Wednesday, June 3, 2020

माफी नाही मानवा #


कोणाची तरी हाक आली
ढिगामध्ये होती तुळस दबली
मोडलेल्या फांद्या, पानं,झाड
संस्कारांची मुळ उखडलेली|

निसर्ग म्हणाला आता आवरा
तुझा अस्ताव्यस्त पसारा
थोडीच रे ..जरा लाज बाळगा
थांबव ओरबाडने भस्मासूरा|

छळतायत संकट चहू दिशांना
मृत्यूचा अंधार गिळतोय दिवसांना
तरी हा असला फटाक्यांचा खेळ?
ईश्वरालाही तू उमजेना|

बुद्धीच्या धुंदीत नाचून
नाळ माणूसपणाची तोडून
कुशीत येण्याआधीच
क्रूर हसला.. खून रचवून|
नाही ...आता माफी नाही ...नाही... नाही...
#JustisForAmba#
@भक्ती

No comments: