Tuesday, December 7, 2010

संचित



मोडलेल्या झोपडीपाशी अजूनी
पाखरे गाती;उरला दाणा टिपूनी॥१॥

तांबडा सूर्य क्षितिजाषी बुडूनी
माखते संध्या प्रिती रंगा स्मरूनी॥२॥

सावळ्या मेघा नको जाऊ फ़िरूनी
डोंगरा ओलांडुनी,आला दुरूनी॥३॥

ठेव सारे क्षण तरीही विणूनी
राह्तो मागे हर्ष,त्रागा विरूनी॥४॥

संकटे आली दिव्याला मालवूनी
गत जन्मीच्या रे पुण्या ये धावूनी॥५॥

-भक्त्ती