Saturday, April 25, 2026

फॉरेस्ट बाथिंग- शिनरिन योकु



 फॉरेस्ट बाथिंग- शिनरिन योकु

मूळ लेखक- हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस  
मराठी अनुवाद -नीलिमा करमरकर


‘इकिगाई’ या जगभर गाजलेल्या पुस्तकाचे लेखक हेक्टर गार्सिया यांचे हे पुस्तक आहे. हे देखील ‘इकिगाई’प्रमाणे जपानमधील ‘शिनरिन योकु’ या संकल्पनेला आपल्या समोर मांडते.
१९८२ मध्ये जपानी फॉरेस्ट एजन्सीने या ‘हरितवन स्नान’ संकल्पनेची उपचारपद्धती म्हणून सुरुवात केली.
‘शिनरिन’ म्हणजे जंगल, अरण्य, वन आणि ‘योकु’ म्हणजे अंघोळ करणे.


जपानमधील साकुरा (चेरी ब्लॉसम) बहराच्या काळात तेथे भेट देणे सहलीसाठी अतिशय उत्तम मानले जाते. असे दिसून येते की शहरी जीवनातही या बहराचा नागरिकांच्या मनावर सकारात्मक परिणाम होतो, तर घनदाट वनात, झाडांच्या सान्निध्यात वेळ घालवल्याने मनावर खोलवर परिणाम होतात.
हे छोटे, एकाच बैठकीत वाचता येणारे पुस्तक सहा भागांत, सुमारे १७० पानांत मांडले आहे.


पहिला भाग -हरवलेले नंदनवन’
शहरी धावपळीत, सिमेंटच्या भव्य घरांमध्ये आणि दडपणाखाली जगणारा माणूस जंगल या नंदनवनापासून दूर गेला आहे. त्याच्या मानसिक हानीस तो स्वतःच कारणीभूत ठरतो. डोपामाइनच्या अतिरेकामुळे त्याची मानसिक शांती हरवली आहे.


दुसरा भाग – ‘ईडन गार्डनमध्ये पुनरागमन’
या भागात वृक्ष आणि जंगलांच्या सान्निध्यात राहून जग बदलणाऱ्या महान व्यक्तींच्या कथा दिल्या आहेत. यात बोधी वृक्षाखाली ध्यान करणारे बुद्ध, हानासाका जिशान (मृत झाडाला बहर आणणारा वृद्ध), बांबूच्या वनातील ज्ञानी, सेल्टिक वनातील वृक्ष आणि थोरो या  व्यक्तींच्या निसर्गाशी एकरूप झालेल्या गोष्टी यांचा समावेश आहे.


तिसरा भाग- ‘शिनरिन योकुतील विज्ञान’
या भागात वनस्नानाचे शारीरिक व मानसिक फायदे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगितले आहेत. झाडांमधून स्त्रवणाऱ्या ‘फाइटोनसाइड्स’ या घटकांचे उपचारात्मक (प्रतिबंधात्मक) गुणधर्म, हार्मेटिक परिणाम यांचे स्पष्टीकरण दिले आहे.
कॉर्टिसॉलचे प्रमाण कमी होणे, हृदयगती संतुलित होणे, HRV (Heart Rate Variability) वाढणे, NK (Natural Killer) पेशींची क्रियाशीलता वाढणे यांसारख्या बाबींचा अभ्यास शहरातील आणि जंगलातील जीवनाच्या तुलनेत मांडला आहे.


चौथा भाग -शिनरिन योकुचे तत्त्वज्ञान’
जपानमधील पारंपरिक ‘शिंटो’ धर्मानुसार निसर्गातील प्रत्येक घटकात ‘कामी’ (दैवी शक्ती) वास करते, ही भावना माणसाला निसर्गाशी जोडते, हे या भागात स्पष्ट केले आहे.
याच भागात जपानी संकल्पना देखील सांगितल्या आहेत 
युगेन विश्वाचे निरीक्षण करताना अनुभवलेले गूढ सौंदर्य जे आपल्या अंतःकरणातील गाभ्यापर्यंत जाऊन पोहोचतात.? 
उदा. चांदण्या रात्री जेव्हा आपण टक लावून आकाशकडे पाहतो, तेव्हा आपण स्वतःला विसरुन जातो.


कोमोरबी-झाडांच्या पानांतून झिरपणाऱ्या प्रकाश-छायेचा खेळ,त्यासाठीचा हा शब्द आहे' 
उदा. या खेळात माणसाचे मन व्यापून जाते. राशीमान' मध्य सिनेमा हा यामध्ये हे दिसते


वाबी-साबी -अपूर्णतेतील सौंदर्य
निसर्गात कधीही परिपूर्ण सममिती नसते, उलट असममितीमध्येच सौंदर्य दडलेले असते.


पाचवा भाग -‘जंगलाकडे परत चला’
या भागात ‘जॉन मूर’ यांच्या अमेरिकेतील नॅशनल पार्क संरक्षण चळवळीमागील भावना सुंदरपणे मांडली आहे.
तसेच ‘शिनरिन योकु’च्या पाच टप्प्यांद्वारे मन आणि शरीर कसे निसर्गात पूर्णपणे बुडवायचे, याचे मार्गदर्शन दिले आहे. काय करावे आणि काय करू नये याची नियमावलीही दिली आहे.


सहावा भाग -‘घराघरात शिनरिन योकु’
घरातही झाडे ठेवून निसर्गाचा अनुभव घेता येतो, हे विविध उदाहरणांनी स्पष्ट केले आहे.


निसर्गातील ध्वनी ,विशेषतः पक्ष्यांचे किलबिल मानवी मनासाठी औषधासारखे काम करतात. तणावमुक्तीसाठी ऑफिस किंवा हॉस्पिटलमध्येही यांचा उपयोग होऊ शकतो.
कारण पक्षी जेव्हा गातात, तेव्हा ते सुरक्षिततेची भावना व्यक्त करत असतात आणि तीच भावना नकळत माणसामध्येही झिरपते, ज्यामुळे मन शांत होते.


शेवटी जपानमधील पारंपरिक ‘चानोयू’ (टी सेरेमनी) याचा उगम आणि त्याचे फायदेही या पुस्तकात सांगितले आहेत.
-भक्ती 



No comments: