Saturday, April 29, 2023

हळीवचे लाडू


 हळीवचे लाडू

पहिलाच प्रयत्न आहे.थंडीमध्ये हे मुख्यतः खातात. पण आता बनवायचा योग आला आहे 😄
हे पौष्टिक असे तेल-बी आहे. १०० ग्रॅम हळिवात तब्बल १०० मिलिग्रॅम आयर्न असते. लोह, कॅल्शियम, फॉलेट, बीटाकॅरोटिन, क जीवनसत्त्व व टोकोफेरॉक हे पोषक घटक हळिवांत आहेत.
१००ग्रम हळिव
२वाट्या खोवलेला नारळ
३वाट्या गुळ
३ वाट्या नारळाचे पाणी/शहाळ्याचे पाणी
१/२ वाटी काजू बदाम पुड
१/२ चमचा चमचा जायफळ पावडर
कृती
हळीव स्वच्छ निवडून,नारळाच्या पाण्यात ८ तास भिजवावे.
हळीव , खोवलेला नारळ,गुळ एकत्र करून ४ तास भिजवावे.
हळीव भिजल्यावर हे मिश्रण ३० मिनिटं मंद आचेवर परतावे.
तेव्हा त्यात काजू बदाम पूड,जायफळ पूड टाकावी.
परतल्यानंतर मिश्रण गार करून लाडू वळावे.
रोज एक कोमट दुधाबरोबर खाऊ शकतो.

टोमॅटो,मुळा,बीट- सुप

 


टोमॅटो -मुळा-बीट सुप----

संध्याकाळी कार्ब बंद नको वाटले तेव्हा सुप या प्रांताकडे वळाले.
तीन पिकलेले टोमॅटो
तीन मध्यम आकाराचे मुळा
अर्धे बीट
मसाला- ५-६ मिरी
एक चमचा धने(किंवा धने पावडर)
दालचिनी
एक तमालपत्र
पाच सहा पाकळ्या लसूण
तीन हिरव्या मिरच्या
एक चमचा किसलेले आल
चिरलेली कोथिंबीर
एक चमचा तेल
हळद ,हिंग जिरे (१/२ चमचे)
कृती-
१.छोट्या कुकरमध्ये तेल तापल्यावर वरील फोडणीचे मसाल्याचे जिन्नस परतून घ्या.
२.चिरलेले टोमॅटो,मुळा,बीट फोडणीत टाकून परतून घ्या.
३.दोन ते तीन कप पाणी टाकावे.
४.तीन -चार शिट्ट्या होऊ द्याव्या.
५.शिट्ट्या झाल्यावर पुन्हा तीन-चार कप पाणी टाकून १५ मिनिटे उकळी येऊ द्यावी.
६.नंतर हे मिश्रण गाळून घेऊन चाळणीवरील मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्या.
७.पुन्हा चाळणीतून गाळून घ्या.
८.पहिले गाळलेले पाणी हे मिश्रण एकत्र करून वाटल्यास आणखिन पाणी,मीठ, आवश्यक असेल तर तिखट टाकून उकळून घ्यावे.
९.गरमा गरम सुप कोथिंबीर किंवा तुळशीची पाने वापरून निवांत प्यावे.

बीट रूट चकली

 सध्या बीट रूट पदार्थ खूपच आवडीचे झाले आहेत.बीट पुरी,बीट थालिपीठ,बीट डोसा ,बीट सूप,बीट चटणी,बीट कोसांबरी या पदार्थांची वर्णी लागली.



काल कोसांबरी करावी म्हणून मुग डाळ भिजत घातली होती.पण मध्येच बीट सोलताना, मुगडाळ शिजवून करतात तशी चकली आठवली.चला म्हटलं बीट रूटची सुंदर गडद रंगाची काटेदार चकली करावी. अगदी सोपी पाककृती आहे.
दोन छोटे बीट रूट
तीन वाट्या तांदळाची पिठी
एक वाटी बेसन पीठ
एक वाटी मुगडाळ
जिरे पूड
धने पूड
तिखट
मीठ
तळण्यासाठी तेल
कृती-
बीट रूटची सालं काढून मध्यम आकाराचे तुकडे करावेत.
कुकरमध्ये बीट आणि मुग डाळ वाफवून घ्यावेत .दोन शिट्या केवळ .जास्त गाळ नको.
वाफवून घेतलेले बीट ,मुगडाळ त्यात तिखट मीठ,धने –जिरे पूड एक एक चमचा टाकली . मिक्सरमधून एकजीव करावे .
आता तांदळाची पिठी,बेसन एकत्र करून दोन चमचा गरम तेलाचे मोहन घातले.
बीट –मुग डाळ मिश्रण त्यात तीळ एकत्र करून घट्ट मळून घेतले.
तेल तापवून मंद आच ठेवली.मस्त गुलाबी चकल्या निगुतीने तळल्या.
इतक भन्नाट वाटत होत.मुगडाळीची विशेष चवही जाणवते.
खुशखुशीत ,खमंग किंचित गोडवा असलेली गुलाबीसर बीट रूट चकली !यम्मी! 

Saturday, September 10, 2022

मोदक

 

यंदा गणपती बाप्पासाठी विविध प्रकारचे मोदक नैवेद्य महणून बनवायचा घाट घातला.सुरुवातीला दहा प्रकार करायाचे ठरवले,पण वेळेनुसार काहीच प्रकार बनवता आले.हे मोदक मी सकाळच्या घाईत वीस मिनिटांतच बनवले आहेत. त्या वेळी जे साहित्य असेल ,जे कमी जास्त प्रमाण वापरून केले आहेत.तेव्हा त्यांची रेसेपी देणे जरा अन्यायकारकच होईल.ज्यांना हे मोदक बनवायचे आहेत त्यांनी नक्कीच युट्युबवर त्या त्या रेसिपीचा शोध घ्यावा.

१.गव्ह्याच्या पीठाचे ,गुळखोबरे,सुकामेवा सारण असलेले तळणीचे मोदक



२.सफरचंद स्वादाचे मोदक



३.गुलकंद-पान मोदक-विड्याचे पान वापरून बनवलेले गुलकंद सारणाचे मोदक



४.ओरिओ बिस्कीट मोदक

यात मुलीने आवडीने भाग घेतला.



५.रोझ-मंगो मोदक

हे सर्वांत बेस्ट झाले होते.



६.अपराजिता मोदक –गोकर्ण फुलांचा अर्क वापरून नैसर्गिक निळ्या रंगांचे मोदक.उकडीच्या मोदक प्रांतात अजूनही चाचपडत आहे J पुढच्या वेळी शिकवणीच लावणार आहे.



७.रवा-मैद्याचे पिठीसाखर –खोबर्याचे सारण असलेले मोदक –तोंडाट टाकताच विरघळणारे.नवऱ्याला हेच जास्त आवडले.



 ८.खजूर –सुकामेवा मोदक ,तोतल शुगर फ्री


-भक्ती

Sunday, August 28, 2022

बीट आणि नारळाची कोसांबरी

 



दिवाळीची तयारी सुरू झाली,म्हणजे इट क्लीन :)

मागे इथेच कोसांबरीची रेसिपी वाचली होती.भिजवलेल्या मुगाच्या डाळीचा वापर यात होतो.मी बीट आणि ओल्या नारळाचा वापर केलाय.प्रोटीन आणि आयर्न यांचा चांगला मेळ यात मिळतो.

साहित्य-

एक किसलेले बीट,काकडी,सफरचंद

एक वाटी किसलेले ओले नारळ

एक वाटी भिजवलेली मुगडाळ

एका लिंबाचा रस

चवीनुसार चिरलेली मिरची,मीठ,चाट मसाला,साखरदाणे

सर्व किसलेले बीट,नारळ,काकडी,सफरचंद,

भिजलेली मुगडाळ एकत्र करायची.चवीनुसार लिंबाचा रस टाकावा किंवा दही.मिरची कोथिंबीर,चाट मसाला,साखरदाणे टाकून एकत्र करावे.आवड असल्यास मोहरी कढीपत्ता फोडणी द्यावी.

-भक्ती