Wednesday, June 17, 2020

#लहानांसाठी गोष्टी (ग्रीन color activity)-१

#लहानांसाठी गोष्टी (ग्रीन color activity)-१

“बाळा टरबूज खा .....”पोरीच्या मागे मागे अख्खा टरबूज घेऊन मी धावतेय.”मला नाही खायचं” कन्येची पळापळ. “अग बघ किती छान आहे ‘ग्रीन ग्रीन’”.”नाही नको ,मला नाही आवडत ग्रीन color.” उगाच कारण देता होती ती. ”मग कोणता रंग color आवडतो?” ती म्हणाली ”रेड ...मला तू रेड appleच दे .”

झाली ना पंचायत आता कुठून आणावे apple.डोक्यात tube पेटली. “अग हे टरबूज पण रडतेय ,त्याला पण नकोय ग्रीन color ...चल आता आपण याला रेड करुया तुझा favorite”.

आता तिला पण मज्जा वाटली आई जादू करणार काय?....मग काय जादूचा प्रयोग सुरु झाला.”आबरा का डाबरा गिली गिली छू...”सुरी घेतली पटकन टरबूज मधोमध कापल...आत छान लालेलाल ....कन्या खुश “woow आई रेड.” मस्तपणे १०मिनिटात फस्त.

मग आता माझ्यातली शिक्षिका जागी झाली .”बाळा सांग पाहू अजून कोणती फळे ग्रीन असतात?”

“ह ह” विचार करून कन्या पहिल्यांदा ‘नारळ ‘म्हणाली ,”जे फोडायचं आणि गार पाणी प्यायचं”“मी चमकलेच ,पेरू वैगेरे सांगायचं सोडून नारळ ,चला प्रयोग यशस्वी.

मग लिस्ट मध्ये पेरू,द्राक्षे,सीताफळ,मोसंबी वगैरे फळ मराठी इंग्लिश नावासह add झाले,तसेच ग्रीन भाज्यांचीपण परेड झाली.ग्रीन color activity completed.

@भक्ती

No comments: