Tuesday, July 30, 2024

हरभरा डाळ इडली

 #केरळीफूड

#मोरमिलागाई 

#ताकातलीमिरची

-हरभरा डाळ इडली



इडली करण्यासाठी दीड वाटी हरभरा डाळ आणि दोन वाटी तांदूळ रात्री भिजत ठेवले.उडीद डाळ अजिबात वापरली नाही. दीड डाळीशिवाय इडली कशी होईल उत्सुकता होती.

सकाळी मिश्रण वाटून घेऊन बाजूला ठेवलं.संध्याकाळी घरी आल्यावर पाहिलं तर पिवळसर मिश्रणाला पिवळसर रंग आला.नेहमी पांढरं फटक मिश्रण पाहायची सवय असलेल्या घरी सगळ्यांना वाटलं मिश्रण खराब झालं 😄.

मी म्हटलं कूल डाऊन 😄 हरभराडाळीचा रंग उतरला आहे.चवीपुरते मीठ,चिमूटभर सोडा घातला.

मस्त इडली पात्रात इडल्या लावल्या.मस्त टम्म फुगल्या.रंगही फिकट पिवळा जसं बागेतलं एखादं फुलच 😊 आता या फुलाबरोबर हिरवी पानं नको का😂 मग दोन चमचे उडीद डाळ,हिरव्या मिरच्या,जिरे,तीळ,कडीपत्त्यासह कमी तेलात परतली.साखर व ओल्या खोबऱ्यासह मिक्सरमधून चटणी पाणी टाकून बारीक वाटली.दह्यात मिक्स केली.



फोडणीसाठी तेलात मोहरी आणि केरळी मोर मिलागाई  म्हणजे ताकातल्या वाळवलेल्या मिरच्या चांगल्या तळल्या.चटणीला चरचरीत फोडणी दिली.

या ताकातल्या मिरच्यांची चव तिखट ही तरीही सुसह्य मस्तच होती‌.

याच मिरच्या तळून भाताबरोबर,उपम्यात वापरू शकतो.

No comments: