Sunday, January 11, 2026

मी सध्या काय पाहतेय (२०२६)



 शेरलॉक होम्सचे तर करोडो चाहते आहेत.पण काय होईल जर त्याला एक बहिणही असेल तीही त्याच्यासारखीच तरबेज आणि धाडसी!

एनोला होम्स ही एक काल्पनिक कॅरेक्टर आहे, जी अमेरिकन लेखिका नॅन्सी स्प्रिंगर यांनी २००६ मध्ये सुरू केलेल्या "The Enola Holmes Mysteries" या पुस्तक मालिकेत निर्माण केली. या मालिकेत एनोला ही शेरलॉक आणि मायक्रॉफ्टची खूप लहान बहिण (२० वर्षांनी धाकटी) दाखवली आहे.

नेटफ्लिक्सवर खूप लोकप्रिय झालेल्या Enola Holmes १ आणि २ या  चित्रपटांमध्ये (मिली बॉबी ब्राउन मुख्य भूमिकेत आहे.

एनोला हुशार, निर्भय आणि लढवय्या आहे! अ‍ॅक्शन आणि हृदयस्पर्शी असे हे चित्रपट आहेत.

स्ट्रेंजर थिंगमुळे मिली ब्राऊन आवडायला लागली आहे.

*************************************************************************



यंग शेल्डन -Young Sheldon ,माझी कन्याच हा मालिकेची माझ्यासाठी शोधकर्ती आहे .टी ही मालिका पाहत असताना ,तिच्यासोबत याचे अर्ध्या तासाचे दोनच भाग पाहिले आणि या शेल्डन प्रेमातच पडले.आता आम्ही दोघी याचे रोज एकत्र भाग पाहतो.... तेव्हा हास्यांचा एक कल्लोळच उठतो. 

Young Sheldon अमेरिकन कॉमेडी टीव्ही सिरीज -९ वर्षांचा शेल्डन कूपरचे एक जीनियस, पण सामाजिकदृष्ट्या वेगळाच मुलगा आहे.त्याचे टेक्ससमधले जीवन,रोजशी अभ्यासू पण अनेकदा बालसुलभ गोष्टींनी भरलेली धमाल यात आहे. तो हायस्कूलमध्ये लवकर जाते कारण त्याचा बुध्यांक उच्चं आहे  त्याच्या कुटुंबाशी आई-बाबा, भावंडे,आजी आणि आजूबाजूच्या पात्रांसोबत त्याच्या गमती जमाती पाहायला मजा येते .साधे जीवन यांच्यात त्याची बुद्धिमत्ता कशी बसते हे मजेदार आणि भावनिक आहे.याविषयी शोधताना कळाले की,Young Sheldon ही The Big Bang Theory प्रीक्वेल आहे, ज्यात शेल्डन कूपर या मुख्य पात्राचे बालपण दाखवले आहे.मी The Big Bang Theory चे नाव केवळ ऐकले आणि त्याचे काही रील्स पाहिले नाही. साधारण जे पूर्वीपासून आंतरराष्ट्रीय मालिका पाहायचे त्यांची खूप आवडती मालिका होती हे समजले. 




प्रेमाला केवळ भावना म्हणून सिनेमांत सादर करणे खूप दुर्मिळ आहे. त्याच्याभोवती संघर्ष, प्रतिशोध,एकाकी लढा असे धागे कथा म्हणून गुंतलेले असतात.


पण अशा कथासूत्रांत "#साबर_बोंड" (कॅक्टस पिअर्स) हा प्रेमाचा सिनेमा अडकत नाही.गोष्ट जगात सहज मान्य नसणाऱ्या "समलैंगिक तरुणांची"!पण सिनेमा इतक्या सहजतेने हॆ समलैंगिक नातं आपल्यापर्यंत पोहचवतो की वाटत "का बर प्रेम देणाऱ्या यां नात्याला बोल लावतो,यांच्याही भावना जाणून घेत नाही.लग्नासाठी ढकलून कोणत्याही मुलीचे/मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याऐवजी, अशा लैंगिकता पुढे येऊन स्वीकार करणाऱ्यांना समाज दबावाशिवाय सामावून घेत नाही?"


वडिलांच्या मृत्यूनंतर आनंद अंतिमकर्मक्रियानसाठी गावाकडे जातो. तिथे त्याचे वय उलटण्याने लग्नाविषयीं गावाकडचे त्याला सतत विचारत राहतात. तेव्हा आनंदला त्याचा लहानपणीचा सवंगगडी बाळ्या भेटतो. बाळ्याही याच लैंगिक ओळखीचा आहे. 

ग्रामीण भागातल्या तरीही मधेच शुष्क बाभाळी, एवलस तळ, डेरेदार झाड्याच्या पानाची सळसळीतले ते दोघे अशी गोंगाटविरहित फ्रेम दाहक विषय आपल्यापर्यंत शांतपणे आणून सोडते.


यां सिनेमातल मर्म घ्यायचं असलं तरी काय?? "स्वीकार"

आपल्या भावनांचा स्वीकार, समोरच्याच्या भावनांचा स्वीकार हॆ एक मूल्य आहे.

आनंदला त्याचे आईवडील आहे आहे तसा स्वीकारतात त्यामुळे त्याच्या भावनांना सुरक्षा,प्रेम मिळते. बाळ्यालाही मग ती सुरक्षा मिळते. एक प्रेमाची "नातं" समाजाच्या नकळत सुरक्षित होतं.


टीप :माझा आवडता लेखक "युवाल हरारी " समलैंगिक आहे. त्याचे ज्ञान जगाला सुपरिचित आहे.


*†********-----********



खुप दिवसांनी एक चांगला sci fi सिनेमा पाहिला.

Andy Weir च्या प्रसिद्ध sci-fi पुस्तक "Project Hail Mary वर आधारित Project Hail Mary सिनेमा पाहिला 

पृथ्वीवर एक मोठी समस्या येते Astrophage नावाचे एक सूक्ष्म जीव सूर्य आणि इतर ताऱ्यांची ऊर्जा खात आहे. यामुळे सूर्य मंद होत चालला आहे आणि पृथ्वीवर बर्फाचे युग येऊ शकते, ज्यामुळे मानवजातीचा नाश होईल.

शाळेत विज्ञान शिकवणारा एक साधा शिक्षक Ryland ग्रेस (PhD )याला ही समस्या सोडवण्यासाठी अंतराळात एक “Hail Mary” मिशन (अंतिम जोखमीची शेवटची चाल) पाठवले जाते.

तो एकटा अंतराळात जागा होतो, त्याला स्मृती हरवलेल्या असतात. हळूहळू त्याला आपली आठवण येते आणि तो समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतो.

तिथे त्याला alien जीवन Rocky नावाचा अतिशय भारी एलीयन भेटतो. तोही आपला ग्रह वाचवण्यासाठी निघाला आहे.पहिल्या संपर्क,भाषा संवाद, interstellar travel इत्यादी त्यांच्यातली गंम्मत मस्त फूलवली आहे.

नक्की पाहावा असा सिनेमा आहे.

No comments: