#हंपी #हंपी_इतिहास४ #hampi_history
देवराय पहिला १४०६ ते १४२२/१४२३
देवराय पहिल्याचे प्रेमप्रकरण हे मुख्यतः फेरिश्ता यांच्या वर्णनावर आधारित आहे. हे "War of the Goldsmith's Daughter" म्हणून प्रसिद्ध आहे. ही गोष्ट बहामनी आणि विजयनगर यांच्यातील १४०६-०७ च्या युद्धाचे कारण सांगते.ही कथा फेरिश्ता यांच्या "तारीख-ए-फेरिश्ता" मध्ये आहे. बहामनी दृष्टिकोनातून लिहिलेली असल्याने काही अतिशयोक्ती असू शकते.
काही आधुनिक इतिहासकार ही गोष्ट अपूर्ण सत्य किंवा अतिरंजित मानतात. देवराय हा युद्धप्रिय आणि राज्यविस्तार करणारा राजा होता, त्यामुळे केवळ प्रेमासाठी युद्ध करणे त्याच्या स्वभावाशी जुळत नाही, असे काहीजण सांगतात.
**देवराय पहिला सिंहासनावर आल्यानंतर , एक ब्राह्मण संत काशी यात्रेतून परत आला. त्याने देवरायला मुदगल येथील एका सोनाराच्या मुली बद्दल सांगितले.
मुलीचे नाव पार्थल असे होते.ती अत्यंत सुंदर, गुणी, संगीतात निपुण आणि इतर गुणांनी युक्त होती.देवराय तिच्या वर्णनाने मोहित झाला. त्याने त्या ब्राह्मणाला मुदगलला पाठवले आणि मुलीला विवाहाचा प्रस्ताव दिला.
पार्थलने प्रस्ताव नाकारला कारण त्यावेळची परिस्थिती होती
विजयनगरच्या राजघराण्यातील अलीकडील सिंहासनाच्या संघर्षामुळे (त्याचे भाऊ एकमेकांना मारले गेले होते) तिला भीती वाटली.
राजाच्या राजवाड्यात गेलेल्या मुली कधीही कुटुंबाकडे परत येत नाहीत, अशी अफवा होती.तिने सती प्रथेची भीती व्यक्त केली.त्याऐवजी ती इस्लामिक राजकुमाराशी लग्न करू इच्छित असल्याचे सांगितले.
ब्राह्मण रिकाम्या हाताने परत आला. यामुळे देवरायचा प्रेम वेडा झाला. त्याने मोठ्या सैन्यासह मुदगलवर हल्ला करण्याचे ठरवले.
देवरायने ५००० निवडक घोडदळ घेऊन, “देश दौरा” च्या बहाण्याने निघाला. तुंगभद्रा नदी ओलांडून तो मुदगल जवळ पोहोचला.
त्याने आपल्या सैन्याला रात्री-दिवस वेगाने जाऊन मुदगल गाव घेरण्याचे आणि पार्थलला तिच्या संपूर्ण कुटुंबासह बंधक बनवून आणण्याचे आदेश दिले. मित्रांनी विरोध केला तरी त्याने ऐकले नाही.
देवरायने ब्राह्मणाला पार्थलच्या कुटुंबाला पूर्वसूचना देण्यासाठी पाठवले नव्हते.विजयनगर सैन्य येत असल्याची बातमी मुदगलला पोहोचताच गावकरी पळून गेले. पार्थल आणि तिचे कुटुंबही पळाले.सैन्य रिकाम्या गावात आले. रागात त्यांनी आसपासचे प्रदेश लुटले आणि नष्ट केले.
बहामनी फौज फौलाद खानच्या नेतृत्वात देवरायच्या विरोधात आल्यावर विजयनगरच्या सैन्यावर हल्ला केला. यात विजयनगरचे २००० सैनिक मारले गेले.
***बहामनी गव्हर्नर फौलाद खान याने देवरायच्या सैन्याला पराभूत केले.यामुळे बहामनी सुलतान फिरोज शाह स्वतः मोठ्या फौजेसह आला.
देवराय पहिला या युद्धात पराभूत झाला.शांतता करारात देवरायला मोठी खंडणी द्यावी लागली.
बंकापूर किल्ला आणि प्रदेशद्यावा लागला आपल्या एक मुलीचे लग्न फिरोज शाहच्या मुलाशी करावे लागले .
५० हत्ती, मोती, पैसा आणि २००० नर्तकी-गायिका इ.द्यावे लागले.
पार्थल हीने फिरोज शाहच्या कुटुंबातील हसन खान यांच्याशी लग्न केली.
या युद्धानंतर देवरायने आपली सेना सुधारली तुर्की धनुर्धारी, अरेबियन घोडे यांचा समावेश केला आणि नंतर पंगळ युद्धात फिरोज शाहला पराभूत केले.
***पंगळ युद्धाची रणनीती (सुमारे १४१८-१४२० ई.) हे युद्ध बहामनी सुलतान फिरोज शाह यांनी सुरू केले होते, पण शेवटी देवराय पहिला यांच्या रणनीतीने विजयनगरला निर्णायक विजय मिळवून दिला.
पंगळ किल्ला (आजच्या तेलंगणा/नालगोंडा भागात) जिंकणे. हा किल्ला रेचरला नायक किंवा विजयनगरच्या प्रभावाखाली होता. त्यावर नियंत्रण मिळवल्याने बहामनी साम्राज्य दक्षिणेकडे विस्तारित होऊ शकले असते.
मोठ्या फौजेसह पंगळ किल्ल्याचा दोन वर्षांचा वेढा घातला.किल्ल्याभोवती छावणी टाकली, पुरवठा मार्ग तोडण्याचा प्रयत्न केला.किल्ला जिंकण्यासाठी सतत हल्ले आणि दबाव टाकला.
वेढा खूप लांबला म्हणजे २ वर्षे लांबला. यामुळे बहामनी सैन्यात दुष्काळ, उपासमार आणि रोगराई पसरली. सैन्य कमकुवत आणि थकले.
देवरायने सुरुवातीला थेट सामना टाळला आणि संधीची वाट पाहिली. पूर्वीच्या पराभवानंतर त्याने तुर्की धनुर्धारी , अरेबियन आणि पर्शियन घोडे आणून घोडदळ आणि तोफखाना सुधारला होता. युद्धाच्या वेळी नवीन, ताज्या फौजा गोळा केल्या.वेलमा सरदार आणि इतर हिंदू सरदारांची मदत घेतली. यामुळे अतिरिक्त सैन्य आणि स्थानिक पाठिंबा मिळाला.
बहामनी सैन्य वेढ्यात व्यस्त असताना देवरायने बहामनी छावणीला बाहेरून घेरले.विजयनगरची मुख्य फौज आल्यावर दोन बाजूंनी हल्ला केला.
जेव्हा बहामनी सैन्य कमकुवत आणि रोगाने ग्रस्त झाले, तेव्हा पंगळ किल्ल्यातील विजयनगर/नायकांच्या सैन्याने बाहेर पडून शत्रूच्या छावणीवर हल्ला केला.
यामुळे बहामनी फौज दोन आगीत सापडली एकीकडे देवरायची बाहेरची फौज, दुसरीकडे किल्ल्यातून येणारा हल्ला.
बहामनी सैन्याची संपूर्ण हानी झाली. हजारो सैनिक मारले गेले. फिरोज शाह पळून गेला. काही वर्णनांनुसार विजयनगर सैन्याने शत्रूच्या डोक्यांचा मोठा ढीग उभारला.विजयनगरची फौज फिरोज शाहच्या प्रदेशात घुसली, अनेक गावे, मशीदी नष्ट केल्या आणि मुस्लिम नागरिकांवर मोठा हल्ला केला.
***फिरोज शाहला शांतता मागावी लागली.
त्याने दक्षिणी आणि पूर्वीचे जिल्हे मुख्यतः गुलबर्गा आणि बीजापूरच्या दक्षिणेकडील भाग देवरायला सोडून द्यावे लागले.
१४२२ पर्यंत देवराय पहिल्याने कृष्णा-तुंगभद्रा दोआब संपूर्ण नियंत्रणात आणले, ज्यात पंगळ किल्ला समाविष्ट होता.
या पराभवानंतर फिरोज शाह खूप निराश झाला. त्याने सिंहासन आपल्या भावाला अहमद शाहला सोपवले आणि स्वतः धार्मिक जीवन जगत मरण पावला.
हे युद्ध देवराय पहिल्याच्या कारकीर्दीतील सर्वात मोठे यश मानले जाते. यामुळे विजयनगर साम्राज्य दक्षिण भारतात पुन्हा मजबूत झाले.
***वारंगल चे विभाजन आणि संधी
वारंगलच्या वेलमा राजघराण्यात आंतरिक भांडण झाले.देवरायने याचा फायदा घेत वारंगलशी युती करून रेड्डी राज्याचे विभाजन केले.
यामुळे दख्खनमध्ये सत्ता संतुलन बदलले आणि विजयनगरला फायदा झाला.
***गोलकोंडा आणि तेलंगणा भागातील वेलमा सरदारयांच्याशी सतत छोटे-मोठे युद्धे आणि छापे चालू होते.
देवराय पहिल्याने वेलमांना अनेक वेळा पराभूत केले किंवा त्यांच्याशी युती केली.
हे संघर्ष मुख्यतः तुंगभद्रा-कृष्णा सीमेवर आणि तेलंगणा भागात होते.
***गजपती यांच्याशी तणाव (ओडिशा/कलिंग)
पंगळ युद्धानंतर बहामनी कमकुवत झाल्याने गजपती भानुदेव याने राजमहेन्द्री भागावर हल्ला केला.यामुळे युद्ध होण्याची शक्यता निर्माण झाली.
पण विजयनगरच्या डोड्डा अल्ला या कुशल मंत्री यांच्या डिप्लोमसीने युद्ध टळले. समझोता झाला आणि गजपती मागे हटले.म्हणजे प्रत्यक्ष मोठी लढाई झाली नाही, फक्त सीमेवर तणाव होता.
देवराय पहिला यांचा मृत्यू २५ फेब्रुवारी १४२३ रोजी झाला.
१. रामचंद्र राय (Ramachandra Raya)
देवराय पहिल्याचा मुलगा.
सिंहासनावर १४२२/१४२३ मध्ये आला.
त्याचा कारकीर्द फार छोटा होता .काही महिने किंवा ६-७ महिन्यांपर्यंत.
त्याच्या काळात कोणतेही विशेष युद्ध, विकास किंवा घटना घडली नाही. तो कमकुवत राजा मानला जातो.
२. वीर विजय बुक्का राय / विजय राय
देवराय पहिल्याचा दुसरा मुलगा (रामचंद्र रायचा भाऊ).
रामचंद्र रायनंतर लगेचच १४२२-१४२४ पर्यंत सिंहासनावर आला.त्याचाही कारकीर्द खूप छोटा (१-२ वर्षे) आणि कमकुवत होता.त्याच्या काळातही साम्राज्य स्थिर राहिले नाही. कोणतीही मोठी कामगिरी नोंदवली गेली नाही.
***३. देवराय दुसरा
देवराय पहिल्याचा मुलगा वा वारस होता.जो १४२४ ई. मध्ये सिंहासनावर आला. कारकीर्द १४२४ ते १४४६ ई. पर्यंत होती.
तो संगम वंशातील सर्वात महान राजा मानला जातो. त्याने बहामनी सुलतानांविरुद्ध अनेक यशस्वी युद्धे केली, सेना सुधारली जसे मुस्लिम धनुर्धारी नेमले, साम्राज्य विस्तारले आणि कन्नड साहित्य व वास्तुकलेचा पुरस्कार केला.त्याला गजबेटेकर ही उपाधी मिळाली.


No comments:
Post a Comment