Friday, June 19, 2020

बाबा ..फक्त लढ म्हणा..

मीना कुटुंबातील शेंडेफळ .. सगळ्यांची खुप लाडकी होती.बाबांची ती तर माऊच.लहाणपणी बाबांच्या गोष्टी शिवाय मीना झोपायची पण नाही.
    महाविद्यालयात गेली मित्र मैत्रिणींत रमली, आणि नीरवच्या प्रेमात पडली.घरच्यांचा विरोधामुळे आंतरजातीय विवाह केला.नातेवाईक आणि समाजाच्या भीतीने बाबांनी मीनाशी संबंध तोडले होते.बाबांचे मन मात्र त्यांच्या माऊची खुशाली पाहत सुखावत होता.
       काळाने मीनाच्या संसारावर घाला केला.नीरव हे जग सोडून गेला.पदरी शाळेत जाणारी दोन मुले होती.त्या दिवशी मीनाचे अश्रू थांबतच नव्हते.पाठीवर  थरथरणारे हात होते.. मीनाच्या बाबांचे..बाप-लेक अशा वळणावर पुन्हा भेटून ढसाढसा रडले.१०-१२ दिवस बाबा -मीना बरोबरच होते.
      त्या दिवशी मीना म्हणाली बाबा गोष्ट सांगा ना..बाबा म्हणाले आज मी कविता ऐकवतो.. लढ म्हणा..बाबांनी उमेद दिली.
  • @भक्ती

No comments: