Wednesday, November 27, 2019

मी एक राजहंस

       डेस्कवर सगळ टापटीप ठेऊन ताज्या फुलांना मनभर न्याहाळून प्रियांका कामाला लागली.प्रियांका ,बड्या कंपनीत उच्चं पदावर ,ऑफिसमधली  सर्वांत हुशार एम्प्लॉयी ....पण थोडीशी काळी सावळी ,नाकावरती चष्मा. लग्नासाठी स्थळांची नकारघंटा.
               आज एक महत्वाची क्लायंट मीटिंग होती. प्रेसेंटेशन प्रियांका करणार होती. ती आली,आत्मविश्वासाने प्रेसेंटेशन करू लागली. फाईलमध्ये मग्न असलेल्या समीरचे लक्ष तिच्याकडे गेले. समीर सीईओ होता. प्रेसेंटेशन यशस्वी झाले.प्रियांकाचे अभिनंदन करायला स्वतः समीर गेला... दोघांत छान गप्पा झाल्या.
           संध्याकाळी  घरी कांदापोह्याचा  कार्यक्रम पाहून प्रियांका स्तब्ध ...चल ग  म्हणाली.. समोर समीरला पाहून प्रियांका आश्चर्यचकित झाली.समीरने मागणी घातली,म्हणाला "दुपारी तुझ्या एका उत्तराने मी भाळलो ,की रूपाने नाहीतर गुणांनी माणसाने स्वतःचे फेव्हरेट असावे ",प्रियांका म्हणाली "हो आहेच मी माझी फेव्हरेट कारण मी एक राजहंस."

@भक्ती जामगांवकर

Monday, November 25, 2019

निर्णय


                  'निर्णय ही  एक मानवी प्रक्रिया ,बुद्धीच्या आणि मनाच्या झुंजीतून याचा जन्म होतो . कधी तो एकट्याने तर कधी तो सामूहिक रीतीने अस्तित्वात  येतो.कोणत्याही निर्णयापर्यंत पोहचण्याची प्रक्रिया पण वेगवेगळ्या ... खूप दीर्घ अशी विचारांची खलबत .... तर कधी एका झटक्यात ....निर्णय .
(सध्याच्या..  त्रिकुट vs मी पुन्हा येईनचच  बघा ना.)
               आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर .. निर्णय अंमलबजावणीत आल्यावर इतिहास बदलतो....
सकारात्मक -नकारात्मक बदल घडतात.या बदलांमुळे निर्माण झालेल्या  परिस्थितीवर बोटे ठेवणारे हि अनेक .... मात्र भरपूर अस्तर लावलेल्या ह्या निर्णयावर ठाम राहण्याची क्षमता हवी. हीच 'निर्णय क्षमता' ..... उच्च पदावरच्या व्यक्तीच्या विकासात हीचा अधिक वाटा.
               आपण आपल्या निर्णयावर शंकाग्रस्त  न होता ठाम असू तर त्याला निर्णय म्हणता येईल ....नाहीतर सारा पोरखेळच.

@भक्ती.. 
 

Wednesday, August 13, 2014

आठवणी

कळकळत्या उन्हात
मनी ढग जमतात
आठवांच्या सावलीचे।

आंब्याच्या बनात
कोकिळेच्या स्वरात
आठवणी भिजतात।

गुलमोहरी पाकळ्यांत
मंद सोनचाफ्यात
आठवणी दरवळती।

उन्हाळ्यात दुपारी
रेंगाळतात आठवणी
संध्याकाळ कुशीत घेऊसतर.....

भक्ती

****गुरु****



होते शून्य कधी मी
'श्री 'गिरवला तुमच्यासवे मी

अंधारात लपले कोठे मी
दाखविली प्रकाशाची वाट

अशक्यप्राय ,हरलेली मी
चिकाटी शिकले तुमच्यासवे मी

जगाच्या नियमांनी भेदरलेली मी
मुक्त उडण्या पंख दिले भेट

भक्ती

Sunday, May 4, 2014

सरी

सोसाट वारा हवा थंड खट्याळ
मनाला चाहूल दाटले वरी आभाळ

होईल क्षण मोकळे सरी कोसळ
मोहाचा डोह पार ढवळ ढवळ

चिँब चिंब भिजुनी वाहे आनंद खळखळ
थेंब थेंब साठवुन भरल सुखाचं तळ

गोष्ट फुलती सरी अन माझी प्रांजळ
कित्येक येतील मेघ ऋतु ना तुटणार ही नाळ
@भक्ती