Tuesday, June 16, 2020

Cast Away (२०००)


Cast Away (२०००)

काल Cast Away सिनेमा पहिल्यांदा पूर्ण पाहिला.इतक्या दिवस उगाच मला संपूर्ण स्टोरी माहितेय असे वाटत होते.तसाही मला अर्ध्या हळकुंडाने......व्हायच सवय आहे.या सिनेमासाठी TOM HANKS या कलाकाराला बेस्ट अक्टर चे OSCAR मिळाल होत.त्यामुळे त्यावेळी या सिनेमाने माझ लक्ष वेधल होत,आणि याची ओझरती कथा वाचली होती.
तर स्टोरी अशी की नायक  Tom Hanks अपघाताने निर्जन बेटावर अडकतो.तेव्हा त्याची जगण्याची कसरत सुरु होते.पिण्याचे पाणी,अन्न,निवारा जे पश्न आदिमानावाला हळू हळू सोडवावे लागले,तसेच नायकाला टप्प्या टप्प्याने सोडवावे लागले....पुन्हा उलटा प्रवास असेच वाटते.घर्षणाने आग तयार करतो तेव्हाचा त्याचा जल्लोष तर आपल्यालापण उत्साहित करतो.एकाकी बेटावर एका FOOTBALL ला WILSON तो आपला सखा करतो,ते खूपच स्पर्शून जात.आपल्या  मैत्रिणीला परत एकदा भेटण्यासाठी तो मोठे मोठे दिव्य करत जगात असतो...तब्बल वर्ष त्या निर्जन बेटावर काढल्यानंतर पुन्हा एक संधी,उर्मी त्याला मिळते त्या बेटाहून स्व:ताची सुटका करण्यासाठी .आधीचा एका प्रयत्न फसल्यानंतर तो शेवटी भव्य समुद्राविरोधी मोहीम काढतोच त्याच्या लाडक्या Wilson सोबत.त्याला परतायची बोट मिळते पण WILSON ला गमावून.नायक
आता खूपच उत्साहित आहे त्याच्या प्रेयसीला पुन्हा भेटायला.ज्याला मृत मानल होत सार जग त्याच्या परतण्याचा जल्लोष करतोय पण त्याची नजर फक्त तिलाच शोधतेय.पण जेव्हा पप्रेयसीच्या लग्नाचीगोष्ट समजते तेव्हा त्याला सौम्य धक्काच बसतो.त्याचे मित्र त्याला सांगातात.व्यक्ती मेल्यावर जे जे संस्कार करतात ते सर्व आम्ही केलेत तुझ्यासाठी तू मेलाय हे समजून.तेव्हा त्याच मन तिला माफ करायाला तय्यार होत.पण त्याच्या जवळची तिची शेवटची आठवण(तिचा फोटो) तिला देण्यासाठी भर पावसात तिच्या घरी जातो.पुन्हा प्रेमाच्या जुन्या आठवणी यांना उजाळा मिळतो.ती परत येण्याची तयारी दाखवते ...पण परत तिला तिचा नवा डाव साद घालतो ...पुन्हा अधुरी कहाणी ...राधा कृष्णासारखी .बरय bollywood सारख ओढून ताणून नायक नायिकांची भेट नाही दाखवली.तो म्हणतो ती तिथ माझ्याबरोबर होती पण आता मी इथ कायमच तिला गमावलय
शेवटी FedEx laast packetजे त्याने जगण्यासाठी ध्येय ..(परत याची delivery करायची म्हणून ) फोडल नसत ते परत देण्यासाठी त्या पत्त्यावर जातो.आणि पुन्हा चौकात हरवतो...पण यावेळी कोणीतरी त्याला मार्ग दाखवते....
@भक्ती

No comments: