Wednesday, June 24, 2020

#ALAN WALKER #MUSIC

मराठी मेडियममध्ये शिकल्यामुळे “every night in my dreams” या गाण्यापलीकडे इंग्लिश गाणे काहीही माहित नव्हते.अपघाताने on my way हे गान ऐकल.जरा हादारेच...cover picture वर असलेली ती मुलगी चेहरा झाकलेली.गूढ प्रवासाला निघाली आहे असे वाटली.गाण्याचे शब्दसुद्धा किती काही सांगतात ना ....अर्थपूर्ण.

मग you tube वर video पाहिला , अभ्यासू वृत्तीने  कसल्यातरी शोधात निघालेली नायिका, शेवटी तिला AW. संस्कृतीचा शोध लागतो आणि तिचे खूप कौतुक होते.तिथे Alan Walker हे नाव पाहिलं.आणखी काही गाणी पहिली आणि Alan ची fan झाले.मग आणखीन detaling केले त्याच्या गाण्याच्या video च ,तेव्हा लक्षात आल की ही on my way आणि इतर गाण्यांची “World of Walker triology” mini film च आहे.

४ वर्षापूर्वी Faded (2015) and Sky या seriesची त्याने सुरुवात केली होती..alan  walker हि संस्कृती उल्कापातामुळे नष्ट झाली असते.तेव्हा Walker black team (Tired )हे नष्ट होतात.आणि नंतर काही वर्षांनी Time capsule पुन्हा सापडते (All Falls Down) .

Walker black team आणि walker white team पुन्हा भेटतात (Darkside).आणि walker संस्कृतीचे dron शोधतात.Alone मध्ये all walkers जॉईन होतात.

मग येते on my way नायिकेचा प्रवास लुप्त झालेल्या संस्कृती शोधाचा,sabrina carpenter चा आवाज चारचांद ...Alone Part 2 मध्ये गोष्टपुढे सरकते नायिकेला AW च्या खुणा एका cave मध्ये सापडतात.

Heading home …last part of triology हा तर अप्रतिमच नायिकेला तिच्या गतजन्माची वा time travel ची गोष्ट डोळ्यासमोर तराळते.उल्कापाताचे भाकीत मग capsule चे दफन आणि सर्वांनी एकतरी घेतलेला जगाचा निरोप.बेस्ट line nobody sees me now I’m a one man show …I will do this on my own…..guess I’m heading home now.

@भक्ती

#repost

#ALAN WALKER #MUSIC

#CIinemaGully

Alan walker चे on my way आणि इतर गाण्यांची “World of Walker triology” mini film च आहे,त्याबद्दल इथे थोडे लिहिते आहे,साधारण २०१५ -१६ पासून टप्प्या टप्प्याने याची वेगवेगळी गाणी youtubeवर  प्रदर्शित होत राहिली आहेत.२०२० मध्ये या गाण्यांच्या मालिकेचा शेवट झाला आहे.

Faded (2015) and Sky नावाच्या गाण्याने या seriesची सुरुवात होते . ..कथा अशी आहे की,

१. Tired या गाण्यात दाखविले आहे की, Alan walker हि संस्कृती प्राकृतिक आपदेमुळे नष्ट झाली असते.तेव्हा Walker black team (अनुयायी) हे नष्ट होतात.

२. नंतर काही वर्षांनी AW संस्कृतीचे अवशेष असलेले Time capsule पुन्हा सापडते  हे All Falls Down ह्या गाण्यात दाखविले आहे.

३. Darkside गाण्यात Walker black team आणि Walker white team पुन्हा भेटतात आणि Walker संस्कृतीचे dron शोधतात.

४.Alone या गाण्यात जगभरातील all walkers अनुयायी पुन्हा जॉईन/एकत्र  होतात हे दाखविले आहे.

५.मग येते on my way हे सर्वात लोकप्रिय गाणे.यामध्ये मालिकेतील नायिकेचा प्रवास लुप्त झालेल्या संस्कृती शोधाचा plot दाखविला आहे.गाण्यासाठी Sabrina Carpenter चा आवाज चारचांद आहे.

 ६.Alone Part 2 गाण्यामध्ये गोष्टपुढे सरकते नायिकेला AW संस्कृतीच्या च्या खुणा एका cave मध्ये सापडतात.

७.या मिनिफिल्म मधले शेवटचे गाणे आहे Heading home …last part of triology हे  तर अप्रतिमच गाण आहे.यामध्ये नायिकेला तिच्या गतजन्माची वा time travel ची गोष्ट अभ्यासादरम्यान डोळ्यासमोर तराळते.पूर्वी तिने पाहिलेले उल्कापाताचे भाकीत यात दाखविले आहे.मग या संस्कृतीचे मुख्य गुरु व इतर अनुयायी त्यांच्या रहस्यमय गोष्टीं असलेल्या  capsule चे दफन करतात आणि सर्व walkers एकत्रित एका विहिरीत उडी मारून जगाचा निरोप घेतात.

या गाण्यातील  उत्कृष्ट line आहे “ nobody sees me now I’m a one man show …I will do this on my own…..Guess I’m heading home now.

अशा प्रकारे alan walker आणी इतर कलाकारांच्या कलाविष्काराची सुंदर गाणी आहेत.  

टीप:हे सर्व मी माझ्या आकलनानुसार लिहिले आहे.तरी यामध्ये सुधारणा सुचवू शकता.

धन्यवाद.

@भक्ती

 

 


No comments: