#केरळीफूड
#अप्पलम
#पायसम
तर काय झालं,जवळच केरळाहून महाराष्ट्रात स्थायिक झालेल्यांच एक स्टेशनरी दुकान आहे.तिथे गेले असता ते फणसाचे वेफर्स पैकिंग करतांना दिसले.तेव्हा त्यांनी इतर केरळी खाद्यपदार्थही दाखवले.मग फणसाचे वेफर्स,राईस गुलगुलासारखा केक,दह्यातल्या खारावलेल्या तिखटजाळ मिरच्या,फुलाच्या आकाराचे मुरूक्कू,पिवळे लांबसर चिरोटे,काळ्या तिळाचे लाडू,लालसर तुकडा तांदूळ,तांदळाचा पुट्टू असे पदार्थ एक एक करत चव घेतली.तिथूनच वाटीच्या आकाराचे पापड जे उडीद आणि तांदूळ मिक्सचे असतात ते घेतले.म्हटल पापडासारखे पापड असतील.भाजून पाहिले अजिबात भाजले गेले नाही जळायचे.मग तळून पाहिले तर छान पुरी सारखे टम्म ,खुशखुशीत फुगले.पण हे प्लेन असल्याने नुसते खाण्यात मज्जा येईना.मग एक केरळी भटकंती ब्लॉगहून समजलं की ते कसे खायचे😄
तर त्यासाठी केला शेवयाचा पायसम(मी अधिक खोदाखोद न करता खीरीसारखाच बनवला 😅)
मग काय ते अप्पलम(प्लेन पापड)तळला.केळीच्या पानावर आधी अप्पलम ठेवला त्यावर शेवय्या पायसम टाकला,परत अप्पलम परत पायसम 😄शेवटी केळ कुस्करून त्यात घेतले.खुसखुशीत पापड कुडुडुम त्यात क्रश केला.... अहाहा काय ती चव👌🏻😋
खरच कसं खायचं हे शिकवावं लागते कधी कधी😂
पुट्टू कसा खायचा याची कथा पुढच्यावेळी 😊
-भक्ती

No comments:
Post a Comment