या रे या
stranger things च्या फ्यान लोकांनो
इकडे या
भावनांचे पाट वाहू द्या
stranger things ला भरलेल्या मनाने
गुड बाय करू या
शेवटचा भाग right side up अक्षरश: दोन तास मनःपटलावर अधिराज्य करतो.वेकना मरणार हे माहितीच होत . पण एल पण गायब होणार होत हे अनपेक्षित होत . सुपरनॅचरल मालिका असं गृहीत चालताना यात सायन्सचा वर्म होल हा कन्सेप्ट हि सिरीज सगळ्यांसाठी बघणीय होते.कारण ते भूत खेत जाम बोर करतात. कोणाचं कौतुक करावं ???
सायकोकायनेटिक क्षमता असलेली इलेव्हन ,मैत्रीने घट्ट विणलेले माइक,लुकास, डस्टिन आणि विल,मॅक्स, धडाकेबाज नॅन्सीचा,स्टीव्ह ,हूपर,जोनाथन,रॉबिन जॉयसी,गोड गोडुली हॉली,डफर, बडबडी एरिका की हेन्री उर्फ वन उर्फ वेकना उर्फ खेकडा भजी(भारतीयांनी दिलेले नाव ) :) की पिसाळलेल्या कुत्र्यासारखे मागे लागणारे डेमोगोर्गनच यांचं करायचं.२०१६ पासून १० वर्षात ५ सीझन आणि ४२ भागांत ही सगळी पात्र आपल्या बरोबरच वाढत होती.हृदयस्पर्शी मैत्रीचा अर्थ पुन्हा पुन्हा पटवून देत होती. ८० च्या दशकातील जुन्या आठवणी पॉप गाण्याने जाग्या होत होत्या https://en.wikipedia.org/wiki/Stranger_Things:_Music_from_the_Netflix_Original_Series ."Running Up That Hill (A Deal with God)" by Kate Bush हे गाणं आता माझी मोबाइल रिंगटोन आहे . यावर इन्स्टावर थेअरी ,कॉमेडी,अशा रीलचा महापूर आला आहे .त्यात मॅक्स समोर गेट आलं तरी वेड्या सारख्या का बडबडत आहे हा प्रश्न असो :),वेकना भाऊने केलेला वेट लॉस,एल सारखी पॉवर आल्याचा विश्वास असो :)
अहो शेवट ,तुम्ही सस्पेंस ,थ्रिलरवर गोष्ट संपवता तेव्हा हे क्षणिक ठरत .मानवी भावनांना जेव्हा स्पर्श करता तेव्हा ती गोष्ट अमर होते. माईक सगळ्यांना समजून सांगतोय आपलं बालपण आता दूर चाललं आहे ,संपलं आहे .हा खेळ संपला आयुष्याचे नवीन अध्याय आता खेळणार आहोत.... हायला खूप दिवसांनी एखाद्या सीरिजने आनंद दिला ,हसवलं,उत्सुकता वाढवली ,रडवले.
हॅट्स ऑफ डफर ब्रदर !!!!!


No comments:
Post a Comment