Wednesday, April 16, 2025

खेळ मांडीयेला-भातुकलीचा खेळ
















#खेळमांडीयेला
#भातुकली
#दीपालीकेळकर 
#उज्वलाढमढेरे
#विलासकरंदीकर
लेकीला म्हटलं "आज आपल्याला भातुकलीचा खेळ पाहायला जायचं आहे" ती म्हणाली "भातुकलीचा खेळ म्हणजे काय?"

मनात‌ल्या मनात म्हणाले की "एका भातुकलीच्या खेळाची किंमत तुम क्या जानो, जेनझी(generation z)"

तिला म्हणाले "अंग किचन सेट पाहायला जायचय"

" ओके , बार्बीपण असेल का तिथे ?"
"चल तुला ठकीच आणते"😉
ती आपली शांतपणे माझ्याकडे पाहत होती आणि मी शांतपणे 'भातुकली 'शब्दाचा वनवास आजच्या काळात अनुभवत होते भातुकलीच्या विचाराने मन भूतकाळात गेले.
मी लहानपणापासूनच शांत, एकटीच रमणारी हे सांगतांना नेहमी म्हणायची "आमची भक्ती, बाहेर खेळायला जा सांगितले तरी ती जायची नाही. तिची भातुकली ती फ्रॉकमध्ये भरून या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात मांडत दिवसभर घरातच एकटीच खेळायची." असं ती सगळ्यांना सांगायची 😂

"अच्छा, माझ्या इंट्रोव्हर्ट पणाचा  उगम इथपासून आहे तर" अशा विचार मनात येऊन मी हसत राहिले. 😊😘

 उज्वला ढमढेरे यांनी मेहनतीने वेगवेगळ्या ठिकाणाहून सुंदर अशी वेगवेगळ्या भातुकलीचे खेळ जमवले आहेत.अगदी सोन्या चांदीचीही भातुकली त्यात आहे. मातीच्या भातुकली अतिशय सुबक होती तांब्याची पितळाची भातुकलीतली विळी, पाण्याची भांडी विविध आकारतली  छोटी मोहक वाटत होती. कागदाची, पानांची,कापडी पर्यावरण पूरक ‌भातुकलीही होती.

 भातुकलीतले बंब, सूप ,घंगाळे,चूल, पाण्याचे फिल्टर ,तीन ताळी डबा होते. स्टील, प्लास्टिक भातुकलीचे खेळ खूप प्रकारची होते.

प्रदर्शन पाहायला जायच्या आधी भातुकलीविषयी आंतरजालावर माहिती शोधत होते. तेव्हा भातुकली वरच चक्क एक अनोखचं पुस्तक दिसलं .दिपाली केळकर यांनी अभ्यासपूर्ण नजरेतून अनेक
मान्यवरांच्या भातुकलीच्या विविधांगी विचारांचा समावेश 'खेळ मांडीलेया' हे पुस्तक लिहिले आहे. या भातुकलीच्या खेळाचे प्रसिद्ध संग्राहक विलास करंदीकर यांच्याकडे जवळपास ३००० भातुकलीचे खेळ होते. ज्याची लिम्का बुकमध्येही दखल घेण्यात आली. या पुस्तकात या अवलियांची-
विलास करंदीकर आणि उज्वला ढमढेरे यांचीही मुलाखत आहे.. ज्यांनी वाढता वाढता वाढे अशा पद्धतीने बहुविध भातुकलीचा संसार कष्टाने प्रचंड मोठा केला आहे.
मग या पुस्तकाविषयी अजून काही माहिती शोधताना, दिपाली केळकर यांचे 'खेळ मांडीयेला' पुस्तकावरचे एक व्याख्यान ऐकायला मिळाले. या पुस्तकाची अनुक्रमणिका पाहिला असता लक्षात येईल की भातुकली खेळ के मुलांच्या मनोविश्वात डोकावण्याचा खेळच आहे. पुस्तकातील "काही काही गंमतीशीर, सखोल गोष्टी खुप मनोरंजक आहेत."मोठ्यांच्या ज‌गात डोकावण्यासाठी दिलेला  दरवाजा म्हणजे भातुकली "-माधवी पुरंदरे 
राजीव तांबे सांगतात, भातुकली एकटीने, किंवा सवंगडी जमवून किंवा कुटुंबातील व्यक्तीची भूमिका घेऊन लहान मुले खेळतात, जणू पुढील संसाराची सरावच भातुकली आहे.

भातुकली खेळ नेहमी मुलींनाच भेट देऊन, मुलगा-मुलगी असमानता दर्शव‌ली नकळत वाढत जाते, अशावेळी मुलग्यालाही भातुकली देऊन स्वयंपाकाची कला त्यालाही लहानपणापासून देता येईलच. अशाप्रकारे अनेक मान्यवरांचे भातुकली खेळाचे विचार समजून
घेत असतानाच, अगदी विश्वनिर्मितीचे अध्यात्मिक विचार भातुकलीच्या खेळाशी धागे अलका मुतालिक या  जाणकारांनी उलगडले आहे. इतक सुंदर भातुकलीवस्व पुस्तक वाचायची उत्सुकता आता वाढली आहेच पण पुन्हा लहानग्या भाच्याला भातुकलीचा खेळ भेट देऊन भातुकलीचा वसा पुढे देत राहण्याची इच्छा लवकर पूर्ण करायची आहे. तुमच्या काही आठवणी भातुकलीच्या ?
-भक्ती
खेळ मांडीयेला -अनुक्रमणिका

१) गोष्ट भातुकलीच्या राजाची 
२) भातुकली १८ प्रकारची
३) निर्मिती भातुकलीची आणि भांड्यांची
४) भातुकलीच्या राज्यात (मान्यवरांच्या नजरेतून भातुकली) 

-डॉ. गो. बं. देगलूरकर भातुकलीम्हणजे आपली संस्कृती 

-प्रतिभा रानडे
भातुकलीचा इतिहास आधुनिक स्वरूपात यायला हवा

-वामनराव देशपांडे भातुकली खेळणं हा भाग्यकुंडलीतला योग 

-डॉ. माधवी वैद्य
नाट्यकलेचा उगम भातुकलीत

-शोभा भागवत
भातुकली एक शांत खेळ

-हेमा लेले भातुकली खेळाला विविध कंगोरे 

-माधुरी पुरंदरे
 भातुकलीच्या माध्यमातून घडतं भाषाशिक्षण

राजीव तांबे
-भातुकली म्हणजे जगण्याचा सराव

-नरेंद्र लांजेवार 
मुलांचं भावविश्व समृद्ध करणारी भातुकली

-शुभदा चौकर
आत्मनिर्भर होण्यासाठी पहिली पायरी म्हणजे भातुकली

-आश्लेषा महाजन भातुकली म्हणजे स्वतःचा अवकाश शोधणं 

-आसावरी काकडे सर्जनशीलतेला वाव देणारा खेळ

-अविनाश बिनीवाले
भातुकली कालबाह्य होत आहे

-अविनाश धर्माधिकारी
व्यवस्थापन कौशल्य शिकवणारा खेळ

-डॉ. संजय उपाध्ये
लहान मुलांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा मार्ग

-स्वाती चांदोरकर
बालपणीच्या आठवणी मोठं सुख

-प्रज्ञा कुलकर्णी भातुकली म्हणजे संस्कार

-सुहासिनी कीर्तिकर
बालपण भारून टाकणारा खेळ

-डॉ. अनुपमा उजगरे बिनभांड्यांची भातुकली

-डॉ. सिसिलिया 
हरपले श्रेय

-प्रवीण दवणे
भातुकली : स्वप्नांची पाऊलवाट

*संतसाहित्य आणि भातुकली तसेच इतर खेळ

-डॉ. रामचंद्र देखणे
खेळ ही अध्यात्मातील मध्यवर्ती कल्पना

-अलकाताई मुतालिक
अंतःकरणाची मशागत करणारा खेळ भातुकली

-सीमा गोखले
संतांच्या नजरेतून भातुकली आणि तत्सम खेळ

*डॉक्टरांच्या दृष्टिकोनातून भातुकली

-डॉ. स्नेहलता देशमुख नव्या-जुन्याची सांगड हवी

-डॉ. वैजयंती खानविलकर
भातुकलीप्रमाणेच मैदानी खेळही महत्त्वाचे


No comments: