Thursday, January 30, 2025

रासपुतीन ते पुतीन -पुस्तक परिचय

 रासपुतीन ते पुतीन - 

लेखक-पंकज कालुवाला




आंतरराष्ट्रीय राजकारणातील गतिविधिमध्ये  सामान्य गती असणारी मला यात उत्सुकता निर्माण झाली आहे. गाथा इराणी हे पुस्तक वाचतांना तेलासंबंधी आखाती देश व आंतरराष्ट्रीय देश यांचे राजकारण कसे सतत उतार-चढाचे हे समजले. ग्रंथालयात् रासपुतीन ते पुतीन हे पुस्तक दिसले. यात आतापर्यंत रशियाचे नेतृत्व ज्यांनी केले त्यांच्या कारकीर्दीचा संक्षिप्त आढावा आहे. रशिया एका मोठा भूभाग असलेला प्रदेश इतकीच सामान्य माहिती. रशियाबाबत बरीच माहिती मिळाली, इतर वाचकांसाठी ही माहिती अधिक नसेल पण माझ्यासाठी भरपूर म्हणावी लागेल.


१.रशियात झाररराज्याचे साम्राज्य कायम संकटात होते, कामगारचळवळ महायुद्‌ध अशा अनेक संकटात रासपुतिन सारख्या पाखंडी बाबाचा त्यांनी आधार घेतला? सुरूवात वैयक्तिक कारणांमुळे - मुलाची तब्येत ठीक करणे होते. पण या रासपुतिनने हळहळू सर्व घराणे, इतर लोकांना कट्पुतली केले होते.



२.१९१७ मध्ये रशियन क्रांतीनंतर सोव्हिएट कम्युनिस्ट पर्व सुरु झाले. यात 'बोल्शेिविक' (Majority faction] मेन्शिविक (Minority) हे रशियन डेमोक्रेटिक पार्टीचे भाग समजले.


३.लेनिन व स्टॅलिन यांची वैयक्तिक माहिती समजली. लेनिनचे मार्क्स विचारांनी भारून जाणे,  त्याच्या भावाला विद्यार्थी दशेत सरकार विरोधात कामे केल्याने फाशीची शिक्षा सुनावली होती.



४.स्टॅलिनने सत्तेमध्ये राहण्यासाठी अनेक लोकांचे शिरसंधान केले हे वाचून शिसारी वाटली. पण तरीही तो लोकप्रिय होता?


५.नंतरच्या काळातल्या अध्यक्षांच्या कारकीर्द देखील सत्ता सांभाळण्यात कशा घडत होत्या ते समजले. जवळपास सर्व अध्यक्षांचे लहानपणीचे आयुष्य हलाकीचेच होते. कोणीही फार शिकलेले नव्हते


६.ज्याप्रमाणे  काळ्या पाण्याची शिक्षा ही अत्यंत क्रूर , अमानुष जाणली जाते.त्याप्रमाणे रशियात सायबेरिया सारख्या अत्यंत थंड हवामान असलेल्या शहरात आरोपींना नजरकैद/तडीपार केले जात.जिथे जगणे खुपच कठीण होईल.अनेक जण पळून फ्रान्सला व इतर ठिकाणी जात.


७.पुढे १९९१ ला de-Stallinization करायला अनेक अध्यक्षांनी वेळ दिलाच पण सैन्य ताकदही सर्वांनीच कायम वाढवली.


८.१९९१-सोव्हियट युनियनची पडझड होऊन एक मुक्त व्यापर-संस्था उदयास येऊ घातली. यात पहिले अध्यक्ष होते बोरिस येल्तसिन, पण त्यांच्यावर अनेक भष्ट्राचाराचे आरोप झाले. एकंदरीत मुक्त व्यापार स्वीकारतांना भष्ट्राचाराची कीड रशियाला लागली.



९.२००० पासून आतापर्यंत व्लादिमिर पुतीन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष - उपपंतप्रधान - राष्ट्राध्यक्ष आहेत पुतीन हे लहानपणा-पासून हुशार, कराटे चंपियन होते. ते रशियन गुप्तहेर संस्थेत २६ वर्षे कार्यरत होते. पुलिन हे मितभाषीपण अत्यंत खंबीर नेतृत्व म्हणून रशियाच्या सत्तेत वारंवार निवडून आले.अनेक वर्षे सत्तेत राहूनही २०१२ मध्ये घटनाबदल करून ते पुन्हा सत्तेत आले.


पुतीन यांनी आधीच्या काळात  अमेरिकेशी संबंध सुधारलेले होते एडवर्ड स्टोनेडच्या निमित्ताने ते बिघडले आजपर्यंत. आता प्रश्न असा की पुतीननंतर पुढील अध्यक्ष कोण असेल? जो अजूनही उदयास आलेला दिसत नाही...

Friday, January 24, 2025

मांजरसुंबा किल्ला

 प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व गड किल्ले गर्दीने भरून जातात.तेव्हा ट्रेक कॅम्पने आदल्या दिवशीच छोटासा मॉर्निंग ट्रेक घेतला...मांजरसुंबा गड!



मी अजूनही हा गड पाहिला नव्हता.पण गोरक्षनाथ गड,डोंगरगणला जातांना उंचावर असलेला हा गड कायम आकर्षित करायचा.गड खुप उंच आहे असे वाटायचे.विशालदादाला जेव्हा सांगितले की पहिल्यांदाच जाणार आहे.तेव्हा तो म्हणाला १० मिनिटांत चढून जाता येते.खरोखर १० मिनिटांत मी गड चढले.उगाच इतके दिवस घालवले असं वाटलं.गडावर गेल्यावर पूर्वेकडे एक मुख्य दरवाजा- कमान आहे .जिचे छत ,भिंती,खिडक्या आकर्षक आहे.सकाळचे ६.४५ वाजले होते.सूर्योदयाचे ते रंग उधळणीचे मोहक आकाश डोळ्यांत साठवत होते.सूर्याची लाल केशरी  चमचमती बिंदी गोजिरी होती.सर्वांनी प्रजासत्ताक दिनाचा पूर्व सूर्योदय तिरंग्यासह फोटो घेत अनुभवला.पुढे आत गेल्यावर एक विस्तीर्ण पठार आहे.तिथेच एक अर्धवट सुरक्षित वास्तू बाकी आहे.समोर पूर्वेलाच  पाण्याचे भव्य टाके आहे.

मांजरसुंबा हा गड- किल्ला १४ व्या शतकात निजामाच्या काळात सलाबत खान नावाच्या सरदाराने बांधला होता.संभाजीनगर त्याकाळच्या देवगिरी?नगरातून शत्रू सैन्यावर लक्ष देण्यासाठी हा उंचावर टेहाळणीसाठी बांधलेला किल्ला होता.याचे मूळ नाव मंजर -ए- सुब्हा  असे होते जे अपभ्रंश होऊन मांजरसुंबा /मांजरसुभा झाले.

या किल्ल्याला अजून एक ओळख आहे ती म्हणजे हत्तीची मोट!

पठाराच्या दुसऱ्या बाजूला एक दुमजली हवा महाल/ बुरूज आहे.त्याला हत्तीची मोट  म्हणतात कारण बुरूजाची खाली तीन पाण्याची टाके आहेत.तसेच तिथे मोट बांधायची सोय आहे.टाक्याकडे खाली जाण्यासाठी पायऱ्यांची सोय आहे.पण नंतरची वाट थोडी अवघड आहे.वेळेअभावी आम्ही बुरूजावरूनच टाके पाहिले.
















ट्रेक कॅम्पने ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रश्नोत्तरे घेतले.तसेच एका कागदावर स्वतःमध्ये काय बदल करू इच्छितो ज्याने स्वतःचे आणि समाजाचे हित साधले जाईल हे लिहून ही अँक्टिव्हिटी केली.राष्ट्रगीतासह छोट्याशा सुरेख ट्रेकची सांगता केली.

हा फोटो अभ्यासक रोहन गाडेकर यांच्या सौजन्याने देत आहे.


Sunday, January 12, 2025

तीळगुळ वड्या

 



निसर्गाची रंगसंगती सुगरणी स्त्रीच्या हाताच्या जादूने जिभेची रसना पूर्ण करते.तिळ खोबरं वाटण्याच्या खमंग स्निगधतेत गाजराची,हरबऱ्याच्या दाण्याची मऊसर चवं रेंगाळत राहते....चांगले भोग म्हणुन बाकी काय भोगीची भाजी खायला मिळते.

बरोबरीने तीळ गुळाची वडी चाखतांना एखादा इलायची एक दाणा बक्षीस जिंकल्यासारखा वाटत राहतो

तीळगुळ वड्या 

दोन वाटी भाजलेल्या तिळाचा जाडसर कुट,एक वाटी भाजलेल्या खोबऱ्याचा कूट,अर्धी वाटी शेंगा दाणे कुट, इलायची पूड, ४०० ग्रॅम गूळ,साजूक तूप.

चार मोठे चमचे साजूक तूप कढईत गरम करायचे.त्यात किसलेला गूळ घालावा.१० मिनिटे उकळी फुटेपर्यंत हलवत राहावा.नंतर त्यात तिळाचा,खोबऱ्याचा,शेंगा दाण्यांचा कूट ,इलायची पावडर टाकावी.काही अख्खे तिळ यात टाकावे.मंद आचेवर परतावे.साधारण १० मिनिटे.नंतर गरम गरमच हाताला/वाटीला  गार पाणी लावून वड्या थापून घ्यायच्या.गरम असतांनाच वड्या कापायच्या.गार झाल्यावर काढायच्या.

तीळगुळ घ्या गोड गोड बोला!!

Sunday, December 29, 2024

आवळ्याचा छुंदा

 


लोणचं वगैरे करणं हा माझ्या आईचा खास प्रांत आहे.त्यात आवळ्याचे लोणचे तुम्ही करत असाल ,पण आईनं खुप सुंदर आवळ्याचा छुंदा केला.

अर्धा किलो आवळ्याला अर्धा किलो गुळ लागतो.यानुसार आवळ्याच्या छुंद्याला आवळे:गुळ १:१ असे प्रमाण असावे.

आवळे इडली पात्रात वाफवून घ्यायचे.वाफवल्यानंतर बिया काढून टाकायच्या.आता फोडी गार करून मिक्सरमधून फिरवून घ्यायच्या, तुमच्या आवडीनुसार बारीक करू शकता किंवा किसून घेऊ शकता.गुळ आणि  बारीक आवळा एकत्र करायचा.कढईत मंद गॅसवर परतायला सुरू करायचे.त्यात मसाले - बारीक केलेली चिमूटभर मिरी, धनेपूड ३ चमचे,लाल तिखट आवडीनुसार,काळं मीठ,वेलची पूड टाकायचा.हे मिश्रण छान परतल्यावर ,जरासे घट्ट व्हायला लागल्यावर गॅस बंद करा.नंतर एक लिंबांचा रस त्यात पिळून घ्यायचा.छुंदा गार करून काचेच्या बरणीत भरायचा.

बरोबरीने कोवळ्या तुरीचे उकडून परतलेले दाणे,मेथीचे पराठे होते.मग तुम्ही कधी करता हा थंडीचा बेत 😊

Friday, December 27, 2024

एका तेलियाने -पुस्तक परिचय

 एका तेलियाने

लेखक - गिरीश कुबेर



या पुस्तकाच्या २००९ पासून २०२३ पर्यंत, सतरा आवृत्ती निघाल्या आहेत. गाथा इराणी' या पुस्तकानंतर आखाती देशांबद्‌दल एक. झालेच आहे. त्यात ज्याप्रमाणे कुतूहल ऐतिहासिक काळात वसाहतवादाचे रूप अनेक निसर्गनिर्मित साधना साठी होते तसेच तेलासाठीही बलाढ्य राष्ट्रांची आखाती देशांवर हुकूमत असणारच, ती कशी होती हा प्रश्न होताच. यासर्व कुतुहलाचे उत्तर 'एका तेलियाने..एका श्रीमंत शापित वाळवंट' या पुस्तकात मिळाले. 

वीस प्रकरणांचे छोटेखानी पुस्तक तेलाच्या व्यापाराची,तेल उत्पादक देश,तेल विक्री करणाऱ्या कंपन्या यांतील अनेक गुंतागुंतीची ओळख उत्तम पद्‌धतीने करुन देते.

सुरुवातीलाच 'एका तेलियाने पहिला तेलिया मोसादेघ- इराणचा कडवा राष्ट्रवादी यांनी ब्रिटीश कंपनीचे राष्ट्रीयीकरण आणि या विरोधातला CIA, MI-5 यांनी तयार केलेला बागुलबुवा हे प्रकरण कसे घडले, नंतर कसे उजेडात आले हे रंजकपणे सांगितले आहे.

यापुढच्या प्रकरणात सौदी अरेबियाची जन्मकथा, तिथे तेलाचा शोध, इजिप्त- इस्त्रायल युद्ध, सुवेझ कालवा प्रकरणाषयी अनेक मोठमोठ्या घटनांचा वेध घेतला आहे.

 सौदीचे पहिले संस्थापक सौद आणि अमेरिका कंपनी अराम्को

 १९३७ साली सोन्याची काळ्या केलेली शोधमोहिम, तेल व्यापाराचा  करार करते. यात सौदी देश सर्वात महत्त्वाचा होता कारण जगातील सर्वात अधिक तेल उत्पादन् तिथेच होणार होते.


आता प्रवेश होतो शेख अहमद झाकी यामानीचा! या आंग्लविद्याविभूषित, मुत्सद्‌दी सौदी तेल मंत्री यांची उत्कंठावर्धक कहाणीचा म्हणजेच एका तेलियाची कहाणी.

अर्थ विभागात काम करणाऱ्या यामानींची हुशारी पाहून राजे फैजल यांचा कायदेशीर सल्लागार नेमणूक करतात.जेव्हा फैजल यांच्याकडे नाट्यमय स्थितीत राजा होण्याची वेळ येते तेव्हा अर्थात तेलमंत्री  होतात यामिनी.सौदीत तेलाच्या अर्थकारणात नेत्रदीपक कार्य केले.

 १९६० साली तेलकंपन्याच्या सततच्या नफेखोरीत वाटा मिळवण्यासाठी OPEC ची स्थापना झालीच होती. यात तेव्हा तेलउत्पादक देश होते सौदी अरेबिया, इराक, इराण, कुवेत,व्हेनेझुला.


ओपेकला पूर्वी तेलकंपन्या गिनतीतही घेत नसे तेव्हा यामिनी यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेतले.ज्यामुळे हळूहळू तेल कंपन्यांना ओपेकची दखल घ्यायला भाग पाडले. तरीही ओपेकमध्ये भाववाढीवरून सत्‌त तेल उत्पादक देशांमध्ये मतभेद असत. त्यात लिबिया, इराण यांना सतत चढा भाव पाहिजे असत. तर सौदीचा भाव त्याहून कमी असत. तसेच त्यांच्या तेल शुद्धीकरणाचा दरही कमी होता , त्यामुळे सौदीच्या तेलाला सर्व कंपन्यांची पसंती असे.तेव्हा याबाबत सर्वांना भाव योग्य मिळावा म्हणून 'तेल कोटा ठरवून द्यायचा या बाबत यामिनी ओपेकद्वारे आग्रही होते . ठरवलेल्या भावालाच ज्या त्या देशाने तेल विकायचे. जास्त हाव नसावी. सगळ्यांनी मिळून भाव ,कोटा ठरवला, तरच तेल विकत घेणाऱ्या देशाची दादागिरी मोडता येईल हे त्यांचे धोरण होते.

पण हे अनेक हुकुमशाही' सत्ता असलेल्या आखाती देशांना पचनी पडतच नसे, त्यांचा एकच बाणा अधिकाधिक सर्व नफा मिळवण्याकडेच, टोळी मानसिकतेतून हे देश अजूनही बाहेर आले नव्हते. तसेच 'अरब 'बिगर अरब' हाही वाद सुप्तपणे होताच त्यातून 'ओआपेक' अरब देशांनी उभी केली.

अनेक तेल कंपन्या एक्झॉन, मोबील, ऑक्सी इ. यांचा या तेलउत्पादक देशांशी भावावरुन सततचा संघर्ष पुस्तकात मांडला आहे.

त्यातच यासिर अराफत, सिरीया, रशिया ,इस्रायल, जॉर्डन मोसाद , इत्यादींच्या युद्धाच्याअनेक पार्श्वभूमी यात संक्षिप्त वाचायला मिळतात.

कार्लोस द जॅकल या कुख्यात डाव्या गटाच्या पुरस्कारकर्त्याने यामिनी व इतर तेल व्यापारासंबधित  मिटींगमध्ये जमलेल्या उच्च पदस्थ लोकांना ओलीस ठेवून केलेल्या घटनेचा थरारक प्रकरण पुस्तकात आहे.

तसेच जेव्हा तेलाचे भाव वाढले तेव्हा अमेरिकेत, सौदीत बोकाळलेला भ्रष्ट्राचार आणि त्यात अनेकांनी या वाहत्या गंगेत हात धुतले व कोट्याधीश झाले. याच्याही रोचक गोष्टी,भानगडी यात आहेत. 

तेलाचा भाव वाढला की अमेरिका वाढत्या "पैशांमुळे इराण, सौदी इ.यांना कसे शस्त्रास्त्रे विकत घ्यायला भाग पाडत असे .भाव कमी झाला तर फायदाच अमेरिकेचा व्हायचा.'छापा पडला तर अमेरिका जिंकणार, काटा पडला असला तरी अमेरिका जिंकणार पश्चिम आशिया हरणार' दोन्ही बाजूंनी फायदा अमेरिकेचाच!

या तेलवाढीला 'यामानीच 'जबाबदार आहेत, ही टुम अमेरिकन जनतेत पसरली. त्या दबावाखाली अमेरिकेला या तेल कारभाराची चौकशीसाठी एक समिती तयार करावी लागली. यात अगद‌ी सुरुवातीपासूनचे लागेबंध अभ्यासले गेले. ते आताच्या काळापर्यंत येत होतेच. पण सौदी सारख्या अविकसित, राज्यकर्ते अशिक्षित अशांच्या माथी हे पाप मारण्याचा अधिकार अमेरिकेला कोणी दिला? अमेरिकेने त्यांच्या  तेलकंपन्यांना शिक्षा द्यावी.पण  आमच्याकडे ढवळाढवळ करू नये अशी भूमिका यामीनींची होती.

शेवटी बदललेल्या  अमेरिकन सरकारने एवढ्या जुन्या घटनांत कशाला उतारा शोधून काय फायदा म्हणत थातूरमातूर अहवाल देत समिती गुंडाळली, खर म्हणजे सौदीशी वैर त्यांना झेपणार नव्हतं.

फैसल राजांनंतर आलेल्या फाहद यांच्याशी काही  काळ यामिनींचे जुळले. यामिनींची समतोल धोरणे कधीच हावरट पाहायला आवडली नाही. हळूहळू तेल मंत्री म्हणून  यामिनींनी कारभार समाप्तीकडे नेण्याची तयारी सुरूच केली होती. पुढे १९८६ ला त्यांना तेल मंत्री पदावरून दूर करण्यात आले ‌

इराक - सौदी लढाईच निमित्ताने 'लष्कराचा उंट' सौदीत रुजलाच. पण 'अल कायदा ' या दहशतवादी संघटनेच्या जन्माचे सुत्रही अमेरिकेनी हलवली होती .धार्मिक विरोधही अमेरिकेविरुद्ध वाढले.शेवटच्या प्रकरणात ओपेक+ चा जन्म,रशियाचा यात प्रवेश,एबीसचं रक्तरंजित राजकारण यांचा थोडक्यात आढावा आहे.एक वेगळा सौदी घडू लागला होता.

 २३ फेब्रुवारी २०२१ रोजी लंडनला यामिनी जग सोडून गेले. "खनिज तेलाच्या ऊर्जेवर जळणारं जग पुन्हा ज्वालाग्रही होत होते, ती आग,धग कमी करणारा तेलिया मात्र आता उरला नव्हता.



-भक्ती