Sunday, August 11, 2024

कायगाव टोका -प्रवरासंगम



 भूयस्तु शरमुद‍्धृत्य कुपितस्तत्र राघवः।

सूर्यरश्मिप्रतीकाशं ज्वलन्तमरिमर्दनम्॥ १३॥


संधाय सुदृढे चापे विकृष्य बलवद‍्बली।

तमेव मृगमुद्दिश्य श्वसन्तमिव पन्नगम्॥ १४॥


मुमोच ज्वलितं दीप्तमस्त्रं ब्रह्मविनिर्मितम्।

शरीरं मृगरूपस्य विनिर्भिद्य शरोत्तमः॥ १५॥


मारीचस्यैव हृदयं बिभेदाशनिसंनिभः।

तालमात्रमथोत्प्लुत्य न्यपतत् स भृशातुरः॥ १६॥


अरण्यकांड सर्ग ४४, वाल्मिकी रामायण 


रामाने रागाने पुन्हा बाण उचलला

ते सूर्याच्या किरणांसारखे चमकत होते आणि शत्रूंना चिरडत होते 13. 13.

त्याने ते मजबूत धनुष्याने निश्चित केले आणि जोराने खेचले

मोठ्याने श्वास घेणाऱ्या सापाप्रमाणे त्याने त्या हरणाकडे पाहिले १४॥

त्यांनी ब्रह्मदेवाने बनवलेले ज्वलंत अस्त्र सोडले

सर्वोत्तम बाणांनी हरणाच्या शरीराला छेद दिला 15. 15.

गडगडाटाने मारिचाच्या हृदयालाच छेद दिला.

अत्यंत व्यथित होऊन त्याने ताडाच्या झाडावरून उडी मारली आणि खाली पडला 16.

****

मायावी हरणाने म्हणजे मारीची याने गोदावरीच्या कडे कडेने प्रभूराम यांना झुंजवत या कायगाव टोके या  ठिकाणा पर्यंत आणले. त्याचवेळेस प्रभुराम यांच्या लक्षात आले की हा नक्कीच कोणीतरी मायावी आहे. तेव्हा त्यांनी बाण मारून त्याचा वध केला. त्या बाणाचे टोक येथेच जमिनीत रुतले होते. म्हणून गावाचे नाव तीर्थ क्षेत्र टोका, असे पडले. या ठिकाणी गोदावरी नदीला धनुष्याचा आकार असल्याने तिला बाणगंगा असेही म्हणतात. 


रामाने कार्य सिद्ध होऊन स्थापन केलेले शिवाचे सिद्धेश्वर मंदिर, मारीच नावाच्या राक्षसाने सुवर्णमृगाचे रूप धारण केले होते त्याचा देह म्हणजे काया जेथे पडली ते कायगाव, रामेश्वर व मारीच राक्षसाला ज्या ठिकाणी मुक्ती मिळाली ते मुक्तेश्वर असे विविध संदर्भ अनेक ग्रंथांत कायगाव टोके या गावाचे आढळतात.







प्रवरा ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातून उगम पावणारी नदी आहे. हिला मुळा, आढळा, म्हाळुंगी या उपनद्या मिळतात. ही नदी पुढे गोदावरीला जाऊन मिळते. प्रवरानदीच्या किनाऱ्यावर अकोले, संगमनेर, कोल्हार, नेवासा ही प्रमुख गावे आहेत. नदी रतनवाडीला उगम पावुन प्रवरासंगम येथे गोदावरी नदीस मिळते.


प्रवरा आणि गोदावरी यांचा संगम नेवासापासून जवळ असलेल्या टोका या गावी झाला आहे. या गावाला एक तीर्थक्षेत्र म्हणून संबोधले जाते. हा भाग म्हणजे रामायणातील दण्डकरण्याचा भाग आहे, असे आजही त्याचे महत्व आहे.


या संगमाच्या बाजुलाच भगवान शंकराचे मंदिर आहे. बाजूलाच सिद्धेश्वर, घोटेश्वर, रामेश्वर, मुक्तेश्वर, संगमेश्वर, बाण गंगा अशी मंदिरे आहेत.

पेशवेकालीन सन १७०० नंतरची ही मंदिरे हेमांडपंथी आणि नागरशैलीचा वापर करत बांधली आहे.नगरच्या टाकळी ढोकेश्वरच्या पळशीचे मंदिरही जमीनदारी मिळालेल्या पेशवे सरदाराने बांधले होते तसेच कोण्या सरदारांच्या मदतीने (धन) ही मंदिरे बांधली असावीत.

नगर- संभाजी नगर रस्त्याच्या देवगड पुढेच डावीकडे नदीवरचा पुल सुरू होण्यापूर्वी एक रस्ता या मंदिराकडून आपल्याला घेऊन जातो.पहिल्यांदा घटेश्वर मंदिर यांचे दर्शन होते.मग पुढे गेल्यावर रेखीव शिल्पांच्या सौंदर्याने नटलेले सिद्धेश्वर मंदिर आहे.मंदिर प्रवरासंगमाच्या काठावर पूर्वाभिमुख पण प्रवेशद्वार पश्चिमेसही आहे.पूर्वेच्या प्रवेशद्वारवर मोठा सज्जा म्हणजेच नगारखाना? आहे.

हे मंदिर तीन देवतांच्या मंदिरात विभागले आहे.

१.सिद्धेश्वर

मधोमध भव्य मुख्य शंकराचे सिद्धेश्वरचे मंदिर आहे.शिववाहन नंदीची नंदी मंडपात घुंगरूमाळ चढवलेली आकर्षक भव्य मूर्ती आहे.



मंदिर मंडपामध्ये खांबांवर भारवाहक यक्ष आहेतच.गर्भगृहातील शंभूची पिंड अत्यंत सुखदायक आहे.(योगायोगाने आम्हांला पुजाऱ्यांनी  आरतीची संधी दिल्याने तिथले वातावरण माझ्यासाठी आणखीच आनंददायी झाले.)तिथेच कुठल्यातरी देवीची २ फूट उंच ही मूर्ती आहे,ती कोणती समजली नाही.मंदिराच्या बाहेरील बाजूला रेखीव शिल्पांची रेलचेल आहे. यात पहिल्यांदा एक हत्तीवर बसलेले पेशवे? याच मंदिराची प्रतिकृती असलेले शिल्प आहे.पुढे ताक घुसळणाऱ्या गोपी, कालिया मर्दन, अर्जुन आणि भीम गर्वहरण, शिवपार्वती नंदी ही छोटी शिल्पे आपल्याच उंचीसमोर कोरलेली आहेत.समोरच्या भिंतीवर विष्णू दशावतार कोरलेले आहेत.हा दशावतार पट निश्चितच आतापर्यंत पाहिलेल्या पटांपैकी खूप सरस आहे.कारण यातल्या प्रत्येक अवताराच्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने दाखवल्या आहेत.राम अवतारात रावणाचे शिल्प अधिक संशोधन करण्यासारखे आहे.तसेच मत्स्य आणि कूर्म अवताराचे आहे.कली अवतार मी पहिल्यांदाच नीट पाहिला.आता दुसऱ्या भिंतीवर विविध वाद्ये टाळ,पखवाज,वीणा वाजवणाऱ्या सुंदरी आहेत.तर एक शिल्पात सुंदरीने धनुष्य धरले आहे?.एक आयताकृती मोठे शिल्प म्हणजे द्रोपदी स्वयंवरपट अर्जुन धनुष्य घेत वर असलेल्या माशाचा वेध घेत आहे.जवळच बाकी पांडव,द्रुपद आहे.












२.विष्णू मंदिर 

डाव्या बाजूला सुंदर अशा विष्णूवाहन गरूड देवाची २-३ फूट गुडघ्यांवर बसलेली गरूड मुर्ती आहे.पण वरती कृष्ण गोपी शिल्प आणि रासलीलेचे गोलाकार नृत्य शिल्प आकर्षक आहे.








छोटेखानी या मंदिरावर चहू बाजूंनी अष्ट दिक्पाल यांची शिल्पे आहेत.

आठ दिशांचे पालन करणाऱ्या आठ देवांना ही संज्ञा आहे. इंद्र, अग्‍नी, यम, निर्ऋती, वरुण, वायू, कुबेर आणि ईशान हे अनुक्रमे पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैर्ऋत्य, पश्‍चिम, वायव्य, उत्तर आणि ईशान्य ह्या आठ दिशांचे पालन करणारे अष्टदिक्पाल म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची वाहने अनुक्रमे ऐरावत, छाग (मेंढा), महिष, पुरुष, मकर, हरीण, दशाश्वथ (अथवा अश्व अथवा शश) व वृषभ ही होत. आयुधे अनुक्रमे वज्र, शक्ती, पाश व दंड, खड, नागपाश, ध्वज, गदा आणि त्रिशूल ही होत. 

३.देवी मंदिर

उजव्या बाजूला देवीचे मंदिर आहे.मंदिराच्या बाहेरील भिंतींवर सप्तमातृकांची शिल्पे आहेत.आदिशक्तीचे भिन्नभिन्न रुपे आहेत. प्रमुख पुरुष देवतांच्या शक्ती आहेत. ब्रह्मापासून ब्रह्माणी, विष्णूपासून वैष्णवी, शिवापासून माहेश्वरी, कार्तिकेया पासून कौमारी, इंद्रापासून इंद्राणी/ऐन्द्री वराह अवतारापासून वाराही तर देवीपासून चामुंडा अशी शक्ती उत्पन्न झाली. आणि काही ठिकाणी चौसष्ट योगिनीपैकी नारसिंही (प्रत्यंगिरा देवी), देवीचाही अन्य मातृकामध्ये उल्लेख आढळतो. अशा वेळी त्यांना अष्टमातृका असे म्हणतात.

या मंदिरात नारसिंही मातृदेवताही आहे हे विशेष!

मंदिराच्या एका बाजूला सुंदर महिरपी असलेल्या असंख्य खांबांच्या रांगांची एक पडली आहे.अगदी राजस्थानीशैलीच्या महालांसारखी..


आता मंदिराच्या समोरच तो प्रसन्न दोन जीवनदायिनी प्रवरा -गोदावरी संगमांचा शांत वाहणारा प्रवाह मनाचा ठाव घेत राहतो.

-भक्ती

No comments: