#हंपी_इतिहास_६ ----विजयनगर साम्राज्य आणि हनुमान भक्ती
विजयनगर साम्राज्य आणि हनुमान भक्ती यांचा संबंध खूप गहन आणि रोचक आहे. विजयनगर साम्राज्य (१३३६ ते १५६५) हे दक्षिण भारतातील एक शक्तिशाली हिंदू साम्राज्य होते, ज्याने इस्लामी आक्रमणांविरुद्ध हिंदू संस्कृतीचे रक्षण केले. या साम्राज्यात हनुमानजींची भक्ती ही केवळ धार्मिक नव्हती, तर राजकीय, सैन्यिक आणि सामाजिक महत्त्वाची होती.
हंपि अंजनाद्री पर्वत (अंजनेयाद्री बेट्टा किंवा अंजनी पर्वत)
हंपी जवळ अनेगुंडी भागात, तुंगभद्रा नदीच्या काठी हा पर्वत आहे.रामायण काळातील किष्किंधा -वानर राज्य चा भाग मानला जातो.हनुमानजींचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. हनुमानजींच्या आईचे नाव अंजना देवी, म्हणून या पर्वताला अंजनाद्री म्हणतात. खालून शिखरापर्यंत ५७५ पायऱ्या चढाव्या लागतात. साधारण ३०-४५ मिनिटे लागतात.चढाई थोडी कठीण आहे, पण जय बजरंगबली म्हणत चढताना खूप आनंद येतो. वरून तुंगभद्रा नदी, हंपीचे खडकाळ लँडस्केप, विजयनगर साम्राज्याचे अवशेष आणि दूरवरचा विहंगम दृष्य अफलातून दिसतो.तुम्ही दोन दिवस अख्ख दक्षिण हंपी पालथं घातलेले असते.त्यामुळे अंजनाद्री पर्वताहून दूरवर दिसणारे दक्षिण हंपीतले मंदिर शोधायला मजा येते .वळण वळण घेऊन येणारी पंपा नदी ,मधेच चंद्रकोरीसारखं वळण घेते.तिथे दूर विजय विठ्ठल मंदिर आणि रथ पाहायचा .चक्रतीर्थ वरचे ते खडक,विरुपाक्ष पहायला मंदिरापासून थोडं दूर दक्षिणेकडे यायचं.
वरून दिसते की, हजारो-लाखो वर्षांपूर्वी देवांनी खेळल्यासारखे मोठे-मोठे गोलाकार, अनियमित खडक सर्वत्र पसरलेले आहेत. काही खडक इतके मोठे की, त्यावर संपूर्ण मंदिरे बांधली गेली होती! हे खडक लाल-तांबड्या रंगाचे, सूर्यप्रकाशात सोनेरी दिसतात.
खडकांमधील खोऱ्यात आणि नदीकाठी भातशेती हिरवीगार दिसतात.जणू हिरव्या पट्ट्यांचा जिगसॉ पझल! त्यामध्ये नारळी वृक्ष रांगेत उभे आहेत. हे हिरवे पट्टे खडकाळ भागात खूप स्पष्ट दिसतात .
रामाच्या वनवासादरम्यान, हनुमान किष्किंधेत (उत्तर हंपी ) त्यांना भेटला आणि त्यांना आपला शाश्वत स्वामी म्हणून ओळखले . रामासोबतच्या त्याच्या पहिल्याच भेटीतून भक्ती, नम्रता आणि सेवेची आजीवन शपथ घेतली गेली .
संदेश पोहोचवण्यापासून ते समुद्र ओलांडण्यापर्यंत , लंकेला आग लावण्यापासून ते संजीवनी आणण्यापर्यंत , हनुमानाने निस्वार्थपणे सेवा केली .
हंपीतील यंत्रोद्धारक हनुमान मंदिर
श्री व्यासराज (१४४७–१५३९) हे विजयनगर साम्राज्याचे राजगुरू होते. ते कृष्णदेवराय यांचे गुरू होते. ते चार राजांच्या काळात राजगुरू म्हणून राहिले.
ते द्वैत दर्शनाचे महान विद्वान होते आणि पुरंदरदास, कनकदास यांचे गुरूही होते.
हनुमान भक्तीचा प्रसार: व्यासराज यांनी ७३२ हनुमान मूर्ती दक्षिण भारतात स्थापित केल्या. यातील बहुतेक वीर हनुमान (वीर मुद्रेत) होत्या.
व्यासराज यांनी ७३२ जैन विद्वानांना शास्त्रार्थात हरवले आणि प्रत्येक विजयानंतर एक हनुमान मूर्ती स्थापित केली.राज्यात हिंदू धर्माचे रक्षण आणि लोकांच्या मनोबल वाढवण्यासाठी वीर हनुमान पूजेला प्रोत्साहन दिले.
हंपीत यंत्रोद्धारक हनुमान मंदिर चक्रतीर्थ जवळ हे व्यासराज यांनी स्थापित केले.यामागची कथा अशी कि,व्यासराज रोज खडकावर कोळशाने हनुमानजींचे चित्र काढायचे, पण ते नाहीसे व्हायचे. १२ दिवसांनी हनुमानजी प्रकट झाले आणि षट्कोण यंत्र मध्ये स्वतःला बांधून (यंत्रोद्धारक) स्थापित करण्यास सांगितले.
ही मूर्ती पद्मासन या योग मुद्रेत बसलेल्या अवस्थेत आहे .
माधवरंग मंदिरातील विशाल हनुमान मूर्ती ...
लोटस महलजवळ माधव मंदिर, ज्याला रंग मंदिर असेही म्हणतात मंदिर आहे. मुख्य गर्भगृहाच्या दरवाजाबाहेर, हनुमानाची एक विशाल मूर्ती आहे.जी मोनोलिथिक म्हणजे एकाच दगडात कोरली असून तीन मीटर इतकी उणचं आहे ..ज्यात त्याचा उजवा हात वर उचललेला, डावी मूठ (जी खराब झालेली आहे) मांडीवर आणि कमानदार शेपूट डोक्यावर आहे. त्याच्या कमरेला खंजीर असलेला एक पट्टा आहे .जे विजयनगरच्या अधिकृत चिन्हांपैकी एक आहे. हनुमानाच्या खाली एक रांगणारा राक्षस आहे, ज्याला हनुमानाने ठार मारले आहे. हे राक्षसी दुष्टतेचे क्षुद्रत्व आणि हनुमान प्रतीक चांगुलपणाचे महत्त्व अधोरेखित करतात.यातील हनुमानाच्या गळ्यातील माळा.कंबरेवरचे आणि इतर दागिनेही अतिशय सुबक आहेत.इतका सालंकृत हनुमान खूप वेळ डोळेभरून पाहावा असा आहे .
इस्लामी आक्रमणांविरुद्ध लढताना हनुमानजींना वीर रक्षणदेवता मानले गेले. हनुमान मूर्ती राज्यभर ठेवून लोकांचे मनोबल वाढवले.
.jpeg)
.jpeg)



.jpeg)

.jpeg)
.webp)
No comments:
Post a Comment