लोणचं वगैरे करणं हा माझ्या आईचा खास प्रांत आहे.त्यात आवळ्याचे लोणचे तुम्ही करत असाल ,पण आईनं खुप सुंदर आवळ्याचा छुंदा केला.
अर्धा किलो आवळ्याला अर्धा किलो गुळ लागतो.यानुसार आवळ्याच्या छुंद्याला आवळे:गुळ १:१ असे प्रमाण असावे.
आवळे इडली पात्रात वाफवून घ्यायचे.वाफवल्यानंतर बिया काढून टाकायच्या.आता फोडी गार करून मिक्सरमधून फिरवून घ्यायच्या, तुमच्या आवडीनुसार बारीक करू शकता किंवा किसून घेऊ शकता.गुळ आणि बारीक आवळा एकत्र करायचा.कढईत मंद गॅसवर परतायला सुरू करायचे.त्यात मसाले - बारीक केलेली चिमूटभर मिरी, धनेपूड ३ चमचे,लाल तिखट आवडीनुसार,काळं मीठ,वेलची पूड टाकायचा.हे मिश्रण छान परतल्यावर ,जरासे घट्ट व्हायला लागल्यावर गॅस बंद करा.नंतर एक लिंबांचा रस त्यात पिळून घ्यायचा.छुंदा गार करून काचेच्या बरणीत भरायचा.
बरोबरीने कोवळ्या तुरीचे उकडून परतलेले दाणे,मेथीचे पराठे होते.मग तुम्ही कधी करता हा थंडीचा बेत 😊
No comments:
Post a Comment