#आषाढ
खरं म्हणजे मागच्या आठवड्यात दोनदा आषाढात आखाड तळून झाला.तोवर लाल भोपळा आणला नव्हता.चार दिवसांपूर्वी आणला पण वेळच झाला नाही.आज भोपळ्याचे घारगे करत उपवास सोडला.मराठी घरांत , काळ्या मेघांच्या झालरीत, उधाणलेल्या पावसात लाल भोपळ्याचे घारगे/घाऱ्या का अबाधित आहेत.गुळाचा मुरलेला गोडवा,जायफळ वेलचीचा मंद सुगंध, वाफवलेल्या भोपळ्याचा मऊसर गोडसर ओलावा जिभेला कमाल तृप्त करतो.
कृती
भोपळ्याच्या बिया,शिरा व सांगली काढून टाकायची.बारीक किसून घ्यायचा ,एक मोठी वाटी किस घ्यावा.तूपात परतून घ्यायचा.अर्धी वाटी गूळ,वेलची,जायफळ पावडर घालून मऊसर शिजवून घ्यायचा.हे मिश्रण थंड झाल्यावर बसेल तेवढी कणीक+तीन चमचा तांदळाची पिठी घालत मळून घ्यायचे.घारगे पुरीच्या आकारात लाटून तळून घ्यायचे.
गुळाचे योग्य प्रमाण असेल तर पुरी छान फुगते.

No comments:
Post a Comment