या तोंडांत जळतात चारे.
वाकत मुडपत तडकून कडकड जळतो पाला;
जळत्या झाडांत पाखरांचा स्वर केविलवाणा झाला.
मानूस विसरतो माणूस;वाडे झाले बेचिराख;
नाही 'सखी',नाही 'सजण',नाही 'पान्हा',नाही 'तान्हा'
पेटलेल्या कुरणांत
गो~हे अन गायी
भटकतांना जळतात ,भडकतात जळतांना.
कोरडे पर्वत,कोरड्या राई,कोरडी नदी,नाले उदास
कोठेच काही उरले नाही,सारे काही झाले भकास,
नाही 'आज',नाही'उद्या',नाही'रात्र',नाही 'सकाळ',
नाही'मागे',नाही पुढे':
गोंधळतो,बिचकतो,थबकतो काळ
एकच एक उरते घशांत कोरड्या
तहान
तहान.

एक गोरी भिल्लीण करतांना नर्तन एक उंच घेते सातरंगी गान
इंद्रधनूसारखी गुहेतून येते
संजीवन देत:
पडलेली पाखरे उंचवतात मान;
उचंबळते गगन;
पुन्हा सुरू होतात पृथ्वीच्या भोवती चंद्राचे फेर;
चहूकडे होते नव्याने जुन्या जीवनाची पेर.
सखीला मिळतो सखीचा सजण,
पडतात सरी तापलेल्या शेतांत ,गर्जत येतात ढग काळेभोर;
बुट्टीदार हिरवा
पिसारा पसरत
हिरव्यागार गवतांत आंब्याच्या खाली थयथय थयथय नाचताहे मोर
हिरवे होते रान ,पुन्हा येते भान,केळ येते पणांत;
आईला पान्हा :
दूध पितो तान्हा;
फणा काढून डोलते नागाचे जोडपे केतकीच्या बनांत.
-ना.घ.देशपांडे
(१९८४)
~~~~~~~~~~~~~~`
रसग्रहण:स्वप्न
डोळ्यांच्या पापणींची उघडझाप अगदी नकळत होत राहते,ते आपल्याला जाणवतही नाही,क्षणाच्या साधारण दहाव्या भागाकरता आपल्या डोळ्यापुढे अंधार असतो,तो दिसतो का?....नाही

स्वप्न ही कविता अगदी अशीच आहे.एका नकोशा स्वप्नाकडून नकळत हवहव वाटणार स्वप्न कवितेला पडते.
तहान ..तहान...मनाला..धरणीला जाळणारी ..अतृप्तेचे स्वप्न ..सर्वांगाला जाळत असते.


नाही 'सखी',नाही 'सजण',नाही 'पान्हा',नाही 'तान्हा'

.......................................
नाही 'आज',नाही'उद्या',नाही'रात्र',नाही 'सकाळ',
नाही'मागे',नाही पुढे':

.......................................
तीच तहान हे दर्शवतात..
ढग दाटून यावेत ,कडाडावेत...जणू मल्हार गातात ते....
त्यासाठी योजलेला गोरी भिल्लीण ,तिची सातरंगी तान...जी इंद्रधनूसारखी मेघांच्या कुट्ट गुहेतून बाहेर येते धुंद होत ...धुंद करत.कवितेला जाळ्णा~या शब्दांना 'संजीवन देत'येते...


सखीला मिळतो सखीचा सजण,
........................................
पुन्हा सुरू होतात पृथ्वीच्या भोवती चंद्राचे फेर;
चहूकडे होते नव्याने जुन्या जीवनाची पेर.
........................................

डोळ्यांच्या पापणीच्या उघडझाप मध्ये दृष्टीला ही मनोरम सृष्टी पुन्हा दिसावी ..त्या प्रमाणे मनोरम ओळी सुख स्वप्न दाखवतात.
हिरव्या शालूत धरती पुन्हा खुलते.


आईला पान्हा .
दूध पितो तान्हा;

युगांयुगांची तहान आई पिलांची शमावते.. सा~या स्वप्नाची तहान तृप्त होते.


फणा काढून डोलते नागाचे जोडपे केतकीच्या बनांत.
..................................
शेवटच्या ओळींनी कवितेच स्वप्न मनात कायमच सळसळत राहते.~~~~~~~~~~~

-भक्त्ती.
संदर्भ:खूणगाठी

No comments: